Current Affairs : 14 September 2021
अमेरिकन ओपन: एम्मा रादुकानूला विजेतेपद
ब्रिटनच्या १८ वर्षीय एम्मा रादुकानूने अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचे विजेतेपद जिंकून इतिहास घडवला.
गेल्या ५३ वर्षात अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवणारी ती पहिली ब्रिटिश महिला ठरली आहे.
एम्मा रादुकानूने कॅनडाच्या लीलाह फर्नांडिजचा ६-४, ६-३ असा पराभव करून या प्रतिष्ठेच्या ग्राँड स्लॅड स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या दोन्हीही खेळाडू प्रथमच अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. अखेर एम्माने बाजी मारली.
रादुकानूने अमेरिकन ओपन स्पर्धेत आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. तिने १८ सेट जिंकले आहेत. यातील ३ क्वालिफाईंग दौऱ्यातील तर ६ सामने मेन ड्रॉ मधील होते.
१९९९ नंतर ही पहिलीच वेळ आहे की अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये दोन युवा महिला खेलाडू खेळत होत्या. १९९९ साली १७ वर्षीय सेरेना विलियम्स आणि १८ वर्षीय मार्टिना हिंगिस या भिडल्या होत्या.
१९७७ साली विंबल्डन स्पर्धेत वर्जीनिया वेडने ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर ग्रॅड स्लॅम जिंकणारी ती पहिली ब्रिटश महिला आहे. २००४ साली मारिया शारापोव्हाने विंबल्डन स्पर्धेचे विजेतेपद १७व्या वर्षी जिंकले होते. त्यानंतर महिलांमध्ये सर्वात कमी वयात विजेतेपद मिळवणारी रादुकानू पहिली महिला ठरील आहे.
डॅनिल मेदवेदेवने पटकावले पहिले ग्रँडस्लॅम
सर्बियाचा अग्रमानांकित नोवाक योकोविकचे २१ वे ग्रँडस्लॅम किताब जिंकण्याचे स्वप्न भंगले. अमेरिकी ओपनच्या अंतिम फेरीत त्याला द्वितीय मानांकित रशियाच्या डॅनियल मेदवेदेवने ६-४, ६-४, ६-४ ने हरवून पहिला ग्रँड स्लॅम जिंकले. योकोविकने यंदा ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बल्डन किताब जिंकला होता.
जोकोविचने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. जर जोकोविचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धा जिंकली असते तर त्याने आपल्या कारकिर्दीतील विक्रमी २१ वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले असते. पण मेदवेदेवने जोकोविचचा ६-४, ६-४, ६-४ असा पराभव करत त्याचे स्वप्न भंग केले.
जोकोविच १९६९ नंतर कॅलेंडर ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिला खेळाडू होण्यापासून फक्त एक पाऊल दूर होता. रॉड लीव्हरने ५२ वर्षांपूर्वी हंगामातील सर्व चार ग्रँडस्लॅम जिंकले होते. स्टेफी ग्राफ १९८८ मध्ये असे करणारी महिला खेळाडू होती. लिव्हरने हे १९६२ मध्ये देखील केले होते. जर जोकोविचने विजेतेपद मिळवले असते, तर हा त्याचे २१वे ग्रँड स्लॅम हे विक्रमी ठरले असते.
उत्तर कोरियाकडून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी
लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा उत्तर कोरियाने केला असून हे क्षेपणास्त्र नव्याने तयार करण्यात आले आहे. बऱ्याच दिवसानंतर उत्तर कोरियाने ही चाचणी केली असून त्यामुळे लष्करी क्षमता वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते, उत्तर कोरियाचे हे पहिले अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असू शकेल.
या प्रक्षेपणाची दृश्यचित्रे दाखवण्यात आली. त्यात चलत क्षेपणास्त्रवाहकाचा समावेश होता. कोरियाच्या मध्यवर्ती वृत्तसंस्थेने म्हटले आहे, की गेली दोन वर्षे हे क्षेपणास्त्र तयार करण्याचे काम चालू होते. त्याची क्षमता १५०० कि.मी वरील लक्ष्य भेदण्याची असून शनिवारी व रविवारी त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
भूपेंद्र पटेल यांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
भूपेंद्र पटेल यांनी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर रविवारीच पक्षाने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.
५९, वर्षीय पटेल हे सरदारधामच्या विश्वस्तांपैकी एक आहेत, ज्यांनी पाटीदार समाजाचे आंदोलन उभे केले होते. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर, नवीन मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांना पाटीदार मतांच्या दुव्याच्या रूपात पाहिले जात आहे.
पटेल, ज्यांच्या नेतृत्वाखाली २०२२ च्या विधानसभा निवडणुका लढल्या जातील, त्यांनी २०१० मध्ये अहमदाबाद महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून पहिली मोठी निवडणूक लढवली होती. ते नगरसेवक म्हणून पहिल्या कार्यकाळात महापालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष झाले.