विंग कमांडर अंजली सिंग बनल्या पहिल्या महिला सैन्य मुत्सद्दी
- विंग कमांडर अंजली सिंग हे भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत ज्या परदेशात भारतीय मिशनमध्ये सैन्य मुत्सद्दी म्हणून तैनात आहेत.
- अंजली सिंग यांना 10 सप्टेंबर रोजी रशियाच्या भारतीय दूतावासात डिप्टी एअर अटॅची म्हणून नियुक्त केले गेले आहे.
भारतीय हवाई दलाला मिळाला इस्रायलकडून स्पाइस-2000 बॉम्ब
- भारतीय हवाई दलाला बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये यशस्वीरीत्या वापरलेल्या स्पाइस-2000 बॉम्बचा पहिला टप्पा मिळाला आहे. हवाई दलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली.
- इस्रायली कंपनीकडून हे बॉम्ब मिराज-2000 लढाऊ विमानाच्या ग्वाल्हेर या तळाला मिळाले आहेत. हेच विमान इस्रायली बॉम्ब फायर करण्यास सक्षम आहेत. हवाई दलाने इस्रायलसोबत 250 कोटीपेक्षा जास्त किमतीचा करार केला होता. ‘स्पाईस’ हे नाव स्मार्ट, प्रीसेशन इम्पॅक्ट व कॉस्ट इफेक्टीव्ह या इंग्रजी नावांच्या आद्याक्षराने तयार करण्यात आले आहे.
मोदींसह भाजपा नेत्यांच्या ‘लॉजिक’वर काँग्रेसने काढले ‘बंच ऑफ थॉट्स’
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ढग आणि रडारच्या विधानापासून ते खासदार सत्यपाल सिंग यांच्या डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतापर्यंत भाजपा नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. गाजलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर काँग्रेसने डिजिटल स्वरूपात बंच ऑफ थॉट्स असा व्हिडीओ तयार केला आहे. “ज्यावेळी देशाचे नेते तर्कशास्त्र नाकारतात, त्यावेळी आपल्या सर्वांना याची भीती वाटली पाहिजे,”
- या व्हिडीओला ‘बंच ऑफ थॉट्स : बीजेपी एडिशन’ असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे “ज्यावेळी देशाचे नेते तर्कशास्त्र नाकारतात, त्यावेळी आपल्या सर्वांना याची भीती वाटली पाहिजे,” असे मत काँग्रेसने व्यक्त केले आहे.
- पर्यावरण बदलांवर बोलताना मोदी यांनी “पर्यावरण बदलले नाही, तर आपण बदललो आहोत,” असे विधान केले होते
“सर्वोच्च न्यायालयामुळे देशात आर्थिक मंदी आली”
- ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी देशातील आर्थिक मंदीला सर्वोच्च न्यायालय जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. ‘मंदीची सुरुवात २०१२ साली झाली त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने टू जी स्पेक्ट्रम प्रकरणामध्ये दूरसंचार कंपन्यांचे १२२ परवाने रद्द केले. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला,’ असं साळवे एका मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.
- देशाला टू जी घोटाळ्यामुळे एक लाख ७६ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे महालेखापालने (कॅग) २०१० मध्ये म्हटले होते. यानंतर २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायलयाने दूरसंचार कंपन्यांचे १२२ परवाने रद्द केले. या प्रकरणामध्ये साळवेंनी ११ कंपन्यांची बाजू न्यायलयासमोर मांडली होती. साळवे यांनी केलेले दावे न्यायलयाने फेटाळून लावत कंपन्यांच्या विरोधात निर्णय़ दिला होता.
GSTN ने जाहीर केली नवीन जीएसटी रिटर्नची ऑनलाइन आवृत्ती
- सध्या चालू असलेल्या नवीन जीएसटी रिटर्न्स चाचणीचा एक भाग म्हणून वस्तू व सेवा कर नेटवर्ककडून (जीएसटीएन) नवीन रिटर्न जीएसटी एएनएक्स -1 आणि जीएसटी एएनएक्स -2 ची ऑनलाईन आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. करदात्यांची ओळख पटवण्याच्या दृष्टीकोनातून ही ऑनलाइन आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये असणाऱ्या नवीन वैशिष्ट्यांची माहिती जीएसटी पोर्टल www.gst.gov.in वर देण्यात आली आहे.
- नवीन जीएसटी रिटर्न भरण्याच्या प्रस्तावित प्रणालीमध्ये सामान्य करदात्याला फॉर्म जीएसटी आरईटी -१ (सामान्य) (मासिक किंवा तिमाही आधारावर) किंवा (फॉर्म जीएसटी आरईटी) -२ (सहज) / फॉर्म जीएसटी रेट-3 (सुगम) (तिमाही आधारावर दोन्ही) दाखल करावा लागेल. या रिटर्न्सचा एक भाग म्हणून पुरवठा (एनएसटी एएनएक्स – १) आणि आवक पुरवठा एनेक्सचर (जीएसटी एएनएक्स -२) देखील अपलोड करावे लागतील.
पीएफच्या व्याजदरात वाढ
- एकीकडे रोजगार कपात होत असताना केंद्र सरकारने पीएफच्या व्याजदरात वाढ करत नोकरदार वर्गाला दिलासा दिला आहे. पीएफच्या दरात मोदी सरकारने ०.१० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे व्याजदर ८.५५ टक्क्यांवरून ८.६५ टक्के इतका झाला आहे.
- “ईपीएफओच्या ४६ मिलियन सदस्यांना ८.६५ टक्के व्याजदर दिल्यानंतरही ईपीएफओ सरप्लस राहणार आहे. त्याचा परिणाम होणार नाही,” असे गंगवार यांनी स्पष्ट केल्यानंतर पीएफ व्याजदराचा मुद्दा निकाला निघाला.
- २०१८-१९ या कालावधीत ईपीएफओच्या ६ कोटी लाभधारकांना ८.६५ टक्के व्याजदर मिळणार आहे