चालू घडामोडी : १६ सप्टेंबर २०२०
Current Affairs : 16 September 2020
बुकर लघुयादीत पदार्पणातील पुस्तकांना स्थान
यंदाच्या बुकर पुरस्काराच्या लघुयादीत दोनदा हा पुरस्कार मिळवणाऱ्या हिलरी मँटेल यांना स्थान मिळाले नसून नवीन लेखकांच्या पदार्पणातील पुस्तकांना स्थान मिळाले आहे.
डायना कुक, अवनी दोशी, ब्रँडन टेलर, स्कॉटिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांना अंतिम यादीत स्थान मिळाले आहे. तिस्ती डॅनगरेम्बा, माझा मेंगिस्टी यांचाही त्यात समावेश आहे.
माजी जैवरसायनशास्त्रज्ञ टेलर यांच्या शगी बेन हिच्या समलिंगी जीवनावर आधारित कादंबरीला स्थान मिळाले असून, ऐशीच्या दशकातील ग्लासगोतील दारिद्रय़ व व्यसनाधीनतेवर आधारित स्टुअर्ट यांच्या पुस्तकासही स्थान मिळाले आहे.
यंदाच्या बुकर पुरस्काराच्या लघुयादीत भारतीय वंशाच्या अवनी दोशी यांच्या ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचा समावेश आहे. यंदा लघुयादीतील सहापैकी चार कादंबऱ्या या पदार्पणातील आहेत.
दोशी यांच्यासह डायनी कुक, ब्रॅण्डन टेलर, स्कॉटिश अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांना अंतिम यादीत स्थान मिळाले.
तिस्ती नॅगरेम्बा, माझा मेंगिस्टी यांचाही त्यात समावेश आहे. स्टुअर्ट यांची शगी बेन ही कादंबरी पुरस्काराची दावेदार असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात गेले कित्येक दिवस सुरू आहे. त्यात ऐंशीच्या दशकातील ग्लासगो शहरातील दारिद्रय़ाचे चित्रण आहे.
‘दी न्यू वाइल्डरनेस’ ही कुक यांची कादंबरी, अवनी दोशी यांचे ‘बन्र्ट शुगर’ हे पुस्तकही मोठय़ा चर्चेत आहेत. मेंगिस्टी यांचे ‘दी श्ॉडो किंग’ कादंबरी इथिओपियातील समाजाचे चित्रण करते. झिम्बाब्वेचे लेखक नॅगरेम्बा यांच्या ‘दिस मॉर्नेबल बॉडी’ या पुस्तकाने वसाहतवाद व भांडवलवादाचा वेध घेतला आहे. सध्या त्यांना झिम्बाब्वेत हरारे येथे अटकेत ठेवण्यात आले आहे, कारण त्यांनी सरकारी भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने केली होती. तेरा पुस्तकांतून ही लघुयादी तयार करण्यात आली.
भारत घेणार आणखी मोठी झेप! २०२३ मध्ये ‘शुक्र’वारी
चंद्र, मंगळ यानंतर आता साऱ्या जगाचे लक्ष पृथ्वीपासून तुलनेने जवळ असलेल्या शुक्र ग्रहावर लागले आहे. यात भारतही मागे नाही.
भारतानेही शुक्र ग्रहावर अंतराळयान उतरवण्याची योजना आखली आहे. यात काही उपकरणांची निर्मितीही केली आहे.
आता यावर सरकारी पातळीवर शिक्कामोर्तब झाले की, भारतीय अंतराळ संस्था शुक्र ग्रहावर वारी करण्याची अंतिम तयारी सुरू करणार आहे.
जगभरातील अंतराळ संस्था शुक्र ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यात अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ आणि ‘इस्रो’ या संस्था आघाडीवर आहेत.
‘इस्रो’ला शुक्र ग्रहावर प्रथम जाण्याची संधी मिळू शकणार आहे. यासाठी भारताने पूर्ण तयारी केली आहे. तसेच तेथील वस्तुमान अभ्यासण्यासाठी उपकरणही तयार करण्यात आल्याचे या प्रकल्पात काम करणारे त्रिवेंद्रम येथील ‘भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान’ संस्थचे शास्त्रज्ञ उमेश कढाणे यांनी सांगितले.
हा प्रकल्प पूर्ण तयार असून त्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर २०२३मध्ये तो पूर्णत्वास नेण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले.
युएई, बहरीन व इस्रायल यांचा करार
संयुक्त अरब अमिराती, बहरीन या देशांनी इस्रायलसोबतच्या मैत्री करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे आता मध्य-पूर्व भागात मैत्री पर्व सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासूनचे वैर विसरून अरब देशांनी इस्रायलसोबत मैत्री करार केला आहे.
अमेरिकेची मध्यस्थी याकामी अतिशय महत्त्वाची ठरली. करारावर स्वाक्षरी होताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये सुरू असलेल्या वादात अरब देशांनी आतापर्यंत पॅलेस्टिनच्या पाठिंब्यासाठी इस्रायलसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले नव्हते. आता मात्र, बदललेल्या परिस्थितीनंतर संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलसोबत हातमिळवणी केली आहे. त्यानंतर बहरीननेदेखील इस्रायलसोबत मैत्री केली.
सर्वात उंचावरून उडीमारण्याचा विक्रम होणार
हवामान बदलांवर जागरूकतेसाठी पोलंडचे तोमास्ज कोज्लोव्हस्की सर्वात जास्त उंचीवरून पॅराशूटद्वारे उडी मारण्याचा विक्रम रचणार आहेत. ७ वर्षांपूर्वी फेलिक्स बॉमगार्टनर आणि अॅलन यूस्टेस यांनी ४५ किमी उंचावरून उडी मारत विक्रम रचला होता.
संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोग सदस्यपदी भारताची निवड
संयुक्त राष्ट्रांच्या महिला स्थिती आयोगावर (विमेन स्टेट कमीशन) सदस्यपदी भारताची निवड झाली आहे. भारतासाठी हा विजय महत्त्वाचा आहे, कारण यात चीनवर मात करण्यात यश आले आहे. चीनने ही निवडणूक गांभीर्याने लढवूनही त्यात त्यांना यश आले नाही.
महिला स्थिती आयोग हा लिंगभाव समानता व महिला सक्षमीकरण या मुद्दय़ांना महत्त्व देतो. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक मंडळा अंतर्गत या महिला आयोगाचा समावेश होतो. मंडळाची २०२१ या वर्षांतील पहिली सभा आमसभेच्या सभागृहात सोमवारी झाली. त्यात आशिया-पॅसिफिक भागात सदस्यपदाच्या दोन जागांकरिता निवडणूक घेण्यात आली.
या दोन जागांकरिता अफगाणिस्तान, भारत व चीन रिंगणात होते. अफगाणिस्तानचे नेतृत्व संयुक्त राष्ट्रातील राजदूत अॅडेला राझ यांनी केले, त्यांना ३९ मते मिळाली. भारताला ३८ मते मिळाली. चीन हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असूनही त्या देशाला केवळ २७ मतांवर समाधान मानावे लागले.