---Advertisement---

Current Affairs 16 September 2019

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

एक हजार फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापणार

  • महिला आणि बालकांवर अत्याचार प्रकरणाशी संबंधित देशभरात एक लाख ६६ हजार खटले प्रलंबित असून, त्यांचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने एक हजार २३ जलदगती न्यायालये (फास्ट ट्रॅक) स्थापण्याची योजना आखली आहे.
  • बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा ‘पॉक्सो’ कलमाखाली दाखल असलेले खटले निकाली काढण्यासाठी न्याय विभागाने फास्टट्रॅक न्यायालयाचा प्रस्ताव तयार केला असून, येत्या दोन ऑक्‍टोबरपासून या न्यायालयांची स्थापना केली जाणार आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापल्या जाणाऱ्या एक हजार २३ फास्टट्रॅक न्यायालयांपैकी ३८९ न्यायालयांत केवळ ‘पॉक्सों’तर्गत दाखल असलेल्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे. या प्रत्येक फास्टट्रॅक न्यायालयाने तीन महिन्यांत किमान ४१ ते ४२ प्रकरणे म्हणजेच वर्षभरात १६५ प्रकरणे निकाली काढावीत अशी अपेक्षा आहे. देशात सध्या पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल असलेल्या प्रलंबित खटल्यांची संख्या एक लाख ६६ हजार ८८२ इतकी आहे. प्रत्येक जिल्ह्यात पॉस्कोशी निगडित शंभराहून अधिक खटले रेंगाळले आहेत.
  • १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर केंद्र सरकारने फास्टट्रॅक न्यायालयासाठी २०१३ मध्ये निधी तयार केला आहे.
  • ७६७.२५ कोटी – फास्ट ट्रॅक न्यायालयांसाठी आवश्‍यक निधी
  • ४७४ कोटी – येत्या वर्षभरात सरकार देणार
  • १६५ प्रकरणे – प्रति न्यायालय एका वर्षात निकाली निघण्याची अपेक्षा

सौदी अरेबियातून तेलपुरवठा घटणार

  • येमेनच्या हूथी बंडखोरांनी सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या दोन तेलप्रकल्पांवर ड्रोन हल्ले केल्याने दोन्ही ठिकाणी तेलउत्पादन थांबविण्यात आले आहे. त्यामुळे सौदी अरेबियाकडून जगाला होणाऱ्या तेलनिर्यातीत निम्म्याने घट होण्याची शक्यता आहे.
  • सौदी अरेबियाने तेलपुरवठा त्वरित पूर्ववत न केल्यास, खनिज तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिबॅरल १०० डॉलपर्यंत उसळू शकतात, असा विश्लेषकांचा होरा आहे.
  • तसे झाल्यास तेल आयातीवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशांसमोर बिकट आर्थिक संकट उद्भवू शकते.

सौरभ वर्माला विजेतेपद

  • भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने रविवारी व्हिएतनाम खुल्या ‘बीडब्लूएफ टूर सुपर १००’ बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. सौरभने चीनच्या सन फेई झियांगवर संघर्षपूर्ण विजय मिळवला.
  • अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित सौरभने झियांगला २१-१२, १७-२१, २१-१४ असे तीन गेममध्ये पराभूत केले.
  • सौरभचे हे या वर्षांतील तिसरे विजेतेपद ठरले. त्याने या वर्षी हैदराबाद आणि स्लोव्हेनिअन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.
  • जागतिक क्रमवारीत ४४व्या स्थानी असलेल्या सौरभने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now