Current Affairs 18 July 2020
भारतातील 27 कोटी 30 लाख लोक दारिद्य्राच्या बाहेर आले
- संयुक्त राष्ट्रे: भारताने सन 2005-6 ते 2015- 16 या दहा वर्षाच्या काळात देशातील गरिबी निर्मूलन कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली असून या कालावधीत देशातील तब्बल 27 कोटी 30 लाख लोक दारिद्य्राच्या बाहेर येऊ शकले आहेत अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात देण्यात आली आहे.
- संयुक्त राष्ट्रांची यूएनडीपी संस्था आणि ऑक्स्फर्ड पॉवर्टी ऍन्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वरील नमूद केलेल्या काळात भारताने उपेक्षित वर्गातील अनेक प्रकारच्या समस्या दूर केल्या आहेत.
- आरोग्य, शिक्षण, जीवनमानाचा दर्जा, कामाची खालावलेली स्थिती, हिंसेचा सामना करावा लागणे, अशा साऱ्या निकषातून भारताने वर नमूद केलेल्या काळात या उपेक्षित वर्गाला बाहेर यशस्वीपणे बाहेर काढले आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- मल्टी डायमेंशनल पॉवर्टी निर्देशांक या तत्त्वाने या समित्यांनी 65 देशांतील गरिबांच्या स्थितीचा अभ्यास केला. त्यात भारताची ही कामगिरी सरस ठरली आहे.
ला लिगा फुटबॉल : रेयाल माद्रिदला विक्रमी ३४वे विजेतेपद!
- रेयाल माद्रिदने विक्रमी ३४व्यांदा ला-लिगा फुटबॉलचे विजेतेपद पटकावले. व्हिलारेयालला २-१ नमवत एक लढतआधीच माद्रिदने चषक उंचावला. सध्याच्या घडीला सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या बार्सिलोनाची ला-लिगाचे जेतेपद राखण्याची संधी मात्र हुकली.
- माद्रिदचे हे २०१७ नंतरचे पहिले ला-लिगा विजेतेपद ठरले. करिम बेन्झेमाचे दोन गोल हे व्हिलारेयालवर मिळवलेल्या विजयात मोलाचे ठरले.
- बेन्झेमाने याबरोबरच ला-लिगा हंगामातील गोलांची संख्या २१ वर नेली. माद्रिदचा हा या स्पर्धेतील सलग १० वा विजय ठरला.
सर्वात श्रीमंत ‘रोशनी’ एचसीएल टेकच्या बॉस
- भारतातील सर्वात श्रीमंत महिला रोशनी नाडर मल्होत्रा (३८) एचसीएल टेक्नॉलाजीच्या अध्यक्ष बनल्या आहेत. त्या वडील शिव नाडर यांची जागा घेतील. ते आता कंपनीच्या एमडी व चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर पदावर राहतील. वेल्थ हुरुन इंडियानुसार, रोशनी २०१९ मध्ये ३१,४०० कोटींसह देशातील सर्वात श्रीमंत महिला होत्या.