मुंबईच्या सन्नी पवार ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार
- मुंबईच्या कलिना येथील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सन्नी पवार या अकरा वर्षीय मुलाने चित्रपट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.
- १९व्या न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार जिंकला आहे.
- ‘चिप्पा’ या चित्रपटासाठी त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
सन्नीने यापूर्वी ऑस्ट्रेलिअन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या २०१६मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे.
‘चंद्रयान-२’ मोहिमेत १३ पेलोडसह नासाचा प्रयोगही समाविष्ट
- भारताच्या चंद्रयान- २ मोहिमेत १३ पेलोडचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय त्यात नासाच्या एका प्रयोगाचाही समावेश आहे, असे सांगण्यात आले. भारताचे चांद्रयान जुलैत सोडले जाणार आहे.
- इस्रोने म्हटले आहे, की चंद्रयान मोहिमेत एकूण तेरा पेलोड असून त्यात ८ ऑर्बिटरमध्ये, तीन लँडरमध्ये तर दोन रोव्हरमध्ये असतील.
- अवकाशयानाचे तीन भाग असून त्यात ऑर्बिटर व लँडर (विक्रम) तसेच रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे. ९ जुलै ते १६ जुलै २०१९ मध्ये उड्डाणास अनुकूल काळ असून हे यान ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. ऑर्बिटरचा वेग १०० कि.मी राहील. लँडर विक्रम हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवतरण करणार आहे. रोव्हर प्रज्ञान हे काही प्रयोग करणार आहे.
जगातील तिसऱ्या उंच शिखरावर पुण्यातील १० जणांनी फडकावला तिरंगा
- पुण्यातील दहा गिर्यारोहकांनी जगातील तिसरे आणि भारतातील सर्वात उंच कांचनजुंगा शिखर सर करत तिरंगा फडकावला आहे. गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील दहा जणांच्या संघानं ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आठ हजार ५८६ मीटर उंच असलेले माउंट कांचनजुंगा उंचीनुसार जगातील तिसरे तर भारतातील पहिले शिखर आहे.
- आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे या गिरीप्रेमींनी शिखराची चढाई केली आहे. ही भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम ठरली आहे.
- पर्यावरण संवर्धनाचं संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेले नमुने (अतिउंचावरील माती आणि दगड) या मोहिमेत गोळा करण्यात आले.
इगोर स्टिमॅक भारतीय फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक
- भारतीय फुटबॉल महासंघाने इगॉर स्टिमॅक यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे.
- आगामी २ वर्षांसाठी स्टिमॅक यांना करारबद्ध करण्यात आलेलं आहे. स्टिमॅक हे क्रोएशियन संघाचे प्रशिक्षक होते.
- आपल्या संघाला २०१४ च्या फिफा विश्वचषकासाठी पात्रता मिळवून देण्यात स्टिमॅक यशस्वी झाले होते.
- ५ जूनपासून थायलंडमध्ये सुरु होणारा किंग्ज चषक ही स्टिमॅक यांच्यासमोरची पहिली परीक्षा असणार आहे
पहिल्यांदाच क्षेपणास्त्र निर्यात करणार भारत
- भारत आतापर्यंत केवळ शस्त्रास्त्रांची आयात करत होता, पण आता निर्यातीच्या क्षेत्रात उतरणार आहे. दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये आणि आखातात क्षेपणास्त्रांची पहिल्या टप्प्यातली निर्यात यावर्षी होणार आहे.
- अनेक दक्षिण पूर्वेकडचे आशियाई देश ही क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास उत्सुक आहेत. हा आयातीचा पहिला टप्पा असेल. त्यानंतर आखाती देशांमध्येही क्षेपणास्ज्ञ निर्यातीची चांगली संधी आहे.’
२३ वेळा एव्हरेस्ट सर; शेरपाचा विक्रम!
- नेपाळच्या कामी रिता शेरपा यांनी एव्हरेस्ट एक-दोन नव्हे तर तब्बल २३ वेळा सर केला आहे! ४९ वर्षीय कामी रिता यांनी २३ वेळा एव्हरेस्ट सर करून आपलाच विश्वविक्रम मोडला आहे.
- कामी रिता शेरपा यांनी मागील वर्षी २२ वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला होता. बुधवारी सकाळी कामी रिता अन्य शेरपांसोबत ८,८५० मीटर उंच शिखरावर पोहोचले.
- ‘कामी रिता शेरपा यांनी नेपाळच्या दिशेकडून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी माउंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई करून या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याचा आपलाच विक्रम मोडित काढला.
- कामी रिती यांनी १९९४ मध्ये पहिल्यांदा माउंट एव्हरेस्टवर चढाई सुरू केली. १९९५ मध्ये सोबतचा गिर्यारोहक आजारी पडल्याने शेरपांना शिखर गाठता आलं नाही. २०१७ मध्ये २१ वेळा एव्हरेस्ट सर करणारे ते तिसरे गिर्यारोहक ठरले. यापूर्वी अपा शेरपा आणि फुरबा ताशी शेरपा यांनी हा विक्रम केला होता. २०१८ मध्ये कामी यांनी हा विक्रम मोडून सर्वाधिक २२ वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला.