Current Affairs : 16 December 2020
‘आयसीसी’ कसोटी फलंदाजांची यादी जाहीर
‘आयसीसी’ कसोटी क्रमवारीच्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (९११ गुण) अग्रस्थानावर आहे, तर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार के न विल्यम्सनची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लबूशेन, पाकिस्तानचा बाबर आझम आणि दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नर हे अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.
गोलंदाजांच्या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा (७७९ गुण) आणि ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन (७५६ गुण) अनुक्रमे आठव्या आणि १०व्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ९०४ गुणांसह अग्रस्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा तिसऱ्या आणि अश्विन सहाव्या स्थानावर आहेत.
इजिप्तमधील स्फिंक्स 4500 वर्षांपेक्षा प्राचीन
इजिप्तमधील महाकाय पिरॅमिड आणि स्फिंक्स हे जगाचे नेहमीच आकर्षण राहिले आहे.
आता या स्फिंक्सच्या प्राचीनपणाबाबत नवीन संशोधन केले जात आहे. सध्याच्या मान्यतेप्रमाणे स्फिंक्स 4500 वर्षे प्राचीन आहे, पण या नवीन संशोधनाप्रमाणे स्फिंक्सचा इतिहास त्यापेक्षा खूपच जास्त पुरातन असावा.
इजिप्तमधील गिजा शहरात असलेली स्फिंक्स ही सिंहाचे शरीर आणि मानवी चेहरा असलेली एक महाकाय आकृती आहे. नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेली ही आकृती पिरॅमिडच्या रक्षणासाठी बनवण्यात आल्याची मान्यता आहे.
लेखक आणि संशोधक अनएक्सटी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे स्फिंक्सचे वय इसवीसन पूर्व दहा हजारपेक्षा जास्त असावे. प्रख्यात संशोधक आरए श्वॉलर डि लूबिक्ज यांचा हवाला देऊन अनएक्सटी यांनी हि माहिती प्रसिद्ध केली आहे.
इजिप्तमध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन आणि त्याचा या स्फिन्क्सवर होणार परिणाम लक्षात घेऊन हे वय ठरवण्यात आले आहे. स्फिंक्सवर पावसाच्या पाण्यामुळे सध्या ज्या खुणा तयार झाल्या आहेत त्या गेल्या पाच हजार वर्षात तयार झाल्या असण्याची शक्यता नाही. त्यामुळे या खुणा त्यापूर्वी तयार झाल्या असून तो कालावधी दहा हजार वर्षाचा असू शकतो.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे ‘डाक पे’ डिजिटल पेमेंट अॅप लाॅन्च
भारतीय डाक विभाग (India Post) आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ( India Post Payments Bank) ‘डाक पे’ ( DakPay) हे एक नवीन डिजिटल पेमेंट अॅप लाॅन्च केले आहे.
कोव्हिड-19 महामारी विरूध्दच्या लढाईदरम्यान इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने केलेल्या कामाचे तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लाॅन्च झाल्यापासून 2 वर्षापेक्षा कमी कालावधीत 3 कोटी खात्यांचा टप्पा गाठला.
यंदा प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे!
प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे आमंत्रित केले होते.
तब्बल 27 वर्षानंतर ब्रिटीश पंतप्रधान पुढच्या महिन्यात भारताच्या 70व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यापूर्वी जॉन मेजर हे 1993 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाले होते