आयएनएस चेन्नईवरुन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारताने स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवरुन रविवारी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्राने अरबी समुद्रातील एका लक्ष्यावर अचूक निशाणा साधला. उच्चस्तरीय आणि अत्यंत गुंतागुंतीचा युद्धाभ्यास केल्यानंतर या क्षेपणास्त्राने लक्ष्यावर अचूकपणे निशाणा साधला.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्राइम स्ट्राइक शस्त्राच्या रुपात समुद्रातील मोठ्या अंतरावरील लक्ष्यवर निशाणा साधू शकते.
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ४०० किमी पेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्याला उद्धवस्त करु शकते.
हे क्षेपणास्त्र पाणबुडी, युद्धनौका, लढाऊ विमानं आणि जमिनीवरुनही लॉन्च करता येते. भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ते विकसित करण्यात आलं आहे.
सुरुवातीला याची रेंज २९० किमी होती. त्यानंतर ती वाढवत ४०० किमी पेक्षा अधिक करण्यात आली. काही अंदाजांनुसार, सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ४५० किमी पेक्षा अधिक अंतरापर्यंत टार्गेटला उध्वस्त करु शकतो.
आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत इलाव्हेनिलला सुवर्ण, शाहू मानेचा रौप्यवेध
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली भारतीय नेमबाज इलाव्हेनिल वालारिवान हिने आभासी पद्धतीने झालेल्या शेख रसेल आंतरराष्ट्रीय एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. शाहू तुषार मानेने रौप्यपदकाची कमाई केली.
बांगलादेश नेमबाजी महासंघातर्फे झालेल्या या स्पर्धेत सहा देशांच्या नेमबाजांनी भाग घेतला होता. ६० वेळा वेध घेणाऱ्या या स्पर्धेत इलाव्हेनिल हिने ६२७.५ गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त के ले. शिओरी हिराटा हिने ६२२.६ गुणांसह रौप्यपदक तर इंडोनेशियाच्या विद्या तोय्यिबा हिने ६२१.१ गुणांसह कांस्यपदक मिळवले.
पुरुषांच्या प्रकारात जपानच्या नाओया ओकाडा याने ६३०.९ गुणांनिशी सुवर्णपदकावर नाव कोरले. शाहूने ६२३.८ गुणांसह रौप्यपदक पटकावले. बांगलादेशच्या बाकी अब्दुल्ला याने ६१७.३ गुणांसह कांस्यपदक प्राप्त के ले. इलाव्हेनिल परीक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय सराव शिबिरात सहभागी न झाल्याने या स्पर्धेत खेळू शकली. शाहूला राष्ट्रीय क्रमवारीनुसार या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.
रोहन जेटली यांची दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DCCA)च्या अध्यक्ष पदी निवड
माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे पुत्र आणि वकील रोहन जेटली यांची दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DCCA)च्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नोव्हेंबर दरम्यान डीडीसीएचे direct संचालक आणि कोषाध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार आहेत. 9 रोजी मतमोजणी होणार असून या दिवशी निकाल जाहीर केला जाईल.