Current Affairs 17 April 2020
आशियाचा विकासदर शून्य टक्क्यांवर?

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर चालू वर्षात (२०२०) आशिया खंडाचा विकास दर शून्यावर राहील, असा धक्कादायक अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्तवला आहे. १९६० नंतरचा हा सर्वांत कमी विकास दर राहील, असेही आयएमएफने म्हटले आहे.
व्हर्च्युअल पत्रकारपरिषदेत आयएमएफच्या आशिया प्रशांत विभागाचे संचालक चांग्योंग री यांनी नमूद केल्याप्रमाणे अशाप्रकारचे संकट प्रथमच उद्भवले आहे.चांग्योंग री यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२०मध्ये आशियाचा विकास दर गेल्या साठ वर्षांतील नीचांकी पातळीवर राहण्याची शक्यता आहे. जागतिक आर्थिक संकटाच्या समयी विकास दर ४.७ टक्के आणि आशियाई आर्थिक संकटाच्या वेळी विकास दर १.३ टक्के राहिला आहे. जगातील अन्य क्षेत्रांच्या तुलनेत आशिया खंडांतील क्षेत्रांची अवस्था तुलनेने बरी आहे. आयएमएफतर्फे गुरुवारी जारी करण्यात आलेल्या नव्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकमध्ये २०२०मध्ये जागतिक अर्थव्यवस्था संकोचून ३ टक्क्यांवर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकमध्ये नमूद केल्यानुसार अतिप्रगत अर्थव्यवस्था ६.१ टक्क्यांच्या दरावरून खाली घसरण्याची शक्यता असून, वर जाणारे बाजार आणि विकसनशील अर्थव्यवस्था १ टक्का घसरण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आता नव्या स्वरूपात!

जास्तीत जास्त खेळाडूंचा सहभात तसेच राज्य, केंद्रशासित प्रदेश, संस्थात्मक आणि विद्यापीठांच्या संघांमधील हॉकीच्या सुधारणेसाठी आता स्थानिक स्पर्धामध्ये धोरणात्मक बदल केले जाणार आहे. त्यामुळेच पुढील वर्षीपासून राष्ट्रीय हॉकी स्पर्धा नव्या स्वरूपानुसार खेळवण्याचे हॉकी इंडियाने ठरवले आहे.
हॉकी इंडियाच्या कार्यकारी मंडळाच्या झालेल्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. पुरुष आणि महिला गटाच्या उपकनिष्ठ, कनिष्ठ आणि वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा नव्या धोरणानुसार खेळवण्यात येतील. सर्व स्पर्धा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नव्या नियमानुसार खेळवण्यात येतील.
‘‘यापूर्वी अ आणि ब गटासाठी असलेली विविध वयोगटांची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची पद्धत यापुढे नसेल. राष्ट्रीय स्पर्धेसाठी आता आम्ही नवी नियमावली सादर केली आहे. यामुळे प्रत्येक राज्याला आपल्या प्रदेशातील हॉकी खेळाला चालना देता येईल. या सर्व स्पर्धा लीग आणि नंतर बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत. सहभागी संघांनुसार गटवारी करण्यात येईल,’’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितले.
हॉकी इंडियाचे नवे स्वरूप –
- कोणत्याही खेळाडूला राष्ट्रीय स्पर्धेत फक्त एकाच गटात आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करता येईल. त्यामुळे नवीन खेळाडूंना संधी मिळू शकेल.
- पात्रता प्रक्रियेसाठी प्रत्येक राज्याने राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी व्हायला हवे.
- प्रत्येक राज्याने प्रत्येक गटाच्या राज्यस्तरीय स्पर्धाचे आयोजन करणे बंधनकारक राहील.
- सार्वजनिक क्षेत्रातील तसेच विद्यापीठाच्या संघांना आता वेगळ्या गटात स्थान देण्यात आले आहे.
अमेरिकेसह ५५ देशांना भारत करणार ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा

करोनानं जगभरात थैमान घातलं आहे. अशातच करोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वच देश शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत भारतही अनेक देशांच्या मदतीला धावून गेला आहे. अमेरिकेसह ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे.
यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि अन्य देशांचा समावेश आहे.
काय आहे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ?
हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्मितीसाठी भारत चीन आणि ब्राझील या दोन देशांकडून बहुतांश कच्चा माल आयात करतो. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे एक टॅबलेट असून एण्टी मलेरिया ड्रग क्लोरोक्वीनपेक्षा थोडं वेगळं आहे. याचा वापर ऑटोइम्यूनसारख्या आजारावर केला जातोय. सध्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषधं करोना व्हायरसवरही प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. सार्स-सीओवी-२ यावर हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा प्रभाव तिव्रतेनं पडत आहे. सार्स-सीओवी-२ हे करोना व्हायरस होण्याचं कारण असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेचं हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे करोनावर प्रभावी ठरत आहे.
भारत आशियातील नंबर वन स्पोर्ट्स टेक देश बनला, ४१.१ % स्टार्टअप्स खेळाचे
भारत आशियातील नंबर वन स्पोर्ट्स टेक देश बनला आहे. स्पोर्ट्स टेक एक्स डॉट कॉमच्या अहवालानुसार, भारताने स्पोर्ट्स टेक्नॉलॉजीत चीनला मागे सोडले. देशात ४१.१ टक्के स्टार्टअप्स खेळाचे आहेत. हे स्टार्टअप्स दोन सहयोगी विभागात फँटसी स्पोर्ट्स आणि बुकिंग व स्पोर्ट्स मॅच मेकिंगवर काम करतात. जर आशियाच्या टाॅप-१० स्पोर्ट्स टेक शहरांचा विचार केल्यास यात ४ भारताची आहेत. देशातील सिलिकॉन व्हॅली म्हटले जाणाऱ्या बंगळुरूत १०.८ % स्पोर्ट्स स्टार्टअप आहे.
भारतात इतर देशांच्या तुलनेत तीनपट अधिक स्पोर्ट्स स्टार्टअप्स
भारत
इस्रायल
चीन
जपान
सिंगापूर
इंडोनेशिया
द. कोरिया
मलेशिया
तैवान
हाँगकाँग
बंगळुरू