चालू घडामोडी : १८ सप्टेंबर २०२०
Current Affairs : 18 September 2020
हरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
कृषीविषयक तीन विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
शेतकरीविरोधी वटहुकूम आणि विधेयकांच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा हरसिमरत कौर बादल यांनी ट्वीटद्वारे केली. शेतकऱ्यांची बहीण, कन्या म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मोदींच्या विक्रमांची नोंद असणाऱ्या ‘लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स’ पुस्तकाचे प्रकाशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित पुस्तकाच्या डिजीटल अवृत्तीचे अनावरण केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७० वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने या डिजीटल अवृत्तीचे प्रकाशन करण्यात आलं आहे.
मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर २०१४ ते २०१९ दरम्यान केलेल्या विक्रमांची या पुस्तकामध्ये नोंद आहे.
या पुस्तकात एकूण २४३ विक्रमांची नोंद असून ते जागतिक स्तरावरील अथवा पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाने नोंदवलेले विक्रम आहेत. हे छापील पुस्तक मागील वर्षीपासूनच बाजारात उपलब्ध होते. आता हे डिजीटल माध्यमांवर उपलब्ध झाले आहे.
‘लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स’ या पुस्तकामध्ये २६ मे २०१४ ते ३० मे २०१९ च्या कार्यकाळामध्ये घडलेल्या २४३ विक्रमांची नोंद आहे. हे विक्रम जागतिक स्तरावरील तसेच पहिल्यांदाच एखाद्या भारतीय पंतप्रधानाच्या नावावर नोंदवण्यात आलेले विक्रम आहेत.
शेतकाऱ्यांसाठी कृषि सुधारणा विधेयकं मंजूर
शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, २०२०, शेतमाल हमी भाव आणि शेती सेवा करार (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२० हे विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर झाले.
देशातील कृषि सुधारणेसाठी दोन महत्त्वाची विधेयके – शेतकरी उत्पादन व वाणिज्य (पदोन्नती आणि सरलीकरण) विधेयक, २०२० आणि शेतकर्यांचे (सबलीकरण आणि संरक्षण) कृषी सेवांवरील हमी भाव आश्वासन आणि करार विधेयक, २०२० – लोकसभेने मंजूर केले. शेतकरी स्वतःच्या मर्जीचा मालक असेल.
शेतकऱ्याला आपला शेतमाल थेट विकण्याचे स्वातंत्र्य असेल, एमएसपी कायम राहील.
कर न लावल्यामुळे शेतकर्यांना अधिक भाव मिळेल आणि नागरिकांनाही कमी किंमतीत मालही मिळेल.
आयसीसी वनडे रँकिंग :विराट, राेहित टॉपमध्ये
आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत विराट कोहली ८७१ अंकांसह पहिला तर रोहित शर्मा (८५५ ) दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो टॉप-१० मध्ये पोहोचला आहे. गोलंदाजांत ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड पहिल्यांदा टॉप-१० मध्ये दाखल झाला आहे.