Current Affairs 17 February 2020
फेसबुकवरील लोकप्रियतेत डोनाल्ड ट्रम्प पहिल्या स्थानी
फेसबुक या समाजमाध्यमावरील लोकप्रियतेत पहिला क्रमांक दिल्याबाबत अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुकचे आभार मानले आहेत. लोकप्रियतेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोघांचाही मोठा सन्मान झाला असल्याच्या भावना ट्रम्प यांनी व्यक्त केल्या आहेत.
विशेष म्हणजे ट्रम्प हे भारताला भेट देण्याच्या अगोदर फेसबुकने हे दोन नेते लोकप्रियतेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले होते. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी त्यांच्या समाजमाध्यमावर ट्रम्प लोकप्रियतेत क्रमांक एकवर असल्याचे म्हटले होते. त्यावर ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटले आहे,की हा मोठा सन्मान आहे. कारण झकरबर्ग यांनी डोनाल्ड ट्रम्प क्रमांक १ वर, तर मोदी क्रमांक दोनवर असल्याचे म्हटले होते. फेसबुकवर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असल्याबाबत ट्रम्प यांनी दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
१० पुरस्कारांसह ‘गल्ली बॉय’ची बाजी
दहा पुरासकर पटकावत गल्ली बॉय चित्रपटाने ६५ व्या अमेझॉन फिल्फ फेअर पुरस्कार २०२० ऑसम आसामच्या शानदार सोहळ्यात बाजी मारली. दिग्दर्शक झोया अखतर, अन्हीनेट रणवीर सिंह व अभिनेत्री आलीय भट यांच्यासाठी हा क्षण विशेष ठरला.
सिनेविश्वातील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना फिल्फ फेअर जीवनगौरव हा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता गोविंदा यांना ‘एक्सलन्स इन सिनेमा’ हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गांधी आश्रमात येणारे ट्रम्प पहिले राष्ट्राध्यक्ष
महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात दर्शन घेणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पहिले अध्यक्ष असतील. यासाठी साबरमतीतील हृदय कुंज, मीना कुटीर व मगन निवास या तीन पवित्र स्थळांची माहिती पाठवण्यात आली आहे. दोन दिवसीय दौऱ्यात ट्रम्प अहमदाबादेत गांधी आश्रमला भेट दिल्यानंतर ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रमात सहभागी होतील. २०१४ नंतर अहमदाबादचा दौरा करणारे ट्रम्प पाचवे राष्ट्रप्रमुख ठरतील. यापूर्वी चीनचे शी जिनपिंग, जपानचे पंतप्रधान शिंजो अाबे, इस्रायलचे बेंझामिन नेतन्याहू आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो येथे आले आहेत.
अॅथलेटिक्स : युगांडाच्या जोशुआचा ५ किमी रोड रेसमध्ये विश्वविक्रम नाेंद
युगांडाच्या लांबपल्ल्याच्या धावपटू जाेशुअा चेपतेगेईने रविवारी विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने पाच किमी राेड रेसमध्ये हा पराक्रम गाजवला.त्याने हे अंतर १२ मिनिट ५१ सेंकदात गाठले. यासह त्याने केनियाच्या राेनेक्स किप्रुतो (१३.१८ ) याच्या नावावरच्या विक्रमाला ब्रेक केले.
अाता त्याने अव्वल कामगिरीच्या बळावर विश्वविक्रमासह सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला अाहे .त्याने २०१९ मध्ये दाेहा येथील जागतिक स्पर्धेतील १० हजार मीटरमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली हाेती. अाता त्याने या स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करताना हा विक्रमाचा पल्ला गाठला.
राधाकिशन दमाणी देशातील दुसरे श्रीमंत
शेअर बाजारातील यशस्वी गुंतवणूकदार अशी ख्याती मिळवलेले आणि अव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकिशन दमाणी यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धनाढ्य व्यक्ती होण्याचा बहुमान पटकावला आहे. त्यांची एकूण संपत्ती १७.८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, असे ‘फोर्ब्ज’च्या ‘रिअल टाइम बिलिनिअर्स इंडेक्स’मध्ये नमूद करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात अव्हेन्यू सुपरमार्केटच्या समभागात ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने दमाणी यांनी ‘एचसीएल’चे शिव नाडर (१६.५ अब्ज डॉलर), उदय कोटक (१४.९ अब्ज डॉलर), गौतम अदानी (१४.१ अब्ज डॉलर) आणि लक्ष्मीनिवास मित्तल (१२.१ अब्ज डॉलर) यांना मागे टाकले. देशातील पहिल्या क्रमांकाचे धनाढ्य व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ५७.४ अब्ज डॉलर आहे.
