Current Affairs 20 April 2020
न्या. दीपंकर दत्ता होणार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती
मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायामूर्ती म्हणून न्या. दीपंकर दत्ता यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने शनिवारी केली.
न्या. दत्ता सध्या कोलकाता उच्च न्यायालयात ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत. ते बढतीवर मुंबईत मुख्य न्यायाधीश म्हणून येतील.
तसेच ‘कॉलेजियम’ची ही शिफारस आता केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाकडे जाईल व त्यानंतर न्या. दत्ता यांच्या नव्या नेमणुकीचे आदेश निघतील.
तर सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. भूषण धर्माधिकारी येत्या 27 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.
गोवा कोरोनाला हरवणार पाहिलं राज्य
रविवारी गोवा राज्य करोनामुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. गोव्यामध्ये करोनाचे सात रुग्ण होते. मात्र हे सातही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. गोवा करोनामुक्त झाले असले तरी राज्य सरकारने नागरिकांनी लॉकडाउनचे निर्बंध पाळावेत, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा असं आवाहन केलं आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. “गोव्यासाठी समाधानाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. गोव्यातील शेवटच्या करोना रुग्णाची चाचणीही निगेटीव्ह आली आहे. सर्व डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी त्यांनी केलेल्या कामासाठी कौतुकास पात्र आहेत. ३ एप्रिलपासून गोव्यामध्ये एकही नवा रुग्ण अढळून आलेला नाही,” असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
व्हाटमाेर बडाेदा रणजी टीमच्या प्रशिक्षकपदी
अांतरराष्ट्रीय काेच डेव्ह व्हाटमाेर अाता बडाेद्याच्या रणजी टीमला प्रशिक्षण देणार अाहेत. त्यांची नुकतीच या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात अाली अाहे, अशी माहिती संघटनेने दिली. याशिवाय व्हाटमाेर यांच्याकडे राज्य संघटनेवर संचालकपदाचीही जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे.
केंद्राच्या ‘कृषी रथ अॅप’ने शेतकऱ्यांची सोय
प्रवासासाठी टॅक्सी बुक करण्याच्या उबर किंवा ओला अॅपच्या धर्तीवर शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी ट्रक बुक करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाने ‘कृषी रथ’ नावाचे नवे मोबाईल अॅप सुरु केले आहे.
तर या अॅपचा उपयोग करून शेतकरी त्याच्या मोबाईल फोनवरून घरबसल्या ट्रक बुक करू शकेल व हा ट्रक त्याच्या दारात येऊन त्याचा शेतमाल बाजारात घेऊन जाईल.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काही दिवसांपूर्वी या ‘कृषी रथ अॅप’चा औपचारिक शुभारंभ केला. खास करून सध्याच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात रब्बी हंगामात तयार झालेला शेतमाल घाऊक व्यापारी किंवा बाजार समित्यांपर्यंत घेऊन जाण्यास यामुळे शेतकऱ्यांयांची खूप सोय होईल. हे अॅप गुगल अॅप स्टोअरमधून डाऊनलोड करता येईल.
तसेच या अॅपच्या सेवेसाठी सध्या 5.2 लाख ट्रक व 20 हजार ट्रॅक्टरची नोदणी झालेली आहे.
अॅप डाऊनलोड केल्यावर शेतकऱ्यांला त्यात आपल्याला किती वजनाचा माल कुठून कुठे पाठवायचा आहे याची माहिती भरावी लागेल. त्यानंतर त्याला त्या भागात उपलब्ध असलेला ट्रक व त्याचे अपेक्षित भाडे याची माहिती कळविली जाईल.