भारतीय कुस्तीपटूंची तिहेरी सुवर्णकमाई
भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगट आणि अंशू मलिक यांनी वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या या दोघींनी कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याची किमया साधली.
याव्यतिरिक्त दिव्या काकराननेसुद्धा सुवर्णपदक पटकावले, मात्र अनुभवी साक्षी मलिकला रौप्यावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील अंतिम लढतीत विनेशने चायनीज तैपईच्या मेंड सुआन-सेईवर ६-० असा विजय मिळवला.
हरयाणाच्या १९ वर्षीय अंशूने ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात मोंगोलियाच्या बत्सेत अटसेगला ३-० असे नमवले.
महिलांच्या ७२ किलो वजनी गटात दिव्याने कझाकस्तानच्या झामिला बर्गेनोव्हावर ८-५ अशी मात केली. दिव्याने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. गतवर्षी दिव्याने ६८ किलो वजनी गटात अजिंक्यपद मिळवले होते.
चीनने नोंदवला 18.3 टक्के विक्रमी विकासदर
चीनचा सन 2021 च्या वर्षातील पहिल्या तिमाहीत जीडीपीचा आकडा 18.3 टक्के इतका झाला आहे.
या कालावधीत चीनचे एकूण सकल घरेलु उत्पादन तब्बल 3.82 ट्रिलियन डॉलरइतके झाले आहे.
एखाद्या तिमाहीत इतक्या मोठ्या प्रमाणावर जीडीपी नोंद होण्याचा चीनच्या आर्थिक इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे.
सन 2021 या वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत चीनचे औद्योगिक उत्पादन कमालीचे सुधारले असून विक्री आणि गुंतवणूक क्षेत्रातही चीनने चांगली कामगिरी केली आहे.
सर्वात नीचांकी जीडीपी सन 2020 मध्ये 2.3 टक्के इतका नोंदवला गेला होता.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चीनचा या आर्थिक वर्षातील विकासदर 8.4 टक्के इतका राहील, असा अंदाज वर्तवला होता.