⁠
Uncategorized

चालू घडामोडी : १८ ऑगस्ट २०२०

Current Affairs : 18 August 2020

ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन

Pandit Jasraj 1
  • हिंदुस्तानी शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.
  • पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या किताबांसह संगीत नाटक अकादमीच्या फेलोशिपनेही त्यांचा गौरव करण्यात आला होता.
  • आपल्या गायकीने अनेक वर्ष देश विदेशातील चाहत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
  • पंडित जसरात हे ८० वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने 11 नोव्हेंबर 2006 मध्ये ‘2006 व्हीपी 32’ या छोट्या ग्रहाला पंडितजसराज असं नाव देऊन जसराज यांचा गौरव केला होता. असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार आहेत.

सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची बीएसएफच्या डीजी पदावर नियुक्ती

rakesh asthana
  • सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची सीमा सुरक्षा दलाच्या मुख्य निर्देशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राकेश अस्थाना १९८४ बॅचचे गुजरात केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी काही हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे.
  • १९९७ साली चारा घोटळायात त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना अटक केली होती.
  • सीबीआयमध्ये ते पोलीस अधीक्षकपदावर होते.

सबरीना सिंह अमेरिकेतील उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रेस सचिव

  • डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी सबरीना सिंह यांची प्रचार अभियानासाठी प्रेस सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
  • सबरीना सिंह या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. सबरीना सिंह यांनी यापूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन उमेदवाराच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी संभाळली आहे.
  • अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कमला हॅरिस यांची निवड केली आहे.
  • लॉस एजिल्समध्ये राहणाऱ्या सबरीना सिंह याआधी डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीच्या प्रवक्त्या होत्या. ते इंडिया लीग या नॉन प्रॉफिट संघटनेशी संबंधित होते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय-अमेरिकन समुदायाच्या हितासाठी ही संघटना काम करते.

Related Articles

Check Also
Close
Back to top button