नासाच्या हेलिकॉप्टरचे मंगळावर यशस्वी उड्डाण
नासाच्या (NASA) हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उड्डाण केले आहे. Perseverance roverने पृथ्वीवर पाठवलेल्या फोटोंमधून हे स्पष्ट झाले आहे.
नासाने याची पुष्टी करत म्हटलंय की, इनजेन्यूटी हेलिकॉप्टरने आपलं पहिलं उड्डाण घेतलं. एका दुसऱ्या ग्रहावर एअरक्राफ्ट उडण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.
इनजेन्युटी हेलिकॉप्टरने देखील ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाठवला असून यात त्याची छाया मंगळाच्या पृष्ठभागावर पडताना दिसली आहे.
इस्रायल ठरला जगातील पहिला कोरोनामुक्त देश
तब्बल एक वर्षभरानंतर इस्रायलने देशभरात लागू असणाऱ्या मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे.
देशातील जवळपास 80 टक्के जनतेला लस देण्यात यश मिळवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायल जगातील पहिला कोरोनामुक्त देश ठरला.
माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा : रुब्लेव्हला नमवून त्सित्सिपास अजिंक्य
स्टेफानोस त्सित्सिपासने एकही सेट न गमावता माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
चौथ्या मानांकित त्सित्सिपासने रविवारी अंतिम सामन्यात आंद्रे रुब्लेव्हचा ६-३, ६-३ असा पराभव केला.
त्सित्सिपासचे हे वर्षातील पहिले आणि एकंदर सहावे जेतेपद ठरले. ग्रीसच्या २२ वर्षीय त्सित्सिपासने गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात अखेरचे जेतेपद पटकावले होते.
त्सित्सिपासने गतवर्षी फेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतही रुब्लेव्हला नमवले होते.
खंजर’: भारत आणि किर्गिझस्तान यांची आठवी संयुक्त लष्करी कवायत
भारत आणि किर्गिझस्तान यांची ‘खंजर’ नामक आठवी संयुक्त लष्करी कवायत बिश्केक (किर्गिझस्तान देशाची राजधानी) येथे आयोजित करण्यात आली.
दोनही देशांच्या विशेष दलांची ही संयुक्त कवायत आहे. याची 2011 साली सुरुवात झाली, ज्यामध्ये उंचावरील युद्ध, डोंगरामधील युद्ध अश्या कौशल्यावर भर देण्यात येते.
किर्गिझस्तान किंवा किर्गिझ प्रजासत्ताक हा मध्य आशियातील एक देश आहे. पूर्वी किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचा एक भाग होता. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. त्याचे राष्ट्रीय चलन सोम हे आहे.