⁠  ⁠

चालू घडामोडी : १७ डिसेंबर २०१९

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 17 December 2019

मराठमोळे मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख

Manoj

नव्या वर्षात ले.ज. मनोज नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. मनोज मुकुंद नरवणे यांनी सप्टेंबर महिन्यातच उपलष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता. आता लष्करप्रमुख बिपीन रावत ३१ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत.
नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ते देशाचे नवे लष्करप्रमुख असतील असंही त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं. लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणजे मनोज नरवणे हे होय.
१९८० मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या ७व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधीनीचे ते विद्यार्थी आहेत. त्यांचे वडील हवाईदलात अधिकारी होते. नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रात उत्तम काम केलंय. त्यांना आत्तापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवलं होत. नरवणे हे देशाचे २८ वे लष्कर प्रमुख असतील.

पश्चिम समुद्रासाठी आण्विक पाणबुडी!

सातत्याने शत्रूराष्ट्राकडून घुसखोरीची शक्यता असलेल्या पश्चिम समुद्री ताफ्याला आता आण्विक पाणबुडी मिळण्याची अपेक्षा आहे. अशी पाणबुडी रशियाकडून खरेदी करण्याचा करार अंतिम टप्प्यात आला असून, ही पाणबुडी याच महिन्यात नौदलाकडे सुपूर्द होणार आहे.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या फक्त दोन आण्विक पाणबुड्या आहेत. त्यापैकी ‘आयएनएस अरिहंत’ ही पाणबुडी भारतातच तयार झाली आहे, तर ‘आयएनएस चक्र’ ही पाणबुडी रशियाकडून खरेदी करण्यात आली. या दोन्ही पाणबुड्या सध्या पूर्व कमांड अंतर्गत विशाखापट्टणम येथे तैनात आहेत;
आण्विक पाणबुड्या ही डिझेल-इलेक्ट्रिक श्रेणीतील पारंपरिक पाणबुड्यांच्या तुलनेत अधिक सक्षम असतात. पारंपरिक डिझेल-इलेक्ट्रिक इंधनावर चालणारी पाणबुडी अधिकाधिक तीन दिवस पाण्याखाली राहू शकते. त्याचवेळी आण्विक पाणबुडी अनेक महिने पाण्याखाली वावरू शकते. ऑक्सिजन घेण्यासाठी या पाणबुडीला पाण्याच्या वर येण्याची गरज नसते. त्याचवेळी आण्विक क्षेपणास्त्रदेखील या पाणबुड्या वाहून नेऊ शकतात. यामुळेच या श्रेणीतील अधिकाधिक पाणबुड्या ताफ्यात असणे महत्त्वाचे असते. अशी तिसरी पाणबुडी आता भारतीय नौदलाकडे येत आहे.

बेन स्टाेक्स अाणि इंग्लंड संघ प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी

क्रिकेट वर्ल्ड कप फायनलच्या सामनावीर विजेत्या बेन स्टाेक्स अाणि विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाने प्रतिष्ठेच्या पुरस्कारामध्ये बाजी मारली. या दाेघांनाही अव्वल कामगिरीमुळे नुकताच पुरस्कार जाहीर झाला अाहे. स्टाेक्सची यंदाच्या स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इअर पुरस्कारासाठी निवड झाली अाहे. या अाॅलराउंडरने लुईस हॅमिल्टन अाणि धावपटू डिना एशर स्मिथला मागे टाकले.

रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वांत मोठी कंपनी ठरली

मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे. फॉर्च्युन इंडियातर्फे २०१८-१९ या वर्षासाठीची पाचशे शीर्षस्थ भारतीय कंपन्यांची सूची प्रसिद्ध करण्यात आली. या सूचीत इंडियन ऑइल या सरकारी इंधन शुद्धीकरण कंपनीला मागे सारत रिलायन्सने अव्वल स्थान मिळवले. या सूचीत गेल्या १० वर्षांत इंडियन ऑइल कंपनीने अग्रमानांकम कायम राखले होते. फॉर्च्युन इंडियाने दिलेल्या माहितीनुसार २०१८-१९ या आर्थिक वर्षअखेरीस रिलायन्स इंडस्ट्रीजच्या महसुलाचा आकडा ५.८१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Share This Article