चालू घडामोडी : १४ सप्टेंबर २०२०
Current Affairs : 14 September 2020
व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘द डिसायपल’ला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार
व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना या महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.
युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पुरस्कार मिळवणारे चैतन्य ताम्हाणे हे पहिले भारतीय दिग्दर्शक ठरले आहेत.
या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय समिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.
‘द डिसायपल’ हा चित्रपट शास्त्रीय संगीत गायकाच्या जीवनाशी निगडीत असून गेल्या आठवड्यात हा चित्रपट व्हेनिस महोत्सवात दाखवण्यात आल्यानंतर तिथल्या समिक्षकांनी आणि तज्ञांनी गौरवला होता.
भारतीय शास्त्रीय संगीताचे विश्व माझ्यासाठी खुले करणाऱ्या सर्व संगीतकार, संशोधक, लेखक आणि इतिहास संशोधकांना आपण हा पुरस्कार समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया ताम्हाणे यांनी व्यक्त केली आहे.
टस्कन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत : हॅमिल्टनला जेतेपद
मर्सिडिझ संघाच्या लुइस हॅमिल्टन याने अपघातामुळे व्यत्यय आणलेल्या टस्कन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत आपले कसब पणाला लावत विजेतेपद मिळवले.
आपल्या कारकीर्दीतील ९०वे जेतेपद मिळवणारा हॅमिल्टन हा मायकेल शूमाकरच्या विक्रमी जेतेपदांपासून फक्त एका विजयाने दूर आहे.
मुगेलोच्या अवघड ट्रॅकवर प्रथमच झालेल्या या शर्यतीत पहिल्या सात फेऱ्यांदरम्यान दोन अपघात नोंदवले गेल्यामुळे सहा ड्रायव्हर्सना शर्यतीतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर ४६व्या फे रीदरम्यान लान्स स्ट्रॉलच्या कारचा अपघात झाला. मात्र हॅमिल्टनने निर्विवाद वर्चस्व गाजवले.
हॅमिल्टनचा सहकारी वाल्टेरी बोट्टासला दुसऱ्या तर रेड बुलच्या अलेक्झांडर अल्बनला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
अमेरिकन बजेटमध्ये विक्रमी तूट
करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांची अवस्था गंभीर झाली आहे. अशातच जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंधन मानले जाणाऱ्या अमेरिकेच्या अर्थसंकल्पात वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात विक्रमी ३ हजार अब्ज डॉलर इतकी विक्रमी तूट झाली आहे.
चालू अर्थसंकल्पात ऑक्टोबर ते ऑगस्ट या ११ महिन्यात ३ हजार अब्ज डॉलर इतकी तूट झाली आहे. याआधी ११ महिन्याच्या कालावधीत अर्थसंकल्पात विक्रमी तूट २००९ मध्ये नोंदवली गेली होती. तेव्हाची तूट १ हजार ३७० अब्ज डॉलर इतकी होती. २००८मधील जागतिक आर्थिक संकटाचा तो काळ होता. पण अर्थसंकल्पातील सध्याची तूट ही याआधी पेक्षा दुप्पटीने अधिक आहे.
अमेरिकेचे २०२०चे आर्थिक वर्ष ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. अमेरिकन काँग्रेसच्या बजेट कार्यालयानुसार पूर्ण आर्थिक वर्षातील तूट ३ हजार ३०० अब्ज डॉलवर जाऊ शकते.
आता बहरिनचीही इस्रायलला मान्यता
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने आता बहरिननेही इस्रायलबरोबरचे संबंध सर्वसामान्य करण्यास मान्यता दिली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू आणि बहरिनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा यांच्यात समेट घडवून आणल्याची घोषणा केली.
महिन्याभरापूर्वीच संयुक्त अरब अमिराती आणि इस्रायलमधील संबंधही याचप्रमाणे सुरळीत करण्यात आले होते. युएई आणि इस्रायलच्या नेत्यांमध्ये पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये एका शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.
त्याच धर्तीवर इस्रायल आणि बहरिनमध्येही शांतता चर्चेला यश आले आहे. नेत्यान्याहू आणि अल खलिफा यांनी आपापसातील मतभेद मिटवण्यास मान्यता दिली आहे. बहरिनकडून इस्रायलबरोबर मुत्सदी पातळीवरील संबंध प्रस्तापित केली जाणार आहेत
यूएस ओपन : नाओमी ओसाका दुसऱ्यांदा विजेती
जपानची टेनिसपटू नाओमी आसोका दुसऱ्यांदा यूएस ओपन चॅम्पियन बनली.
चौथ्या मानांकित ओसाकाने बेलारुसच्या बिगर मानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाला १-६, ६-३, ६-३ ने हरवले.
२२ वर्षीय ओसाकाचा करिअरमधील तिसरा ग्रँड स्लॅम किताब ठरला.
तिने २०१८ यूएस ओपन व २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. या विजयामुळे ओसाकाला २२.०५ काेटी रुपयांचे बक्षीस व २ हजार रेटिंग गुण मिळाले. आेसाका पहिला सेट २६ मिनिटांत १-६ ने हारली.
त्यानंतर सलग २ सेटसह किताब जिंकला. ओसाका पहिला सेट गमावल्यानंतर चॅम्पियन बनणारी २६ वर्षांतील पहिली खेळाडू बनली.