जीडीपी दर पाच टक्क्यांवर जाणं धक्कादायक!
- जीडीपी चा पहिल्या तिमाहीतला दर हा पाच टक्क्यांवर जाणं हा माझ्यासाठी धक्कादायकच होतं असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. “जीडीपी दर 5.5 टक्क्यांच्या खाली जाणार नाही असा अंदाज होता.मात्र समोर आलेली टक्केवारी पाहून मला धक्का बसला” असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. देशाचा आर्थिक विकास दर सुधारण्यासाठी सरकारने काही निर्णय घेतले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. ” विदेशी
- गुंतवणुकीचा दर मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगला आहे, तसंच खाद्यपदार्थांची महागाई येत्या काही दिवसांमध्ये कमी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.”
- 2020 च्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर 6.9 टक्क्यांवर नेण्याचं उद्दीष्ट आहे. जीडीपीचे आत्ता समोर आलेले आकडे नक्कीच वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळेच जीडीपी दर वाढवण्यासा आरबीआयनं प्राधान्य दिलं आहे.
एसबीआयची ईला चॅटबोट सुविधा
- स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ईला (इंटरअॅक्टिव्ह लाइव्ह असिस्टंट) चॅटबोट सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा फायदा ग्राहकांना होणार आहे. एसबीआय कार्डधारक आपल्या मोबाइल अॅपवर ईला चॅटबोट ही सेवा वापरू शकणार आहे.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) आधार घेत भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) चॅटबोट हा ग्राहकांच्या समस्या सोडवणारा रोबो सोमवारपासून सेवेत दाखल केला. याची निर्मिती एआय बँकिंग मंच असलेल्या पेजो या कंपनीने तयार केला आहे. या चॅटबोटला एसबीआयने एसबीआय इंटेलिजन्ट असिस्टन्ट किंवा एसआयए (सिया) असे नाव दिले आहे.
भारताच्या तेल पुरवठ्यात कपात नाही – सौदी अरेबिया
- भारत हा सौदी अरेबियाचा तिसऱ्या क्रमांकाचा तेल खरेदीदार राष्ट्र असल्याने, भारताला करण्यात येत असलेल्या पुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात येणार नसल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने जाहीर केले असल्याची माहिती भारताच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे.
- ड्रोन हल्ल्यामुळे प्रतिदिन 5.7 दशलक्ष बॅरेल इतके तेल उत्पादन करत असलेल्या सौदी अरेबियाच्या तेल उत्पादनात निम्म्याने घसरण झाली आहे. भारत आपल्या गरजेच्या 83 टक्के तेल सौदीकडूनच आयात करतो. इराकनंतर सौदी अरेबिया हा त्यांचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश आहे. वर्ष 2018-19 या आर्थिक वर्षात भारताने 40.33
- दशलक्ष टन कच्च्या तेलाची खरेदी केली होती. त्यावेळी देशाने 207.3 दशलक्ष टन तेल आयात केले होते.