किरकोळ महागाई ६ वर्षांच्या उच्चांकावर
बुधवारी जाहीर झालेल्या महागाई आणि औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीवरून केंद्र सरकारच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. खाद्यपदार्थ महागल्याने जानेवारीमध्ये किरकोळ महागाई वाढून ७.५९ टक्क्यांवर पोहोचली आहे.
हा किरकोळ महागाईचा गेल्या सहा वर्षांतील उच्चांक असल्याचे दिसून आले आहे. सलग आठव्या महिन्यात महागाईत वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित (सीपीआय) चलनवाढीचा दर डिसेंबर २०१९मध्ये ७.३५ टक्क्यांवर होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हाच दर १.९७ टक्क्यांवर होता.
मात्र, जानेवारी २०२०मध्ये हा दर रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या चार टक्क्यांच्या दरापेक्षा वर गेल्याचे आढळून आले आहे.
डिसेंबरमध्ये उद्योगांचाही वेग मंदावला आहे. डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाच्या वृद्धिदरात ०.३ टक्के घसरण झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत औद्योगिक वृद्धिदरात २.५ टक्के वाढ नोंदविण्यात आली होती.
औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन घटल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात १.२ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली होती. विजेचे उत्पादन घटून ०.१ टक्क्यांवर पोहोचले आहे.
डिसेंबर २०१८मध्ये विजेचे उत्पादन ४.५ टक्क्यांनी वाढले होते. खाणकाम क्षेत्रातील उत्पादनात ५.४ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत आयआयपीची वाढ ०.५ टक्क्यांपर्यंत घसररली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत आयआयपीची वाढ ५.७ टक्के नोंदविण्यात आली होती.
श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांवर अमेरिकेची प्रवासबंदी
श्रीलंकेचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल शावेंद्र सिल्वा यांच्यावर अमेरिकेने प्रवास बंदी लागू केली असून त्या निर्णयावर श्रीलंकेने आक्षेप घेतला आहे. शहानिशा न केलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असा आरोप श्रीलंकेने केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सिल्वा यांच्यावर मानवी हक्क उल्लंघनाचे गंभीर आरोप असल्याचे म्हटले आहे.
श्रीलंका सरकारने त्यांच्या लष्करप्रमुखांवर प्रवासबंदी लागू करण्याचा अधिकृत निषेध केला असून त्या निर्णयास तीव्र आक्षेपही घेतला आहे. सिल्वा व त्यांचे कुटुंबीय यांना अमेरिकेने प्रवास बंदीच्या यादीत टाकले आहे. श्रीलंका सरकारने अमेरिकेला त्यांना मिळालेल्या माहितीच्या स्त्रोताची खातरजमा करून निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. श्रीलंका अध्यक्षांच्या लष्कर कमांडरला लष्कर प्रमुखपदी नेमण्याच्या अधिकारालाच अमेरिकेने आव्हान दिले असून हे दुर्दैवी आहे असे श्रीलंकेने म्हटले आहे.
सिल्वा यांच्या नेमणुकीस अमेरिका व युरोपीय समुदाय यांनी हरकत घेतली आहे. अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे, की सिल्वा यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याची कागदपत्रे संयुक्त राष्ट्रे व इतर संघटनांकडे आहेत.
सिल्वा (५५) यांना गेल्यावर्षी श्रीलंका लष्कराचे कमांडर नेमण्यात आले होते. सिल्वा हे लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमच्या बंडखोरांविरोधातील अंतिम लढाईत २००९ मध्ये ५८ व्या कमांडचे प्रमुख होते. त्या वेळी त्यांच्या ब्रिगेडने नागरिक,रुग्णालये यावर हल्ले करून तमीळ नागरिकांचा रसद पुरवठा तोडला होता.