Current Affairs : 15 August 2020
मोहनचंद शर्मा, नरेश कुमार यांना सातव्यांदा शौर्य पदक
- बाटला हाऊस चकमकीत २००८ मध्ये मारले गेलेले दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना सातव्यांदा मरणोत्तर शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.
- बाटला हाऊस येथे लपलेल्या पाच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ते पथकासह गेले होते. २००९ मध्ये त्यांना अशोकचक्र देऊन गौरवण्यात आले त्यानंतरही अनेकदा त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते.
- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्यपदके जाहीर करण्यात आली आहेत.
- केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडंट नरेश कुमार यांनाही काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी मोहिमेत सातव्यांदा शौर्य पदक मिळाले आहे. शौर्य पदकात जम्मू-काश्मीर पोलिसांना एकूण ८१ तर केंद्रीय राखीव पोलीस दलास ५५ पदके जाहीर झाली आहेत.
- एकूण ९२६ पदके जाहीर करण्यात आली. त्यात शौर्य पदके, विशेष सेवा व इतर पदकांचा यात समावेश आहे.
- उत्तर प्रदेश पोलिसांना २३ शौर्य पदके मिळाली असून दिल्ली पोलिसांना १६, महाराष्ट्र १४, झारखंड १२ या प्रमाणे पदके मिळाली आहे.
- केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमाडंट कुमार हे काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी पथकात काम करीत होते. त्यांनाही गौरवण्यात आले आहे. हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक व आयपीएस अधिकारी अतुल कारवाल यांना दुसऱ्यांदा गौरवण्यात आले आहे. ५५ शौर्यपदकांपैकी ४१ जम्मू-काश्मीरला, १४ नक्षलविरोधी कारवायांसाठी छत्तीसगडला मिळाली आहेत. सीमा सुरक्षा दलाचे सहायक कमांडंट विनय प्रसाद यांना मरणोत्तर शौर्यपदक जाहीर झाले आहे.
- हवाई दलातील विंग कमांडर विशाक नायर यांनाही शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे. लष्करातील लेफ्ट. कर्नल कृष्णसिंह रावत, मे. अनिल अरस व हवालदार आलोककुमार दुबे यांनाही शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींचा नवा नारा- ‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक फॉर वर्ल्ड’:
- भारताचा आज 74 वा स्वातंत्र्यदिवस असून त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.
- भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
- करोनाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो.
- 130 कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
- देशात कोरोनाच्या आधी एन 95- मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट बनत नव्हते. पण आपल्या उद्यमशीलतेनं ते करुन दाखवलं. आज आपण या गोष्टी निर्यातही करु लागलो आहे.
- आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला ‘मेक इन इंडिया’सोबतच ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे.
धोनी देशातील सर्वात लोकप्रिय खेळाडू
- टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी देशातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. त्याने लोकप्रियतेमध्ये कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले.
- भारतीय माध्यम सल्लागार कंपनी ऑरमेक्स मीडियाच्या अहवालानुसार जुलैमध्ये अव्वल १० सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंमध्ये ७ क्रिकेटपटू आहेत तर, जूनमध्ये ५ क्रिकेटर होते. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पीव्ही सिंधू अव्वल १० मधून बाहेर झाल्या.
- फुटबॉलपटू रोनाल्डो व मेसी अव्वल दहामध्ये आहेत. टेनिस स्टार सानिया मिर्झाचादेखील समावेश आहे. धोनी यंदा ट्विटरवरदेखील सर्वाधिक चर्चात राहिला आहे.
- जुलैमधील सर्वात लोकप्रिय खेळाडू
- क्रम खेळाडू
- १. महेंद्रसिंग धोनी
- २. विराट कोहली
- ३. सचिन तेंडुलकर
- ४. रोहित शर्मा
- ५. क्रिस्टियानो रोनाल्डो
- क्रम खेळाडू
- ६. सानिया मिर्झा
- ७. लियोनेल मेसी
- ८. युवराज सिंग
- ९. सौरव गांगुली
- १०. हार्दिक पंड्या