---Advertisement---

चालू घडामोडी : १६ नोव्हेंबर २०२०

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Current Affairs : 16 November 2020

आरसेप व्यापार करारावर १५ प्रमुख देशांच्या स्वाक्षऱ्या

China, 14 other countries sign world's largest free trade agreement; India  not a signatory

‘आरसेप’ म्हणजे प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी (रिजनल कॉम्प्रेहेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप) करारावर आशिया—पॅसिफिकमधील चीनसह पंधरा प्रमुख देशांनी स्वाक्षरी केली आहे.
हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार मानला जात आहे.
‘आसियान’ (‘असोसिएशन ऑफ साउथ इस्ट एशियन नेशन्स’) देशांच्या वार्षिक परिषदेच्यावेळी रविवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
करोनामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी या देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून भारत व अमेरिका मात्र त्यापासून दूर राहिले आहेत.
जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नात या देशांचा वाटा ३० टक्के आहे.
२०१२ मध्ये आरसेप कराराची संकल्पना मांडली गेली होती. या करारावर आग्नेय आशिया शिखर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यामुळे करोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थांना सावरण्याची संधी मिळणार आहे.

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन

veteran bengali actor soumitra chatterjee passes away

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी याचे निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते.
सौमित्र चटर्जी हे बंगाली कलाविश्वातील एक नावाजलेलं नाव होतं. त्यांनी १९५९ मध्ये अपुर संसार या चित्रपटाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली.
प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत त्यांनी जवळपास १४ चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
विशेष म्हणजे फ्रान्समधील सर्वात मानाचा Ordre des Arts et des Lettres या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
त्याचसोबत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आलं होतं. इतकंच नाही तर ३ वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार , ७ फिल्मफेअर व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

हॅमिल्टनला सातवे जगज्जेतेपद

hamilton

ओलसर अशा ट्रॅकवर निर्विवाद वर्चस्व गाजवत तुर्कीश ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावले आणि सातव्यांदा जगज्जेता होण्याचा मान मिळवला.
या कामगिरीसह त्याने मायकेल शूमाकर याच्या सात जगज्जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
या मोसमातील १०वी शर्यत जिंकत हॅमिल्टनने कारकीर्दीत ९४ जेतेपदे पटकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
२०१३ मध्ये मर्सिडीझ संघातील शूमाकरची जागा घेतल्यानंतर हॅमिल्टनने सहा जगज्जेतेपदे मिळवली आहेत.
मॅकलॅरेनकडून खेळताना त्याने २००८ मध्ये जगज्जेतेपद पटकावले होते.
सातव्या जगज्जेतेपदासाठी हॅमिल्टनला या शर्यतीत आपला सहकारी वाल्टेरी बोट्टासपेक्षा पुढे स्थान पटकावण्याची गरज होती. मात्र हॅमिल्टनने या शर्यतीचे जेतेपद मिळवत जगज्जेतेपदावर नाव कोरले.
खराब कामगिरी करणाऱ्या बोट्टासला १४व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

जपानच्या ताकाहाशीचा १० हजार मी. वाॅक स्पर्धेत विक्रम नाेंद

जपानच्या एकी ताकाहाशीने १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत जगातील सर्वोत्कृष्ट वेळ नोंदवली.
२७ वर्षीय ताकाहाशीने जुनतेंदो विद्यापीठाच्या लांब पल्ल्याच्या शर्यतीत ३७ मिनिट २५.२१ सेकंदांची वेळ नोंदवली.
ताकाहाशीला दुसऱ्या स्थानावरील कोकी इकेडाकडून जोरदार टक्कर मिळाली. जागतिक चालण्याच्या स्पर्धेत २० किमीचा विजेता इकेडाने ३७ मिनिट २५.९० सेकंदांचा वेळ घेतला.

mpsc telegram channel

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

1 thought on “चालू घडामोडी : १६ नोव्हेंबर २०२०”

Comments are closed.