डच चषक फुटबॉल स्पर्धा : आयएक्सचे ३४वे विजेतेपद
- गेल्या आठवडय़ात चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टॉटेनहॅम हॉटस्परकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आयएक्स संघाने बुधवारी डे ग्राफशॅपप संघाचा ४-१ असा धुव्वा उडवत डच फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. आयएक्सचे हे ३४वे जेतेपद ठरले आहे.
- आयएक्सने कट्टर प्रतिस्पर्धी पीएसव्ही आयढोवेनला तीन गोल आणि १४ गोलांच्या फरकाने मागे टाकत १० दिवसांपूर्वीच जेतेपदावर नाव कोरले होते.
राज्य बँक उभारणार सहकार विद्यापीठ
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे लवकरच एक सहकार विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. यासाठी सोलापूरची निवड करण्यात आली असून हे सहकार विद्यापीठ राज्यातीलच नव्हे तर देशातील या प्रकारचे पहिले शैक्षणिक केंद्र ठरेल.
- सहकार हा अतिशय महत्त्वाचा विषय असून शैक्षणिक अभ्यासक्रमात त्याचा समावेश होणे गरजेचे असल्याचे आम्ही सरकारला सुचवले आहे.
- सहकार क्षेत्रातील संबंधित घटकांसाठी तसेच, विद्यार्थ्यांसाठी आम्ही सहकार विद्यापीठ सुरू करण्याची योजना आखली असून यातून विद्यार्थ्यांना सहकाराची पदवी मिळेल.
- २०१८-१९ या आर्थिक वर्षात या बँकेने ३१६ कोटी रुपये नफ्याची निव्वळ नोंद केली आहे. तसेच, बँकेच्या निव्वळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण १.१५ टक्के एवढे अत्यल्प आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ३५,५४०कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांचे निधन
- ऑस्ट्रेलियातील हुजूर पक्षाचे सर्वाधिक काळ पदावर असणारे माजी पंतप्रधान बॉब हॉक यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
- १९८० च्या दशकात हॉक यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानपद भूषवले होते. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानपदाच्या निवडणुकीमध्ये हॉक हे चारवेळा विजयी ठरले होते.
- या दशकात ऑस्ट्रेलियातर्फे अनेक आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमध्ये हॉक यांनी आपल्या मुत्सद्देगिरीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील मजूर पक्षाने हॉक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
दिलीप माजगावकर यांना “मसाप जीवनगौरव’ जाहीर
- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा “मसाप जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ लेखक, प्रकाशक, संपादक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे. “सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या “जगाच्या अंगणात’ या ग्रंथास विशेष वार्षिक ग्रंथास दिले जाणारे “मालिनी शिरोळे’ पारितोषिक जाहीर झाले आहे.
साताऱ्याची लेक ‘मकालू’वर पाय रोवणारी पहिली भारतीय महिला
- साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहितेने मकालू शिखर सर करुन आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. मकालू शिखर सर करणारी प्रियंका ही पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. मकालूची उंची आठ हजार मीटर्सपेक्षा अधिक असून, ते जगातलं पाचव्या क्रमांकाचं उंच शिखर आहे.
- अष्टहजारी उंची गाठणं इतकं सोपं नाही. मात्र या महाराष्ट्र कन्येने १५ मे २०१९ रोजी मकालू शिखर सर करत हा विक्रम घडवला. प्रियांका मोहितेने याआधी माऊंट एव्हरेस्ट, किलिमांजरो आणि ल्होत्से ही जगातील उंच शिखरं सर केली आहेत. याच कामगिरीसाठी तिला महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवलं आहे. प्रियांकाने चढाई केलेलं हे आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीचं तिसरं शिखर ठरलं आहे.
- प्रियांकाने याआधी अनेक हिमालयीन मोहिमा सहज पूर्ण केल्या आहेत. तिने अनेक उंच शिखरं पादाक्रांत केली आहेत. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी प्रियांकाने जगातील सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर केलं होतं. 2018 साली जगातील चौथ्या क्रमांकाचं ल्होत्से शिखर सर केलं.
चीनचे चँग-फोर मोहिमेचे यश
- चीनच्या चँग-फोर मोहिमेने चंद्राचे आच्छादन रसायन आणि खनिजापासून कसे बनले आहे, यावर प्रकाश टाकला असल्यामुळे पृथ्वी आणि त्याचा नैसर्गिक उपग्रह चंद्र यांची उत्क्रांती/विकास कसा झाला, याचे गूढ उकलण्यात मदत होईल.
- चंद्राची जी बाजू पृथ्वीवरून दिसत नाही किंबहुना तिच्यावर प्रकाश खूप कमी असतो (डार्क साईड म्हणूनही ती ओळखली जाते), अशा भागावर प्रथमच अगदी सहजपणे यावर्षी जानेवारी महिन्यात उतरण्याचा मान चँग-फोर यानाने मिळवला आहे.
- रोव्हर युटू-२ ने सभोवताल शोधण्यासाठी लँडरला मोकळे सोडले. युटू-२ मध्ये बसविलेल्या दृश्य आणि इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटरने मिळवलेल्या माहितीचा वापर करून ली चुन्लाई यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल आॅब्झरर्व्हेटोरीज आॅफ चायनाच्या संशोधक तुकडीला जेथे चँग-फोर यान उतरले त्या भागातील चंद्राची जमीन आॅलिवाईन
आणि पायरोक्सिन असलेली आढळली. हे घटक चंद्राच्या खूप खोलवरील आच्छादनातून आलेले होते.