Current Affairs : 16 January 2021
भारतीय अॅथलेटिक्स संघाच्या प्रशिक्षकपदी स्नेसारेव्ह
बेलारूसच्या निकोलाय स्नेसारेव्ह यांची भारतीय अॅथलेटिक्स संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) नियुक्ती केली आहे.
दोन वर्षेआधी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्नेसारेव्ह यांची सप्टेंबपर्यंत पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे.
मध्यम आणि लांब पल्ल्याच्या धावपटूंना ते मार्गदर्शन करतील.
टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला ३००० मीटर स्टिपलचेस धावपटू अविनाश साबळेला ते मार्गदर्शन करत आहेत.
तसेच ऑलिम्पिककरिता पात्र ठरण्यासाठी उत्सुक असलेल्यांनाही ते मार्गदर्शन करतील.
इतिहासात सर्वात उष्ण वर्ष २०२० : नासा
नासानुसार, २०२० इतिहासात सर्वात जास्त उष्ण वर्ष राहिले आहे.
२५० वर्षांपूर्वी झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर कार्बन डायऑक्साइड पातळी ५०% पर्यंत वाढली आहे.
मिथेनचे प्रमाण दुपटीहून जास्त झाले आहे. यामुळे पृथ्वी १ अंश आणखी उष्ण झाली आहे. जागतिक हवामान संघटनेनेही २०२० वर्ष उष्ण ठरवले.