⁠
Uncategorized

चालू घडामोडी – १७ जून २०१६

देश-विदेश

कृष्णा विद्यापीठात डॉ. निलीमा मलिक रूजू
# वैद्यकशास्त्रातील शिक्षणतज्ज्ञ आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून ख्यातनाम असणाऱ्या डॉ. निलीमा मलिक या भारतात अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान होणाऱ्या दंतवैद्यक शास्त्रातील पहिल्या महिला ठरल्या असून, कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू म्हणून त्यांनी गुरूवारी विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

पहिल्‍या स्‍वदेशी प्रशिक्षक विमानाची यशस्‍वी चाचणी
# हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेडने(एचएएल) तयार केलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या प्रशिक्षक विमानाची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली. एचटीटी-४० असे या विमानाचे नाव असून, या विमानाचा सैन्य दल वापर करणार आहे. विमानाच्या चाचणीच्यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर हे देखील विमानाच्या कॉकपिटमध्ये बसले होते. या विमानाची यशस्वी चाचणी हे मेक इन इंडियाचे यश असल्याचे ते म्हणाले.

अर्थव्यवस्था

भारतातून चहाची विक्रमी निर्यात
# कोलकाता: भारताला तब्बल 35 वर्षांनंतर चहा निर्यातीत 230 दशलक्ष किलोचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात(2015-16) देशातून 232.92 दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली आहे. त्याबदल्यात देशाला 4,493.10 कोटी रुपये मिळाले आहेत. यापुर्वी 1980-81 साली देशातून 231.74 दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली होती. त्याआधी 1976-77 आणि 1956-57 साली अनुक्रमे 242.42 दशलक्ष किलो आणि 233.09 दशलक्ष किलो चहा निर्यात झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीचे प्रमाण 17 टक्क्यांनी वाढले आहे. रशिया, इराण, जर्मनी, पाकिस्तान, बांग्लादेश, संयुक्त अरब अमिरात आणि पोलंडसारख्या देशांनी अधिक चहा खरेदी केल्याने निर्यात वाढली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे उज्जीवन फायनान्शिअलवर र्निबध
# लघु बँक परवाना मिळालेल्या उज्जीवन फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसला विदेशी गुंतवणूक वाढविण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने मज्जाव केला आहे. बंगळुरुस्थित उज्जीवन फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस ही प्रस्तावित उज्जीवन स्मॉल बँकमधील हिस्सेदार कंपनी आहे. कंपनीतील विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण यापूर्वीच मर्यादेपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट करत कंपनीला नव्याने कोणतीही विदेशी गुंतवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यामुळे कंपनीत आता समभाग खरेदीच्या माध्यमातून कोणत्याही विदेशी गुंतवणूक संस्था, नोंदणीकृत विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदार, अनिवासी भारतीयांना कंपनीत आता नव्याने गुंतवणूक करता येणार नाही.

‘रेअर अर्थ’च्या उत्पादनास सरकारकडून उत्तेजन
# नवी दिल्ली – मोबाईल फोन्सपासून क्षेपणास्त्रांपर्यंत विविध अत्याधुनिक वस्तुंच्या निर्मितीसंदर्भात महत्त्वपूर्ण असलेल्या “रेअर अर्थ मिनरल्स‘च्या उत्खननासाठी खासगी उद्योग क्षेत्रास अधिक उत्तेजन देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. रेअर अर्थ मिनरल्सच्या उत्पादनासाठी या महिन्याखेरीस एकूण 1 हजार चौरस किमीचे क्षेत्र निश्‍चित करुन या क्षेत्रातील उत्खननाच्या परवानगीसाठी लिलाव केला जाणार असल्याची माहिती खाण सचिव बलविंदर कुमार यांनी दिली. भारतामध्ये रेअर अर्थ मिनरल्सचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. उद्योगविश्‍वासाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या खनिजांचे सध्या चीनकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येते. भारतामधील या नैसर्गिक साधनसंपत्तीचा लाभ घेण्याच्या मार्गामधील विविध अडथळे दूर करण्यासाठी सध्या सरकार प्रयत्नशील आहे.

Related Articles

Back to top button