Current Affairs : 16 August 2020
महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
१५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे
धोनीच्या कारकिर्दीवर एक नजर
एकूण सामने – ५३८
एकूण धावा – १७,२६६
शतकं – १६
अर्धशतकं – १०८
षटकार – ३५९
झेल – ६३४
स्टंपिंग – १९५
निर्यातीमध्ये दहा टक्के घट; जुलै महिन्यातील स्थिती
सलग पाचव्या महिन्यात देशाच्या निर्यातीमध्ये १०.२१ टक्क्यांनी घट झाली आहे. याबरोबरच आयातही कमी झाल्याने आयात – निर्यात व्यापारातील दरी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.
त्यानुसार जुलै महिन्यात देशाची निर्यात १०.२१ टक्क्यांनी घसरून २३.६४ अब्ज डॉलरवर आली आहे.
देशातून होणारी पेट्रोलियम पदार्थ, चामडे व चामड्याच्या वस्तू, तसेच रत्ने आणि दागिने यांची निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने एकूण निर्यातीमध्ये घट झाली आहे.
याच कालावधीत देशाच्या आयातीमध्येही २८.४ टक्क्यांनी घट झाली आहे. जुलै महिन्यात देशात २८.४७ अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात करण्यात आली. देशाची आयात तसेच निर्यात या दोन्हीमध्ये घट झाली असल्याने व्यापारातील तूटही आता ४.८३ अब्ज डॉलरवर आली आहे.
मागील वर्षी जुलै महिन्यातच व्यापारातील तूट १३.४३ अब्ज डॉलर होती. देशाच्या इंधन आयातीमध्ये ३१.९७ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र याच काळात सोन्याच्या आयातीमध्ये मात्र ४.१७ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली आहे. एप्रिल ते जुलै या ४ महिन्यांमध्ये निर्यात ३०.२१ टक्क्यांनी घसरूण ७४.९६ अब्ज डॉलर एवढी झाली आहे. त्याचबरोबर या काळात आयातीमध्येही ४६.७ टक्क्यांनी घट झाली असून, देशात ८८.९१ अब्ज डॉलरच्या वस्तू आल्या आहेत. या काळात आयात निर्यात तफावत १३.९५ अब्ज डॉलर एवढी राहिली.
धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
धोनीपाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 2018 मध्ये रैना आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर 2015 मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला.
रैनाच्या निवृत्तीपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेच्या काही वेळातच रैनानंही आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
रैनानं आतापर्यंत भारतासाठी 18 कसोटी सामने, 226 एकदिवसीय सामने आणि 78 टी-20 सामने खेळले आहेत. तर त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये 5,615 धावा आहेत.