Current Affairs : 19 January 2021
चंद्रपूरची 59 व्या महाराष्ट्र राज्य हिन्दी राज्य नाट्य स्पर्धेत बाजी
59 व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भाने बाजी मारली असून, चंद्रपूरच्या ‘हॅलो राधा मे रेहाना’ या नाटकाने निर्मितीच्या प्रथम पारितोषिकासह राज्यात अव्वल ठरण्याचा मान प्राप्त केला आहे.
बेळगावच्या ‘भूमिका’ या नाटकाला द्वितीय तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिंतामणनगर शाखेच्या ‘रूद्राली’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे.
‘हॅलो राधा मे रेहाना’ या नाटकाला निर्मितीचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले असून, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांना जाहीर झाले आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या अजय धवने-आशिष अम्बाडे निर्मित या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे रौप्यपदक नूतन धवने यांना, तर अभिनय गुणवत्ता पुरस्कार रोहिणी उईके यांना जाहीर झाला आहे.
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक हेमंत गुहे यांना, तर सर्वोत्कृष्ट नेपथ्याचे प्रथम पारितोषिक पंकज नवघरे, तेजराज चिकटवार यांना जाहीर झाले आहे.
सन 2020 मध्ये चीनचा विकास दर 2.3 टक्के
चीनने आपला विकास दर शुन्याच्यावर राखण्यात यश मिळवले असून सन 2020 या वर्षात चीनचा विकास दर 2.3 टक्के इतका नोंदवला गेला आहे.
अर्थात गेल्या 45 वर्षातील चीनची जीडीपी मधील ही नीचांकी कामगीरी आहे. पैशाच्या स्वरूपात चीनची अर्थव्यवस्था 15.42 ट्रीलयन डॉलर्स इतकी नोंदवली गेली.
चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटेस्टीक्सने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
सन 2020 या वर्षातील पहिल्या तीन महिन्याच्या काळात चीनच्या अर्थव्यवस्थेत 6.8 टक्के इतकी घट नोंदवली गेली होती.
दुसऱ्या तिमाहीत मात्र त्यांनी करोनावर मात करून अर्थव्यवस्थेत चांगली उभारी धरली होती. तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत चीनने स्थीरपणाने आर्थिक विकास साधला.
तथापि मॅन्युफॅक्चरिंग आणि निर्यातीच्या बळावर त्यांनी आर्थिक स्थीतीला बळ दिले. या वर्षाच्या काळात चिनचे जॉब मार्केट 5.6 टक्क्यांनी विस्तारले.
सरकारने हे मार्केट 6 टक्क्यांनी विस्तारण्याचे लक्ष निर्धारीत केले होते. सन 2020 या वर्षात चीन मध्ये एकूण 1 कोटी 18 लाख 60 हजार नवीन शहरी नोकऱ्या निर्माण केल्या. चीन मधील सध्याचा बेकारीचा दर 5.2 टक्के इतका आहे.
बार्सिलोनाला नमवून अॅथलेटिक बिलबाओ अजिंक्य
अॅथलेटिक बिलबाओने बार्सिलोनाला ३-२ असे हरवून स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले.
ग्रिझमनने ७७व्या मिनिटाला पुन्हा एकदा बार्सिलोनाची आघाडी २-१ अशी वाढवली.
विलियम्सने ९३व्या मिनिटाला गोल करून अॅथलेटिकचा विजय साकारला. १२०व्या मिनिटाला मेसीला पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.
अॅथलेटिक बिलबाओचे हे तिसरे जेतेपद ठरले. १९८४मध्ये पहिल्यांदा विजयी ठरल्यानंतर २०१५च्या अंतिम फेरीतसुद्धा त्यांनी मेसीच्या बार्सिलोनालाच पराभूत करून जेतेपदावर नाव कोरले होते.
लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटल्यामुळे लिव्हरपूलचे अग्रस्थान पटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. मँचेस्टर युनायटेड ३७ गुणांसह अग्रस्थानी आहे.