⁠
Uncategorized

चालू घडामोडी – १६ मार्च २०१६

महाराष्ट्र

भिकारी मुलांचे पुनर्वसन सरकारवर बंधनकारक
राज्यातील मोठ्या शहरांत भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन करणे व त्यांना त्यांचे शिक्षणासह सर्व हक्क मिळवून देणे सरकारवर बंधनकारक आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. याबाबत सरकारला भूमिका मांडण्यासही खंडपीठाने सांगितले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी मंगळवारी न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्यासमोर झाली. मुंबईत अशी किमान 37 हजार 59 मुले असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

क्रीडा

हुलकावणीचा बादशाह हरपला!
सीताराम ऊर्फ मंच्या शिंदे यांचे १३ मार्च २०१६ रोजी सकाळी १० वा. वयाच्या ७२व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू असलेले शिंदे यांनी सिंहगड मंडलाकडून आपल्या खेळाची सुरुवात केली होती. एअर इंडिया या व्यावसायिक संघाकडून खेळताना त्यांनी माजी महापौर महादेव देवळे यांच्या बरोबरीने संघ उभारणीचे मोलाचे कार्य केले. आज एअर इंडिया संघ दिसतो तो अशा लोकांच्या समर्पणामुळे. परंतु उभ्या महाराष्ट्रात त्यांची ओळख हुलकावणीचा बादशहा अशीच आहे.Current Affairs 16 march 2016

चौथ्या फेरीत कर्जाकिनचा आनंदवर सनसनाटी विजय
भारताच्या विश्वनाथन आनंद याची जागतिक कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेतील अपराजित राहण्याची मालिका चौथ्या फेरीत खंडित झाली. रशियाच्या सर्जी कर्जाकिन याने त्याला पराभवाचा धक्का दिला. mpsc chalu ghadamodi 2016

आशियाई ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर
क्विनान, चीनमध्ये होणार असलेल्या आशियाई बॉक्सिंग ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. जागतिक बॉक्सिंग महासंघातर्फे नेमलेल्या अस्थायी समितीने भारतीय संघ जाहीर केला.
पुरुष : एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो), गौरव बिधुरी (५२), शिवा थापा (५६), धीरज (६०), मनोज कुमार (६४), मनदीप जांगरा (६९), विकास कृष्णन (७५), सुमित संगवान (८१), परवीन कुमार (९१), सतीश कुमार (९१ किलोपेक्षा अधिक). महिला : एम. सी. मेरी कोम (५१), एल. सरिता देवी (६०), पूजा राणी (७५)

अर्थव्यवस्था

नफेखोरीने घसरण
आठवडय़ातील दुसऱ्या दिवशीच्या सत्रारंभीच वरच्या टप्प्यावर असलेल्या भांडवली बाजारात व्यवहाराच्या समाप्तीस नफेखोरी उमटली. परिणामी सेन्सेक्स सोमवारच्या तुलनेत २५३.११ अंशांनी खाली येत २४,५५१.१७ वर येऊन ठेपला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने त्याचा ७,५००चा वरचा टप्पाही सोडला. प्रमुख निर्देशांकात ७८.१५ अंश घसरण होऊन निफ्टी ७,४६०.६० वर बंद झाला.

‘इन्फीबीम’च्या रूपात तंत्रज्ञान नवोद्यमींचा भांडवली बाजारात श्रीगणेशा!
फ्लिफकार्ट, स्नॅपडील यांसारख्या ई-व्यापार संकेतस्थळांची स्पर्धक असलेल्या ऑनलाइन शॉपिंगमधील इन्फीबीम इन्कॉर्पोरेशनने भांडवली बाजारात प्रवेशाचा श्रीगणेशा प्रस्तावित केला आहे. येत्या २१ मार्चपासून कंपनीची सार्वजनिक भागविक्री खुली होत असून, त्यायोगे ४५० कोटी रुपये उभारण्याचा तिचा मानस आहे. mpsc gk in marathi

(न्यूज सोर्स – लोकसत्ता आणि सकाळ)

Related Articles

Back to top button