Current Affairs 15 February 2018
1) महात्मा फुले यांच्यावर तीन भाषांत चित्रपट
थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनकार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे यासाठी त्यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती नामांकित आणि व्यावसायिक संस्थेकडून करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत येत्या एक वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी ई-निविदा मागवून संस्थेची निवड करण्यात येणार आहे. महात्मा फुले यांचे संघर्षमय जीवन व कृतिशील विचारांचा आढावा या चित्रपटात घेण्यात येणार असून तो ऐतिहासिक सत्यावर आधारित असण्यासह या थोर महात्म्याचे जीवनकार्य यथार्थपणे साकारले जावे यासाठी शासनाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. दर्जेदार चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि वितरणाची सक्षम व्यवस्था असणाºया संस्थांकडून ई-निविदा मागविण्यात येऊन संस्थेची निवड करण्यात येईल. चित्रपटाचे अर्थकारण, वितरणासाठीचे अत्याधुनिक मार्ग, प्रदर्शनासाठीची नवीन तंत्रज्ञानयुक्त माध्यमे आणि मल्टिप्लेक्समुळे चित्रपट वितरणाचे बदललेले व्यावसायिक गणित याचा विचार निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. निर्मितीबरोबरच वितरण आणि प्रदर्शनासाठी व्यापक प्रसिद्धीला महत्त्व देण्यात येणार आहे. यासाठी व्यावसायिक कौशल्याचा वापर करून जनतेपर्यंत महात्मा फुले यांचे जीवनकार्य आणि विचार या चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचतील यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. शासनाकडून या चित्रपटासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
2) औद्योगिक क्षेत्रास मुद्रांक शुल्क माफ
उद्योग आणि निवासी क्षेत्राचा समावेश असलेल्या एकात्मिक औद्योगिक क्षेत्राची उभारणी करण्यासाठी यापुढे ४० हेक्टरऐवजी २० हेक्टर जागेवरच करता येणार आहे. या शिवाय, या क्षेत्रासाठी किमान क्षेत्रफळ, प्रवेश रस्ता, मुद्रांक शुल्क, वीज खरेदी आणि चटई क्षेत्र निर्देशांकामध्ये सवलती मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबतचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील उद्योग शेजारच्या राज्यांमध्ये स्थलांतरित होऊ नयेत म्हणून या सवलती देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. आता किमान १२ मीटरपर्यंत रुंदीचा प्रवेश रस्ता असल्यासही एकात्मिक औद्योगिक क्षेत्रास मान्यता मिळणार आहे. यापूर्वी किमान २४ मीटर रस्त्याची अट होती. एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामध्ये ६० टक्के (औद्योगिक वापर) व ४० टक्के (व्यापारी व निवासी वापरासह आधारभूत सुविधा) अशी विभागणी असून यामध्ये ज्या बाबींच्या वापराचा समावेश नाही, अशा बाबींचा ६० टक्क्यांमध्ये समावेश करण्यात येईल. विकासक ते प्रथम खरेदीदार यांच्यातील प्रथम व्यवहारास विशेष नगर वसाहत प्रकल्पाच्या धर्तीवर ५० टक्क्याांर्यंत मुद्रांक शुल्क माफी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एकात्मिक औद्योगिक क्षेत्रासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रेडीरेकनर दराच्या एक टक्के विकास शुल्क आकारण्यात येते.
@MMCurrentAffairs स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.
3) ‘हार्ले डेव्हिडसन’वरून भारताला इशारा
‘भारताने हार्ले डेव्हिडसन या प्रख्यात मोटारसायकलवरील आयात शुल्क ७५ टक्क्यांवरून ५० टक्के केले असले तरी ते पुरेसे नाही. भारताने हे शुल्क आणखी न घटविल्यास आम्हीदेखील भारतातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या मोटारसायकलींवर आयात शुल्काची आकारणी करू’, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. भारतातून आयात केल्या जाणाऱ्या मोटारसायकलींवर अमेरिकेत आयात शुल्क लावले जात नाही, हा मुद्दा अधोरेखित करून ट्रम्प यांनी भारताच्या करविषयक धोरणाविषयी नापसंती व्यक्त केली. ‘अमेरिकन कंपन्या जगातील अनेक देशांत उत्पादने बनवतात. अनेक स्थानिक कंपन्याही उत्पादने बनवतात. आपल्या उत्पादनांना त्या देशांत निर्यात करताना मोठ्या प्रमाणावर कर भरावा लागतो’, असे सांगत ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसन कंपनीच्या मोटारसायकलींचा मुद्दा छेडला. ‘अमेरिकन हार्ले डेव्हिडसनच्या मोटारसायकली काही देशांत निर्यात होतात. वरील उदाहरण भारताला लागू पडते,’ असे ट्रम्प यांनी म्हणताच उपस्थितांत हास्याची लकेर उठली. ‘मला एका सद्गृहस्थाने दूरध्वनीवरून माहिती दिली आणि सांगितले की, पूर्वी आम्ही हार्ले डेव्हिडसनवर १०० टक्के आयात शुल्क लावायचो. नंतर ते ७५ टक्क्यांपर्यंत खाली आणले आता ते ५० टक्के केले आहे’, असे ट्रम्प यांनी सांगितले. मात्र भारताकडून झालेली ही करकपात अजूनही व्यस्त आहे, असे सांगत अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला इशारा दिला.
4) नेपाळमध्ये शेर बहाद्दूर देबुआंनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा
राजकीय अस्थिरतेचा सामना करणा-या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. शेर बहाद्दूर देबुआ यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. खडगा प्रसाद ओली त्यांची जागा घेणार आहेत. शेर बहाद्दूर देबुआ नेपाळचे 40 वे पंतप्रधान होते. ओली यांचा लवकरच शपथविधी होईल. मागच्यावर्षी मे महिन्यात पुष्पा कमल दहल म्हणजे प्रचंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी शेर बहाद्दूर देबुआ यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला होता. अवघ्या नऊ महिन्यात त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ते नेपाळचे 39 वे पंतप्रधान होते. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे.
स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी जानेवारी २०१८ मासिक मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.