चालू घडामोडी – १९ ऑगस्ट २०१६
क्रीडा
उसेन बोल्टची २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची हॅट्रीक
# रिओ ऑलिम्पिकच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जमैकाच्या उसेन बोल्टने सुवर्ण पदक मिळवले आहे. ऑलिम्पिकमध्ये २०० मीटर शर्यतीत सलग तिस-यांदा सुवर्ण पदकाची कमाई करत उसेनने हॅट्रीक करून नवा इतिहास रचला आहे. २०० मीटर धावण्याची शर्यत उसेनने १९.७८ सेकंदांत पूर्ण करत सुवर्णपदक मिळवले. याआधी ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उसेनने सुवर्ण पदक कमावले होते. आतापर्यंत उसेनने ८ सुवर्ण पदक कमावले आहेत. विषेश म्हणजे १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणारा उसेन हा जगातला पहिला धावपटू ठरला आहे. वेगाचा बादशहा म्हणून उसेन ओळखला जातो. उसेनची मैदानात शर्यत ही आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी नसून ती केवळ आणि केवळ वेगाशी आणि घड्याळ्यात फिरणा-या काट्यांशी असते असे म्हणतात. उसेनने २०० मीटर शर्यतीत सलग तिस-यांदा सूवर्ण पदक जिंकत आपणच महान खेडाळू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या स्पर्धेत त्याला कॅनडाच्या आंद्रे डे ग्रेस आणि फ्रान्सच्या क्रिस्टोफ लेमाइत्रे यांनी चांगली टक्कर दिली. उसेन पाठोपाठ कॅनडाच्या आंद्रे डे ग्रेस यांने २०.२ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्य पदक मिळवले तर फ्रान्सच्या क्रिस्टोफ लेमाइत्रे याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]
नरसिंगवर ४ वर्षांची बंदी, ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले
# भारताचा मल्ल नरसिंग यादवचा पहिला सामना काही तासांवर येऊ ठेपला असताना त्याच्यावर ४ वर्षांची बंदी घालून क्रीडा लवादने त्यांच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा स्वप्नांवर विरजण घातले आहे. उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ब्राझीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने ऑलिम्पिक खेळण्यासाठी चार वर्षांची बंदी घातली आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) चाचणीमध्ये नरसिंग दोषी आढळला होता. पण त्यानंतर नरसिंगने आपल्याविरोधात कारस्थान रचण्यात आल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने नरसिंगविरुद्ध कारस्थान झाल्याचा निकाल देत त्याला ऑलिम्पिकसाठी हिरवा कंदील दिला होता. ‘नाडा’च्या या निकालावर जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) आक्षेप घेत क्रीडा लवादाकडे या निर्णयाविरोधात दाद मागितली होती. क्रीडा लवादाने या प्रकरणात नरसिंगला दोषी ठरवत त्यावर बंदी घातली. शुक्रवारी पहाटे हा निर्णय जाहीर करण्यात आला. नरसिंग विरोधात कारस्थान रचले गेल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याने ब्राजीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने हा निर्णय दिला तसेच त्याला संध्याकाळपर्यंत रिओ सोडून जाण्याचे आदेशही देण्यात आले. ‘वाडा’ने या प्रकरणात फार उशीराने लक्ष घालते त्यामुळे भारताचे पथकप्रमुख राकेश गुप्ता यांनी नाराजी दर्शवली होती.
अर्थव्यवस्था
आर्थिक अडचणीमुळे इ कॉमर्स साइट आस्क मी बंद होणार
# भारतातील आघाडीची इ-कॉर्मस सर्च साइट आस्क मी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे कंपनी लवकरच बंद होणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. गुरगाव येथे मुख्य कार्यालय असलेल्या कंपनीची वेबसाइट अजून सुरू असली तरी कंपनीने नवीन ऑर्डर घेणे बंद केले आहे. कंपनीचे प्रमुख गुंतवणूकदार अॅस्ट्रो होल्डिंगने अचानक माघार घेतल्याने आस्क मी अडचणीत आल्याचे सूत्रांनी सांगितले. कंपनीच्या भागधारकांसोबत झालेल्या दीर्घ वादानंतर मलेशिया स्थित अब्जाधीश आनंद कृष्णन संचलित अॅस्ट्रो होल्डिंगने गत महिन्यात सुमारे १५० कोटी रूपयांची गुंतवणूक कंपनीत केली होती. अॅस्ट्रो होल्डिंगची आस्क मी ग्रूपमध्ये ९७ टक्के भागीदारी आहे.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]