⁠
Uncategorized

चालू घडामोडी – १६ जून २०१६

देश-विदेश

चीनकडे तिबेटचे स्वातंत्र्य मागितले नाही – दलाई लामा
# आपण चीनकडून तिबेटचे स्वातंत्र्य मागितले नसल्याचे तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी सांगितले. दलाई लामा यांनी बुधवारी बराक ओबामा यांची भेट घेतली. या भेटीबद्दल व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी सांगितले की, या भेटीमुळे तिबेट संदर्भातील अमेरिकेच्या भूमिकेवर कोणताही परिणाम झालेला नाही. ओबामा यांच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात दलाई लामा यांनी चौथ्यांदा त्यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीमध्ये अन्य कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबद्दल कसलीही माहिती देण्यास अर्नेस्ट यांनी नकार दिला. चालू घडामोडी, Current Affairs, chalu ghadamodi 

संसदीय सचिव नियुक्त्यांचे केजरीवाल यांच्याकडून समर्थन
# काँग्रेस आणि भाजपने संसदीय सचिव म्हणून आमदारांच्या नियुक्तया यापूर्वी केल्या होत्या तेव्हा ती कृती घटनाबाह्य़ का ठरली नाही, असे आश्चर्य व्यक्त करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रश्नावरून लक्ष्य केले आणि आपच्या २१ आमदारांची संसदीय सचिव म्हणून करण्यात आलेल्या नियुक्तयांचे जोरदार समर्थन केले. चालू घडामोडी, Current Affairs, chalu ghadamodi 

पंतप्रधानांकडून योग दिनाचा आढावा
# पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग दिनाचा आढावा घेतला. चंदिगडमध्ये २१ जून रोजी योग दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम घेण्यात येणार असून त्यासाठी १ लाख जणांनी नोंदणी केली आहे. मोदी चंदिगडमधील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘आयुष’चे सचिव अजित शरण यांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी ३० हजार नागरिक नोंदणी करणार असल्याने सहभागींची संख्या १ लाख २० हजार होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या कार्यक्रमासाठी १४ मे पासून नोंदणी सुरू झाली. ८ जूनपर्यंत ९६ हजार जणांनी नोंदणी केल्याचे चंदिगडचे उपायुक्त अजित जोशी यांनी सांगितले. योगासाठी राज्यात १८० ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आल्याचे विनिता गुप्ता यांनी सांगितले. चालू घडामोडी, Current Affairs, chalu ghadamodi 

हेलिकॉप्टर खरेदी करार, ईडीकडून नवे आरोपपत्र दाखल
# ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी लाचप्रकरणातील कथित मध्यस्थ ख्रिस्तियन मायकेल आणि त्याच्या काही भारतीय साथीदारांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नव्याने आरोपपत्र दाखल केले आहे. जवळपास १३०० पानांहून अधिकचे हे आरोपपत्र विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. ख्रिस्तियन मायकेल याला ऑगस्टा वेस्टलॅण्डकडून जवळपास २२५ कोटी रुपये मिळाल्याचे तपासातून उघड झाले असून हे पैसे म्हणजे अन्य काही नसून लाचच आहे, असे संस्थेने म्हटले आहे. चालू घडामोडी, Current Affairs, chalu ghadamodi 

भारताला विशेष दर्जा देण्याबाबतचे विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये नामंजूर
# पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यातील चर्चेनंतर भारताला ‘मेजर डिफेन्स पार्टनर’चा दर्जा देण्यात आला असला तरी भारताला व्यूहात्मक आणि संरक्षणात्मक क्षेत्रात जागतिक भागीदार म्हणून विशेष दर्जा देण्याची तरतूद असलेले विधेयक बुधवारी अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंजूर होऊ शकले नाही. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ सिनेटर जॉन मॅककेन यांनी नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन अ‍ॅक्ट (एनडीएए-१७) मध्ये दुरुस्ती सुचविली होती. सदर दुरुस्ती मंजूर झाली असती तर भारताला व्यूहात्मक आणि संरक्षणात्मक क्षेत्रातील जागतिक भागीदार देश असा दर्जा मिळणार होता. चालू घडामोडी, Current Affairs, chalu ghadamodi 

