Current Affairs : 17 August 2020
फोर्ब्सच्या यादीत बॉलीवूडमधून एकमेव अक्षयकुमार
- बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याने फोर्ब्स-2020च्या टॉप-10 यादीत स्थान मिळवले आहे.
- सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये तो बॉलीवूडमधील एकमेव अभिनेता आहे. अक्षयने या यादीत सहावे स्थान मिळविले आहे; परंतु गतवर्षीपेक्षा त्याचे रॅकिंग दोन स्थानांनी घसरले आहे. 2019 मध्ये तो चौथ्या स्थानी होता.
- फोर्ब्स पत्रिकेच्या या यादीत हॉलीवूड स्टार ड्वेन जॉन्सन सलग दुसऱ्या वर्षीही पहिल्या क्रमांकावर आहे.
- त्याने 8.75 कोटी डॉलरची कमाई केली आहे. अक्षय हा एका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी आपल्या पहिल्या टेलिव्हिजन सीरीज “द एंड’वर सध्या काम करत आहे. त्याने अधिकाधिक कमाई ही एंडोर्समेंट डिलमधून केलेली आहे.
कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे निधन
- भारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे रविवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. उत्तर प्रदेश सरकारमध्ये ते मंत्री देखील होते.
- दोनवेळा माजी खासदार म्हणून काम केलेले चेतन चौहान हे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.
- चेतन चौहान हे भारताकडून 40 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी 1970 च्या दशकात सुनील गावसकर यांच्यासह सलामीला येताना चांगल्या धावाही केल्या होत्या. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही यशस्वी सलामीवीरांच्या जोडींपैकी एक जोडी आहे.
- चेतन चौहान यांनी भारतीय संघाच्या व्यवस्थापकाची भूमिकाही सांभाळली होती. भारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा ते भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. त्याचबरोबर दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले होते.
भारताची गगनयान मोहीम लांबणीवर पडण्याची शक्यता
- करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या पहिल्या गगनयान मोहीमेलाही विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- ही मानव रहित अंतरीक्ष मोहीम डिसेंबर 2020 मध्ये हाती घेतली जाणार होती. भारत डिसेंबर 2022 मध्ये मानवासहित अंतरीक्षात यान पाठवणार आहे.
- त्या आधी मानवरहित दोन याने अंतरीक्षात पाठवली जाणार आहेत. त्यातील पहिले चाचणी यान डिसेंबर 2020 मध्ये अंतरीक्षात पाठवले जाणार होते.
- इस्त्रोच्या अंतरीक्ष आयोगातर्फे या मोहीमेच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर या विषयीचा अंतिम निर्णय जाहींर केला जाणार आहे. इस्त्रोचे अध्यक्ष के सिवान हेच या आयोगाचे अध्यक्ष आहेत. भारताच्या स्वातंत्र्याला सन 2022 मध्ये 75 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमीत्त भारतातर्फे तीन अंतरीक्षांना अंतराळात पाठवले जाणार आहे.
- ही भारताची स्वदेशी तंत्राने होणारी पहिलीच मानवासहित अंतराळ मोहीम असणार आहे. त्यासाठीची तयारी इस्त्रोने सुरू केली आहे. तथापि मुख्य मोहीमेच्या आधी डिसेंबर 2020 आणि जून 2021 मध्ये मानवरहित याने अंतराळात पाठवली जाणार आहेत. त्यातील यंदाच्या डिसेंबर मधील मोहीम पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. करोनामुळे इस्त्रोच्या ज्या मोहीमांवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यात चांद्रयान तीनचाही समावेश आहे.
महागाई दर जुलैमध्ये ६.९३ टक्क्य़ांवर
- किरकोळ किमतींवर आधारित महागाई दर सरलेल्या जुलै महिन्यांत ६.९३ टक्के अशा चिंताजनक पातळीपर्यंत वाढल्याची आकडेवारी गुरुवारी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली.
- टाळेबंदी अनेक भागात शिथिल झाली असली तरी पुरवठा शृंखलेतील विस्कळीतपणाचा जाच ग्रामीण भागाला बसला असून, ग्रामीण भारताला वाढलेल्या महागाईची अधिक झळ सोसावी लागत असून, तेथे हा महागाई निर्देशांक अधिक म्हणजे ७.०४ टक्के नोंदविला गेला आहे.
- घोषित ग्राहक किंमत निर्देशांकानुसार, अन्नधान्यातील महागाईचा दर जुलैमध्ये ९.६२ टक्के नोंदविण्यात आला. ही बाब अधिक चिंताजनक आहे.
- रिझव्र्ह बँकेकडून व्याजदरांची निश्चित करताना, किरकोळ किमतीवर आधारित महागाई निर्देशांक गृहीत धरला जातो.
- मात्र सलग दुसऱ्या महिन्यात केंद्र सरकारकडून मध्यवर्ती बँकेला असलेल्या फर्मानानुसार, महागाई निर्देशांक ४ टक्के (उणे व अधिक २ टक्के) या मर्यादेच्या पल्याड गेलेला दिसून येतो.
- एसआयपी निधीऱ्हास :
जुलै : ७,८३१
जून : ७,९१७
मे : ८,१२३
एप्रिल : ८,३७६
(रक्कम कोटी रुपयांत)