चालू घडामोडी : १९ नोव्हेंबर २०२०
Current Affairs : 19 November 2020
न्यूझीलंडमध्ये महिला पोलिसांना हिजाब परिधानाची परवानगी
न्यूझीलंडमध्ये पोलीस दलात मुस्लीम महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या गणवेशात ‘हिजाब’चा समावेश करण्यात आला आहे. पण हा हिजाब विशिष्ट पद्धतीचा आहे.
कॉन्स्टेबल झिना अली या ‘हिजाब’ गणवेश परिधान करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस ठरल्या आहेत. झिना (वय ३०) या ख्राइस्ट चर्च दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या वर्षी पोलीस दलात सामील झाल्या.
हंगेरी बुद्धिबळ स्पर्धा : मेंडोसाला जेतेपद
भारताचा १४ वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर लायन मेंडोसाने हंगेरी येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
त्याबरोबरच गोव्याच्या या युवा खेळाडूने ग्रँडमास्टर किताबासाठीचा दुसरा टप्पा पार के ला.
मेंडोसाचे एलो मानांकन २५१६ असून हंगेरीतील स्पर्धा त्याने ७.५ गुणांसह जिंकली. संपूर्ण स्पर्धेत त्याने एकही पराभव पत्करला नाही.
याउलट त्याने स्पर्धेत दोन ग्रँडमास्टर्सवर विजय मिळवला.
जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा “रेसिप्रोकल अॅक्सेस अॅग्रीमेंट”
दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत महासागर प्रदेशातले चीनचे वाढते प्रभुत्व कमी करण्याच्या हेतूने 17 नोव्हेंबर 2020 रोजी जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या दरम्यान “रेसिप्रोकल अॅक्सेस अॅग्रीमेंट” नामक एक करार झाला.
करारामुळे जपानी आणि ऑस्ट्रेलियाच्या सैन्य दलांना परस्परांच्या देशांची भेट घेण्यास तसेच प्रशिक्षण व संयुक्त मोहिमा आयोजित करण्याची परवानगी मिळते.
दक्षिण चीन समुद्र हा प्रशांत महासागराचा एक भाग आहे. चीन, तैवान, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, सिंगापूर व व्हियेतनाम हे दक्षिण चीन समुद्राच्या भोवतालचे देश आहेत. नैसर्गिक वायू आणि तेल यांचे समृध्द साठे या समुद्राखाली असल्याने चीन देश या जवळजवळ संपूर्ण समुद्रावर आपला दावा करीत आहे.
प्रशांत महासागर
प्रशांत महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक
, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत. प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 32 टक्के भाग व्यापला आहे व जगातले एकूण पाण्याच्या 46 टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे.