चालू घडामोडी : १५ जानेवारी २०२१
Current Affairs : 15 January 2021
पॅरिस सेंट-जर्मेनला नेयमारमुळे विजेतेपद
पॅरिस सेंट-जर्मेनने (पीएसजी) चॅम्पियन्स करंडक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावल आहे. मार्सिले संघाला २-१ असे पराभूत केले.
सेंट-जर्मेनने १०व्यांदा हा करंडक उंचावला.
धनिष्ठा झाली देशातील सर्वात लहान अवयवदाता
२० महिन्यांची धनिष्ठा सर्वात कमी वयाची अवयवदाता झाली.
दिल्लीत खेळताना ती पहिल्या मजल्यावरून पडली होती. तिला ब्रेनडेड जाहीर केल्यानंतर वडिलांनी तिचे अवयव दान केले.
यामुळे ५ जणांना नवे आयुष्य मिळाले.
बंगळुरू जगातील सर्वात जलद वाढणारे टेक हब
बंगळुरू जगातील सर्वात वेगाने वाढणारे तंत्रज्ञान हब झाले आहे.
या यादीत दुसऱ्यावरून पाचव्या क्रमांकावर लंडन, म्युनिच, बर्लीन आणि पॅरिससारखत युरोपीय शहरे आहेत.
दुसरीकडे, भारताची आर्थिक राजधानी मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे.
हे आकडे डीलरूम डॉट कॉम नावाच्या संस्थेने जारी केले आहेत. त्याचे विश्लेषण लंडनचे महापौर सादिक खान यांची आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक संस्था लंडन पार्टनर्सने केले आहे.
लंडनमध्ये जारी झालेल्या या अहवालात नमूद केले की, २०१६ नंतर बंगळुरू जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रगल्भ तंत्रज्ञान इकोसिस्टिम्सच्या रूपात पुढे आले आहे.
आकडेवारीनुसार, बंगळुरूत इन्व्हेस्टमेंट २०१६ च्या १.३ अब्ज डॉलरच्या(९४९८ कोटी रु.) तुलनेत २०२० मध्ये पाच पटींहून जास्त वाढत ७.२ अब्ज डॉलरपेक्षा(५२ हजार कोटी रु.) जास्त पोहोचले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये या अवधीत गुंतवणूक ७० कोटी डॉलरवरून(५ हजार कोटी रु.) १.७ पट वाढून १.२ अब्ज डॉलरवर(८ हजार कोटी रु.) पोहोचली आहे. दुसरीकडे, ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये या अवधीत गुंतवणूक तिप्पट वाढली आहे.
बंगळुरू यासोबत टेक व्हेंचर कॅपिटलिस्ट इन्व्हेस्टमेंट प्रकरणात जगात आठव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर बीजिंग आणि दुसऱ्या क्रमांकावर सॅन फ्रान्सिस्को आहे. यानंतर न्यूयॉर्क, शांघाय आणि लंडन आहेत. या यादीत मुंबई २१ व्या क्रमांकावर अाहे.
लंडन-पॅरिसपेक्षाही आघाडी, डीलरूम डॉम कॉमचे आकडे