नवजात कृष्ण विवरातील गुरुत्वीय लहरी शोधण्यात यश
- नवजात कृष्णविवरातून बाहेर पडलेल्या गुरुत्वीय लहरी शोधण्यात संशोधकांना प्रथमच यश आले असून त्यातील चक्राकार प्रारूपामुळे कृष्णविवराचे वस्तुमान व त्याची फिरण्याची पद्धत व दिशा यावर माहिती मिळाली आहे.
- आइस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावरील पुराव्यात त्यामुळे मोलाची भरही पडण्याची शक्यता आहे.
- फिजिकल रिव्ह्य़ू लेटर्स या नियतकालिकात म्हटले आहे, की कृष्णविवराचे वस्तुमान, फि रण्याची पद्धत व गती, विद्युत भार हे प्रमुख निरीक्षणक्षम घटक असतात हे यातून दिसून आले आहे.
- मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या अमेरिकी संस्थेतील वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून त्यांनी या कृष्णविवराची चक्राकार गती, वस्तुमान याबाबत अंदाज मांडला आहे.
- याआधी दोन कृष्णविवरे एकमेकात विलीन होत असतानाच्या घटनेतील गुरुत्वीय लहरींचा शोध लावण्यात यश आले होते. यात दोन कृष्णविवारांची टक्कर झाली होती. आघातानंतर निर्माण झालेल्या नवजात कृष्णविवरातील गुरुत्वीय लहरी काहीशा वेगळ्या असतात.यात शेवटच्या काही मिलीसेकंदातील गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यात आला.
भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमार
- भारताच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमारच आहे असं आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (International Monetary Fund) म्हटलं आहे.
- भारताचा जीडीपी दर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच ५ टक्क्यांवर घसरला. हा गेल्या सहा वर्षातला निचांक आहे त्यावरुन आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमार असल्याचं म्हटलं आहे.
- सध्या भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीच चीनच्याही पुढे आहे असंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे.
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला ही अपेक्षा आहे की भविष्यात ही सुमार कामगिरी सुधारेल. आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती होईल अशी अपेक्षा करतो आणि त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असं IMF च्या प्रवक्त्या गेरी राईस यांनी म्हटलं आहे.
दिल्ली विद्यापीठावर ‘अभाविप’चा झेंडा
- दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) बाजी मारली आहे. अध्यक्षासह उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदावर एबीव्हीपीने विजय मिळवला आहे.
- तर नॅशनल स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडियाने (एनएसयुआय) सचिवपदावर विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अभाविपचा ३-१ असा विजय झाला आहे. अभाविप ही आरएसएसशी, एनएसयुआय ही काँग्रेसशी तर आयसा ही डाव्यांशी संबंधीत विद्यार्थी संघटना आहे.
औद्योगिक उत्पादन मंदीकडे ; जुलैमध्ये दर ४.३ टक्क्यांखाली
- देशातील औद्योगिक उत्पादनाची घसरती वाटचाल एकूण आर्थिक मंदीच्या दिशेने सुरू असल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. भारताचा औद्योगिक उत्पादन दर यंदाच्या जुलैमध्ये ४.३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
- वर्षभरापूर्वी, जुलै २०१८ मध्ये प्रकल्पातील उत्पादनाचे मापक असलेला औद्योगिक उत्पादन दर ६.४ टक्के होता. तर आधीच्या महिन्यात, जून २०१९ मध्ये हा दर १.२ व मे २०१९ मध्ये तो ४.६ टक्के नोंदला गेला आहे.
- सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी खात्याने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलै या चालू वित्त वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांत औद्योगिक उत्पादन दर ३.३ टक्के नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत हा दर ५.४ टक्के होता.
- यंदा घसरलेला औद्योगिक उत्पादन दर एकूणच देशातील निर्मिती क्षेत्रातील हालचाल मंदावल्याचे स्पष्ट करत आहे. एकूण निर्मिती क्षेत्र वर्षभरापूर्वीच्या ७ टक्क्यांवरून यंदाच्या जुलैमध्ये ४.२ टक्क्यांवर स्थिरावले आहे.
- भांडवली वस्तू क्षेत्राचा प्रवासही उणे ७.१ टक्क्यांवर आला आहे. तर खनिकर्म क्षेत्राची वाढ काही प्रमाणात वाढून ४.९ टक्के झाली आहे. ऊर्जानिर्मिती मात्र किरकोळ घसरत ४.८ टक्क्यांवर पोहोचली आहे.
- जुलै २०१९ मध्ये प्राथमिक वस्तूच्या निर्मितीतील वाढ ३.५ टक्के, पायाभूत तसेच बांधकाम साहित्यातील उत्पादन निर्मिती २.१ टक्क्याने वाढली आहे. ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती उणे स्थितीत (२.७ टक्के) राहिली आहे.
- सर्व गटात निर्मित खाद्यान्न वस्तू क्षेत्राने जुलैमध्ये सर्वाधिक, २३.४ टक्के वाढ यंदा नोंदविली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात समाविष्ट एकूण २३ उद्योगांपैकी १३ उद्योग क्षेत्रातील निर्मिती वेग यंदा मंदावला आहे.