किर्गिझस्तानच्या अध्यक्षांचा राजीनामा
किर्गिझस्तानचे अध्यक्ष सूरोनबाय जीनबेकॉव्ह यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
राजकीय प्रतिस्पर्धी आणि निदर्शकांकडून जीनबेकॉव्ह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
किर्गिझस्तानात शांतता प्रस्थापित होणे, देशाची एकात्मता, जनतेचे ऐक्य आणि सामाजिक शांतता सर्वाहून महत्त्वाची आहे, सत्ता नव्हे असे जीनबेकॉव्ह यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनामध्ये म्हटले आहे.
ऑस्कर विजेत्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथय्या यांचं निधन
भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार भानू अथय्या यांचं निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होता.
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी भानू यांनी ऑस्कर पुरस्कार पटकावला होता.
गांधी’ चित्रपटाने त्यांना जागतिक स्तरावर प्रचंड सन्मान मिळाला आणि त्यांची वेगळी ओळखही निर्माण झाली.
भानू यांचा जन्म कोल्हापूरच्या अण्णासाहेब राजोपाध्ये यांच्या घरी २८ एप्रिल १९२९ रोजी झाला.
घाऊक बाजारातील किंमती सात महिन्यांच्या उच्चांकावर
खाद्यपदार्थांच्या किमतींत वाढ झाल्यामुळे तसेच भाज्यांचे भावही वधारल्यामुळे सप्टेंबर महिन्यात घाऊक दरावर आधारित चलनवाढ (डब्ल्यूपीआय)१.३२ टक्के झाली आहे.
गेल्या सात महिन्यांत प्रथमच चलनवाढ इतक्या मोठ्या प्रमाणात झाली आहे.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात घाऊक दराधारित चलनवाढ ०.१६ टक्के झाली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये डब्ल्यूपीआय ०.३३ टक्के होता. त्यामुळे यंदा घाऊक दरावर आधारित चलनवाढ मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसत आहे.
रिटेल दरावर आधारित चलनवाढही सप्टेंबर महिन्यात यंदा आठ महिन्यांच्या उच्चांकी जाऊन ७.३४ टक्के नोंदवली गेली आहे.
रिझर्व्ह बँकेकडून नुकताच पतधोरण जाहीर करण्यात आले, ज्यात रेपो रेट आहे ४ टक्क्यांवर आणि रिझर्व्ह रेपो रेट ३.३ टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसला तरी या वर्षात लॉकडाउनचा विचार करता दोन वेळा व्याज दरात १.१५ टक्के इतकी कपात केली होती, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं होते.
सहा सदस्यीय पतधोरण समितीने ३१ मार्च २०२१ पर्यंत वार्षिक चलनवाढ ४ टक्क्यांपर्यंत आटोक्यात ठेवण्याचा निर्णय मागेच घेतला आहे. चलनवाढीसाठी कमाल पातळी ६ टक्के तर किमान पातळी २ टक्के निर्धारित करण्यात आली आहे.