Current Affairs 16 July 2020
सिंगापूरचा जीडीपी ४१ टक्क्यांनी घसरला
- करोनाचा हाहाकार सगळ्या जगात जाणवतो आहे. अशात लॉकडाउन जाहीर केला जाणं ही अनिवार्य बाब आहे. मात्र त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो आहे.
- सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेची वाताहात झाली आहे कारण त्यांचा जीडीपी १० किंवा १२ नाही तर तब्बल ४२ टक्क्यांनी घसरला आहे. आशियाई देशांमध्ये सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला बसलेला हा सर्वात मोठा फटका आहे. Bloomberg ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
- मागील तिमाहीत जीडीपी ४१.२ टक्के म्हणजे जवळपास ४२ टक्के खाली गेला आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा निचांक आहे असं सिंगापूरच्या वाणिज्य व्यापार मंत्र्यांनी म्हटलं आहे.
हेमांग अमिन बीसीसीआयचे हंगामी सीईओ
- राहुल जोहरी यांचा सीईओ पदाचा राजीनामा स्विकारल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे Chief Operating Officer हेमांग अमिन यांची बीसीसीआयच्या हंगामी सीईओ पदावर नियुक्ती केली आहे.
- पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत बीसीसीआयने सीईओ पदावर नवीन नियुक्ती करणं अपेक्षित आहे. २०१७ पासून हेमांग अमिन आयपीएलमध्ये Chief Operating Officer पदावर काम करत आहेत.
इग्लंडच्या उच्चायुक्तांनी आपल्या मुलीचे नाव ठेवले ‘इंडिया’
- फिलिप बार्टन यांची भारतातील इंग्लंडचे उच्चायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- बुधवारी त्यांनी आवश्यक असलेले डिप्लोमॅटिक आयडेंटिटी पत्र देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सुपूर्द केले आहे.
- इंग्लंडच्या उच्चायु्क्तांचे भारताशी एक विशेष असे नाते आहे. विशेष सांगायचे म्हणजे या उच्चायुक्तांनी आपल्या मुलीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवले आहे. या उच्चायुक्तांच्या आईचा जन्म हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झाला होता, हेही विशेष.
उत्तराखंडात देशातील पहिली रामायण वाटिका
- उत्तराखंडातील हल्द्वानी येथे पहिली रामायण वाटिका सुरु झाली आहे.
- उत्तराखंड वानिकी संशोधन संस्थेच्या मुख्यालयात एक एकर जागेवर ही वाटिका उभारण्यात आली आहे. येथून वाल्मिकी रामायणातील काही माहिती नसलेली बाजू समाेर आणली जात आहे.
- रामायणात चित्रकूट, दंडकारण्य, पंचवटी, किष्किंधा, अशोक वाटिका व द्रोणगिरी या सहा वनातील झाडे येथे लावली आहेत.
मुकेश अंबानी ठरले जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती
- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक (Reliance Industries Chairman, Mukesh Ambani) मुकेश अंबानी हे जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
- गुगलच्या सह-संस्थापक लॅरी पेजला(Google Co-Founder Larry Page) मागे टाकत त्यांनी हे स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार(Bloomberg Billionaire Index), मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता 72.4 अब्ज डॉलर्स आहे.
- यापूर्वी मुकेश अंबानी यांनी या यादीत 8 व्या क्रमांकावर असलेल्या जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वारेन बफे यांची जागा घेतली आहे. मुकेश अंबानी हे संपूर्ण आशिया खंडातील या श्रीमंतांच्या यादीत असलेले पहिल्या 10 क्रमांकामधील एकमेव व्यक्ती आहेत.