⁠  ⁠

चालू घडामोडी : १८ डिसेंबर २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs : 18 December 2020

मानवी विकास निर्देशांकात भारताची घसरण

car03 1

भारतातील दरडोई उत्पन्न, जीवनशैलीचा दर्जा, आरोग्य आणि शैक्षणिक स्थिती यांच्या घसरलेल्या आलेखामुळे मानवी विकास निर्देशांकात भारताची घसरण झाली आहे.
१८९ देशांच्या यादीत भारत १३१ व्या स्थानी असल्याचे संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (यूएनडीपी)ने जाहीर केलेल्या अहवालत स्पष्ट झाले आहे.
देशाची आरोग्य, शौक्षणिक स्थिती तसेच राहणीमानाचा दर्जा यावर मानवी विकास निर्देशांक (एचडीआय) मोजला जातो.
भारताचे एचडीआय मूल्य ०.६४५ इतके नोंदवले गेले. त्यामुळे भारताची गणना मध्यम मानवी विकास वर्गवारीत झाली आहे.
२०१८ मध्ये मानवी विकास निर्देशांकात १३० व्या स्थानी होता. कोलंबियापासून भारतापर्यंत अनेक देशांत आर्थिक स्वावलंबन आणि जमिनीवरील मालकी हक्क यांमुळे महिलांची सुरक्षितता वाढली असून लिंगभेदावर आधारित गुन्हेगारी कमी झाल्याचे आढळले आहे, असे अहवालात स्पष्ट केले आहे.
भारतीय नागरिकांचे सरासरी आयुर्मान २०१९ मध्ये ६९.७ इतके नोंदले गेले तर बांगलादेशाती नागरिकांचे आयुर्मान ७२.६ आणि पाकिस्तानी नागरिकांचे ६७.३ इतके आहे.
मध्यम मानवी विकास वर्गवारीसह मानवी विकास निर्देशांकात भूतान -१२९, बांगलादेश १३३, नोपाळ १४२ आणि पाकिस्तान १५४ स्थानावर आहे.
मानवी विकास निर्देशांकात नॉर्वे अग्रस्थानी असून त्यापाठोपाठ आर्यलड, स्विल्र्झलड, हाँगकाँग आणि आइसलँड यांचा समावेश आहे.
यूएनडीपीने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारताचे दरडोई वार्षिक उत्पन्न २०१८ च्या ६८२९ डॉलरवरून घसरून २०१९ मध्ये ६६८१ डॉलर इतके झाले आहे.

‘इस्रो’च्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण

rocket

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारताचा ४२ वा संप्रेषण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडला.
हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती महाजाल संपर्कतेसाठी काम करणार आहे.
कोविड-१९च्या स्थितीत इस्रोने केलेले हे दुसरे प्रक्षेपण आहे.
श्रीहरिकोटा येथील द्वितीय प्रक्षेपण केंद्रातून बुधवारी दुपारी पीएसएलव्ही-सी ५० रॉकेटने अवकाशात झेप घेतली.
हा उपग्रह देशाच्या मुख्य भूमीसह अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपला व्यापणाऱ्या वारंवारिता स्पेक्ट्रमच्या विस्तारित सी बॅण्डमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
सीएमएस-०१, इस्रोचा संप्रेषण उपग्रह आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे हे ५२ वे अभियान आहे.

भारत-बांगलादेश रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय

train

भारत आणि बांगलादेशने गुरुवारी विविध क्षेत्रांत एकमेकांना अधिकाधिक सहकार्य करण्याबाबत सात करार केले आणि १९६५पर्यंत सुरू असलेली दोन देशांमधील रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याचाही निर्णय घेतल्याने दोन्ही देशांमधील संबंध झपाटय़ाने सुधारत असल्याचे प्रतिबिंबित होत आहे.
चिलहाटी-हलदीबारी रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याचा आणि हायड्रोकार्बन, कृषी आणि वस्त्रोद्योग यासह सात क्षेत्रांत एकमेकांना अधिकाधिक सहकार्य करण्याचे करार मोदी आणि शेख हसिना यांनी दूरदृश्य प्रणालीने झालेल्या शिखर परिषदेत केले.
राष्ट्रपिता म.गांधीजी व बांगलादेशचे संस्थापक मुजीबूर रेहमान यांच्यावरील डिजिटल प्रदर्शनाचे मोदी आणि हसिना यांच्या हस्ते संयुक्तपणे उद्घाटन करण्यात आले. चिलहाटी-हलदीबारी रेल्वेसेवेचे उद्घाटन करण्यात आल्याने बांगलादेशातून आसाम आणि पश्चिम बंगालमधील संपर्कता वृद्धिंगत होणार आहे.
बांगलादेश हा भारताचा महत्त्वाचा शेजारी देश आहे त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याला आपले प्राधान्य आहे, असे मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर हसिना यांनीही भारत हा बांगलादेशचा सच्चा मित्र असल्याचे सांगितले.

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली.
विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आले आणि त्यास दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली
विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स, स्पोर्टस टेक्नॉलॉजी व स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित करण्यात आली आहे.

mpsc telegram channel

Share This Article