⁠
Uncategorized

चालू घडामोडी : १९ ऑगस्ट २०२०

Current Affairs : 19 August 2020

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा

ashok lavasa
  • बिहार निवडणुकांपूर्वी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे.
  • निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते आशियाई विकास बँकेत उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. आशियाई विकास बँकेत ते दिवाकर गुप्ता यांची जागा घेतील.
  • जानेवारी २०१८ मध्ये लवासा यांनी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
  • निवडणूक आयोगाच्या इतिहासात आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे लवासा हे दुसरे आयुक्त ठरले आहेत. अशोक लवासा यांच्यापूर्वी १९७३ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त नागेंद्र सिंग यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. दरम्यान, अशोक लवासा यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना एप्रिल २०२१ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्तपदी बढती मिळाली असती.

रोहित शर्मा-विनेश फोगाट-मनिका बत्राची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

Rohit Manika Vinesh
  • भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांची यंदाच्या मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
  • रोहित आणि विनेश फोगाट यांच्याव्यतिरीक्त महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आलेली आहे.
  • रोहित शर्माची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरु शकतो.
  • याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे.
  • सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार मिळाला होता.
  • २०१९ विश्वचषकात रोहित शर्माने ५ शतकं झळकावत केलेली बहारदार खेळी पाहता बीसीसीआयने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी दिलं होतं.
  • भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती भवनात वर्षभरात क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो.

भारताचा GDP २६ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता

भारताचा जीडीपी
  • करोना व्हायरसमुळे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेचा आर्थिक विकास दरात विक्रमी घसरण झाली आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत अधिकृत मंदी जाहीर करण्यात आली आहे. आता अशीच परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेत दिसू लागली आहे. जून तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी घसरण होऊ शकते.
  • अर्थव्यवस्था जून तिमाहीत १३.६ ते २५.७ टक्केपर्यंत घसरू शकते. जीडीपीचे आकडे अधिकृतपणे ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केले जाणार आहेत. याआधी ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ३.१ टक्के दराने वाढली होती. तेव्हा भारतात करोना व्हायरस आला नव्हता. तरी अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला होता. हा एक प्रकारे इशाराच होती की पुढील वाटचाल धीमीच असेल.
  • २०१९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ४.२ टक्क्यांनी वाढत होती.
  • २०२०च्या जून तिमाहीत अर्थव्यवस्था ५.२ टक्के दरांनी वाढत होती. पण यावेळी जून तिमाहीमधील घसरण विक्रमी असू शकते असा अंदाज आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी भारताला प्रथम कोरनावर नियंत्रण मिळवावे लागेल. त्याच बरोबर अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अन्य सपोर्ट गोष्टी कराव्या लागतील.

एसपी मलिक मेघालयाचे नवे राज्यपाल नियुक्त

Satya Pal Malik appointed as Meghalaya Governor; Bhagat Singh ...
  • गाेव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची आता मेघालयाच्या राज्यपालपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
  • त्यांनी तथागत रॉय यांचे स्थान स्वीकारले. रॉय यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे गोव्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button