⁠
Uncategorized

Current Affairs 19 March 2019

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री

  • गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
  • प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. प्रमोद सावंत हे गोव्यातील सांखळी मतदार संघाचे भाजपाचे आमदार आहेत.
  • डॉ. प्रमोद सावंत यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

बेंगळूरु एफसीला ‘आयएसएल’चे विजेतेपद

  • अतिरिक्त वेळेपर्यंत पोहचलेल्या इंडियन सुपर फुटबॉल लीगच्या (आयएसएल) अंतिम सामन्यात मुंबईच्या राहुल भेकेने ११७व्या मिनिटाला हेडरद्वारे केलेल्या गोलच्या बळावर बेंगळूरु एफसीने गोवा एफसीवर १-० असा निसटता विजय मिळवून विजेतेपदाला गवसणी घातली.
  • गतवर्षी बेंगळुरूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. निर्णायक गोल करणाऱ्या राहुललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Federation Cup 2019 मध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा विक्रम:

  • पंजाबमध्ये सुरू असलेल्या FedCup2019 मध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने धमाकेदार कामगिरी केली. पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात त्याने सुवर्णपदकाची कमाई केली.
  • तर याचबरोबर त्याने 8 मिनिटे 28 सेकंद 94 मिलिसेकंद अशी वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला. या विक्रमासह त्याने स्वतःच्याच नावावर असलेला आधीच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आणि नवा विक्रम प्रस्थापित केला.
  • त्याच्या या विक्रमी कामगिरीमुळे चीनमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची पात्रता निश्चित झाली आहे. अविनाशने गेल्या वर्षी 8 मिनिटे 29 सेकंद 80 मिलीसेकंदाची वेळ नोंदवताना तब्बल 37 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला होता.
  • 1981 साली गोपाळ सैनी नावाच्या धावपटूने या प्रकारातील विक्रम केला होता. हा विक्रम मोडण्यासाठी तब्बल 37 वर्षे लागली. पण अविनाशने याच प्रकारातील स्वतःचा विक्रम एका वर्षात पुन्हा मोडीत काढला.

1 एप्रिलपासून स्मार्ट होणार आपले वीज मीटर:

  • 1 एप्रिलपासून अनेक गोष्टींमध्ये अनेक छोटे-मोठे बदल होणार आहेत. या बदलांसंदर्भात आपणही सजग राहिले पाहिजे. भारतात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होते, ही वीजचोरी रोखण्यासाठीही अनेक उपाय योजण्यात आले.
  • परंतु त्यात अद्याप यश आलेलं नाही. वीजचोरी रोखण्यासाठी आता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं प्रभावी उपाय आणला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विजेची चोरी रोखण्यासाठी 1 एप्रिलपासून प्रत्येक घरात प्रीपेड मीटर लावणे गरजेचे होणार आहे.
  • केंद्र सरकारने 2022 पर्यंतची मुदत दिली असून, पुढील तीन वर्षांत ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’नेच वीजपुरवठा करणे सक्तीचे होणार आहे.

१८ वर्षांच्या बियांकाने विजेतेपद पटकावलेच

  •  कॅनडाच्या १८ वर्षीय बियांका आंद्रेस्कूची विजयी वाटचाल माजी नंबर वन, जर्मनीची अँजेलीक कर्बरसुद्धा रोखू शकली नाही. वाईल्ड कार्डने प्रवेश मिळविल्यावर बियांका थेट विजेतेपदावरच थांबली. अंतिम सामन्यात तिने कर्बरवर ६-४, ३-६, ६-४ असा विजय मिळवला आणि इंडियन वेल्सच्या विजेतींच्या यादीत कॅनेडियन खेळाडूचे नाव पथमच लागले.
  • पुरुष गटात आॅस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने दिग्गज रॉजर फेडररला ३-६, ६-३, ७-५ असा पराभवाचा धक्का देत पहिल्यांदाच मास्टर्स १००० दर्जाची स्पर्धा जिंकली. यामुळे फेडररचे सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न भंगले. बियांका आंद्रेस्कू ही सेरेना विल्यम्सनंतर या स्पर्धेची सर्वात तरूण विजेती ठरली आहे. कर्बरवरचा विजय हा तिचा यंदाचा आघाडीच्या २० क्रमांकातील खेळाडूंवरचा पाचवा विजय आहे. या विजेतेपदासह ती जागतिक क्रमवारीत आता २४ व्या स्थानी पोहचणार आहे. वर्षारंभी ती १५३ व्या स्थानी होती.

Related Articles

Check Also
Close
Back to top button