Current Affairs 17 January 2020
ISRO ची आणखी एक यशस्वी कामगिरी, GSAT-30 लाँच; इंटरनेट क्षेत्रात होणार क्रांती
इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे. जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून यशस्वी प्रेक्षेपण केले आहे. आज, शुक्रवारी पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण केले. GSAT-30 या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार आहे. या उपग्रहामुळे इंटरनेट आधिक गतीने चालणार आहे.
GSAT-30 या उपग्रहाचं वजन सुमारे ३,१०० किलो आहे. लाँचिंगपासून १५ वर्षे हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं आहे. या उपग्रहामध्ये दोन सोलर पॅनल आणि बॅटरी आहे.
Indian Space Research Organisation (ISRO): GSAT30 successfully separated from the upper stage of Ariane-5 VA251. pic.twitter.com/xumlkkFZyo— ANI (@ANI) January 16, 2020
यापूर्वी २०१५ मध्ये इनसॅट-४ए हा उपग्रह लाँच करण्यात आला होता. त्याची मर्यादा संपुष्टात आली असून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे GSAT-30 हा दुरसंचार उपग्रह इस्रोनं लॉन्च केला आहे. जीसॅट-३० हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल.
काय होणार फायदा –
GSAT-30 हा दुरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकितही वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.
कौतुकास्पद! मराठमोळे हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीचे वकील
आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने नव्या नियुक्त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मराठमोळे हरीश साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे ‘क्वीन काऊंसिल’ म्हणून काम पाहतील. १६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती होईल.
कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये महत्वाची आणि मोठी कामगिरी करणाऱ्यांना ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून निवडले जाते. साळवे यांचे आंतरराष्ट्रीय कायदाक्षेत्रातील मोठे योगदान असल्याने त्यांना हा बहुमान मिळाला आहे, अशी माहिती शाही घराण्याच्या सूत्रांनी दिली. हरीश साळवे यांनी फक्त एक रूपयांचं मानधन घेऊन कुलभूषण जाधवांची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली होती.
इंटरनेट स्वातंत्र्याच्या बाबतीत पाकिस्तान तळाला
इंटरनेट स्वातंत्र्याच्या बाबतीत पाकिस्तान हा जगातील सर्वात वाईट देशांपैकी एक असल्याचे स्पष्ट झालं आहे. सोशल मिडियावरील निर्बंध, राजकीय वृत्तांकन यासारख्या गोष्टी लक्षात घेऊन ‘कॉम्प्रीटेक’ या माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील कंपनीने सर्वेक्षणानंतर अहवाल जारी केला आहे.
जगभरातील १८१ देशांमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात पाच महत्वाच्या गोष्टींसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये टोरंटस, पॉर्नोग्राफी, बातम्या, सोशल मिडिया आणि व्हिपीएन अशा पाच गोष्टींवरील निर्बंधांबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये १० पैकी ७ गोष्टींकरता पाकिस्तान पिछाडीवर असल्याचे असल्याचे दिसले. इंटरनेट स्वातंत्र्याबाबत तळाला असणाऱ्या बेलारूस, तुर्की, ओमान, संयुक्त अरब अमिराती, इरिट्रिया या देशांच्या यादीमध्ये पाकिस्तानचा समावेश झाला आहे.
. या यादीमध्ये तळाला उत्तर कोरिया आहे. चीन नवव्या क्रमांकावर आहे. तर रशिया, तुर्कमेनिस्तान आणि इराणही या यादीमध्ये तळाला आहेत.
“आनंदी गोपाळ’ चित्रपटाला संत तुकाराम आंतरराष्ट्रीय पुरस्कार
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार समारोप सोहळा पार पडला. या वेळी ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने या वर्षीच्या ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. तर ‘अ सन’ या ‘ट्युनिशियन चित्रपटाने ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ पटकावला. या पुरस्कारांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात केली.
रोख रुपये पाच लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’चे तर रोख रुपये दहा लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’चे स्वरूप आहे. हे दोन्ही पुरस्कार दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येतात. सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आईला’ या चित्रपटाने परीक्षकांची पसंती पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट मराठी पटकथा, सिनेमॅटोग्राफी (छायाचित्रण) व प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार मिळाला.
मंगळावर टिपले परग्रहवासीयाचे छायाचित्र
मंगळावर परग्रहवासींचे अस्तीत्व असल्याचे कथन उलगडून सांगितल्याने प्रकाशझोतात आलेले स्कॉट वॉरींग हे त्यांच्या एका विचित्र शोधामुळे चर्चेत आले आहेत. तैवानमध्ये कार्यरत असणाऱ्या वॉरीन यांनी मंगळावर परग्रहवासीयांचे अस्तित्व असल्याचे वेळोवेळी प्रतिपादन केले आहे. आपल्या या सिध्दांताच्या पृष्ठ्यर्थ त्यांनी नासाने मंगळावर टीपलेल्या अनेक विसंगतीपूर्ण छायाचित्रांचा छायाचित्रांचा आधार घेतला आहे.
आपल्या सिध्दांताच्या स्पष्टीकरणासाठी वॉरींग यांनी पुतळ्यासारख्या दिसणाऱ्या विचित्र परग्रहवासीयाचे छायाचित्र त्यांनी प्रकाशित केले आहे. यातील चेहऱ्याचा भाग सर्व बाजूनी योग्य असलल्याचा दावा वॉरींग यांनी केला. या कथित परग्रहवासीययाच्या चेहऱ्यावर नाक, कान, डोळे आणि कपाळ आहे.