⁠  ⁠

चालू घडामोडी : १६ जानेवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 16 January 2020

घटनादुरुस्तीच्या प्रस्तावामुळे रशिया सरकार विसर्जित

putin

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बुधवारी घटनादुरुस्ती करण्याची घोषणा केली. त्यामुळे रशिया सरकार विसर्जित करण्यात आले असून, पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांचा राजीनामा पुतिन यांनी मंजूर केला.
अध्यक्षपदाचा कार्यकाळ २०२४ मध्ये समाप्त झाल्यानंतरही सत्तासूत्रे आपल्याकडेच राहतील, याची तजवीज पुतिन यांनी केल्याचे मानले जाते.
रशिया सरकारच्या संरचनेत बदल करण्याच्या अध्यक्ष पुतिन यांच्या प्रस्तावामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा दिमित्री मेदवेदेव यांनी केली. पुतिन यांनी त्यांचा राजीनामा मंजूर करून त्यांची अध्यक्षीय सुरक्षा परिषदेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती केली. त्यानंतर मिखाईल मिशुस्टीन यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले आहे.
सध्या पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या नियुक्तीचे अधिकार अध्यक्षांकडे आहेत. मात्र, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ सदस्यांची निवड करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना देण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यात येत असल्याचे पुतिन यांनी जाहीर केले. त्यामुळे संसद, पंतप्रधान आणि मंत्र्यांना अधिक अधिकार प्राप्त होतील, असे पुतिन यांनी सांगितले. मात्र, त्याच वेळी संसदीय प्रणालीद्वारे सरकार चालविल्यास ते स्थिर राहू शकत नसल्याने पंतप्रधान, मंत्र्यांना बडतर्फ करण्याचे आणि सर्वोच्च संरक्षण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार अध्यक्षांकडे कायम राहायला हवेत, असे पुतिन म्हणाले.
पुतिन यांचा अध्यक्षीय कार्यकाळ २०२४ मध्ये संपणार आहे. ते वीस वर्षांहून अधिक काळ रशियाच्या अध्यक्षपदी आहेत. अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच घटनादुरुस्तीद्वारे सरकारची संरचना बदलून सत्तेची सूत्रे स्वत:कडे ठेवण्याचा पुतिन यांचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : कार्लसनचा आणखी एक विश्वविक्रम

spt01 5

विश्वविजेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने आपल्या नावावर आणखी एक विश्वविक्रम नोंदवला. सर्वाधिक १११ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम कार्लसनने त्याच्या नावे केला आहे. याआधी हा विश्वविक्रम हॉलंडचे सर्जी टिव्हियाकोव यांच्या नावावर होता. जो १५ वर्षांपासून अबाधित होता. कार्लसन सध्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत सलग चौथ्या फेरीत कार्लसनने बरोबरी पत्करली. चौथ्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन वॅन फॉरेस्टविरुद्धचा डाव कार्लसनने बरोबरीत सोडवला.

रस्ते सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी न्या. सप्रे

SAPRE 1

रस्ते सुरक्षा समितीवर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधिश ए. एम. सप्रे यांची निवड केली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले. माजी. न्यायाधिश आणि या समितीचे सध्याचे प्रमुख के.एस.पी राधाकृष्ण यांनी या पदावर कार्यरत राहण्यास असमर्थता व्यक्त केल्याने त्यांच्या जागी सप्रे यांची निवड करण्यात आली.
या समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळण्यात काही अडचणी असल्याचे न्यायाधिश (निवृत्त) राधाकृष्णन यांनी 16 ऑक्‍टोबर 2019 रोजी कळवले होते, असे सरन्यायाधिश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

जगातील श्रेष्ठ पर्यटनस्थळांमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’

View image on Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या केवडिया स्थित ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’च्या पुतळ्याला जगातील आठ श्रेष्ठ पर्यटनस्थळांमध्ये स्थान मिळाले आहे.
‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’चा जगातील आठ आश्चर्यांपैंकी एक आठ देशांची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशनने (SCO) घोषीत केल्याची ही माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
नर्मदा धरणापासून जवळ असेलला सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला आहे. हा पुतळा जगात सर्वात उंच आहे. गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. सरदार पटेल यांचे हे भव्य शिल्प साकारण्यासाठी सुमारे 2 हजार 389 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळं केवडिया हे गुजरातमधील छोटे शहर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. हा पुतळा पाहण्यासाठी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात.

दीपक चहरच्या हॅटट्रिकला ICC चा पुरस्कार

क्रिकेट जगतातील सर्वोच्च मंडळ असलेल्या जागतिक क्रिकेट परिषदेने (ICC) 2019 या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये भारताच्या दीपक चहरला टी २० क्रिकेटमधील वर्षभरातील सर्वोत्तम कामगिरीचा (T20I Performance of the Year) पुरस्कार मिळाला. बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेत त्याने ७ धावांत ६ बळी टिपले. त्या कामगिरीसाठी दीपक चहरला पुरस्कार मिळाला.

रोहित शर्मा, विराट कोहली याला ICC कडून पुरस्कार

टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याला ICC कडून सर्वोकृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूच्या (ODI Cricketer of the Year) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१९ या वर्षात दमदार खेळी करत रोहितने सर्वाधिक एकदिवसीय धावा ठोकल्या. एका वर्षात त्याने एकूण सात शतके लगावली. त्यापैकी पाच शतके त्याने World Cup 2019 मध्ये झळकावली होती. रोहितच्या एकदिवसीय क्रिकेटमधील वर्षभराच्या कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
याशिवाय भारतीय कर्णधार विराट कोहली याला त्याने केलेल्या एका स्तुत्य कामगिरीसाठी ICC चा खिलाडूवृत्तीचा सन्मान करणारा पुरस्कार (ICC spirit of cricket) देण्यात आला आहे.

Share This Article