अर्थव्यवस्था

राज्यात ‘सेझ’चे निम्मे क्षेत्र वापराविनाच!
# राज्यात आतापर्यंत तब्बल ७० विशेष आर्थिक क्षेत्रांची (सेझ) अधिसूचना रद्द करण्यात आल्यानंतर त्या जमिनीचा वापर करण्यासाठी एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासंबंधीचे धोरण ठरवण्यात आले असले, तरी अधिग्रहित करण्यात आलेल्या ६ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रांपैकी ३ हजार ५९ हेक्टर जमीन विनावापर पडून असल्याचे चित्र आहे. राज्यात २००६ पासून विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. आतापर्यंत २४१ ‘सेझ’चे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र, ७० ‘सेझ’ची अधिसूचना एकतर रद्द करण्यात आली किंवा मागे घेण्यात आली. चालू घडामोडी, Current Affairs, chalu ghadamodi 

जागतिक अव्वल ५० बँकांमध्ये स्थान देणाऱ्या स्टेट बँक विलीनीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
# पाच सहयोगी स्टेट बँका व दोन अडीच वर्षे जुन्या भारतीय महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ही मालमत्तेबाबत जगातील पहिल्या ५० बँकांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. एकत्रीकरणामुळे देशातील सार्वजनिक बँकेची एकूण मालमत्ता ३७ लाख कोटी रुपये होणार असून तिच्या एकत्रित शाखांची संख्या २२,५०० तर एटीएमचे जाळे ५८,००० पर्यंत विस्तारणार आहे. स्टेट बँकेचे सध्या विविध ३६ देशांमध्ये १९८ कार्यालयांद्वारे अस्तित्व आहे. बुधवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विलीनीकरणाच्या शिक्कामोर्तबतेनंतर मुख्य स्टेट बँकेच्या पाचपैकी भांडवली बाजारात सूचिबद्ध तीन सहयोगी बँकांचे समभाग मूल्य २० टक्क्य़ांपर्यंत झेपावले. तर स्टेट बँकेचा समभाग सत्रअखेर ४ टक्क्य़ांपर्यंत वाढला. चालू घडामोडी, Current Affairs, chalu ghadamodi 

बँक ऑफ महाराष्ट्रला ‘स्कॉच’ पुरस्कार
# बँक ऑफ महाराष्ट्रला वित्तीय सर्वसमावेशकतेच्या कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०१६’ नुकताच मुंबई शेअर बाजार इमारतीतील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. स्कॉच पुरस्कारांची निवड पद्धती अत्यंत पारदर्शक असून यामध्ये तज्ज्ञांकडून प्रकल्प समीक्षा, जाणकार समीक्षकाद्वारे तपासणी, फेरतपासणी, मतदान पद्धती तसेच प्रत्यक्ष सहभागींकडून मूल्यमापन अशा वेगवेगळ्या कसोटय़ा पार करून आलेल्या व्यक्ती वा संस्थांना पुरस्कारास पात्र समजले जाते. बँक ऑफ महाराष्ट्रचे वित्तीय समावेशन तंत्रज्ञान, ‘बँक मित्रां’ची नेमणूक, वित्तीय समावेशनअंतर्गत होणाऱ्या व्यवहारांची संख्या, बचत खात्यांना आधार जोडणीचे प्रमाण, तसेच बँक मित्रांना देण्यात येणाऱ्या वेतनाची नियमितता आदी बाबतीत बँकेच्या सरस कामगिरीमुळे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्कॉच समूहाचे अध्यक्ष समीर कोचर व सेबीचे पूर्ण वेळ सदस्य राजीवकुमार आगरवाल यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. बँकेच्या वित्तीय समावेशन विभागाचे उपमहाव्यवस्थापक चारुदत अर्काटकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. चालू घडामोडी, Current Affairs, chalu ghadamodi 

Related Articles

Back to top button