चालू घडामोडी : २० फेब्रुवारी २०२१
Current Affairs : 20 February 2021
‘नासा’चे रोव्हर मंगळावर
सात महिन्यांच्या प्रवासानंतर अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेची ‘परसेव्हेरन्स’ ही बग्गीसारखी गाडी मंगळावर उतरवण्यात यश आले आहे.
मंगळावरील सूक्ष्म जीवसृष्टीचा शोध घेण्याचे काम ही गाडी करणार आहे.
अतिशय प्रगत तंत्रज्ञान या गाडीत वापरण्यात आले असून ही मंगळ मोहीम २०२० गेल्या ३० जुलैला सुरू झाली होती.
गेल्या वर्षी फ्लोरिडातील केप कॅनव्हरॉल येथून अवकाशयानासह ही गाडी पाठवण्यात आली होती.
पृथ्वीपासून ४७२ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करून ही गाडी उतरली असून मंगळावरचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे
अंकिता रैनाचे पहिलेवहिले जेतेपद
भारताच्या अंकिता रैना हिने रशियाची साथीदार कॅमिला राखीमोव्हा हिच्या साथीने संघर्षपूर्ण विजय मिळवत पहिल्यावहिल्या डब्ल्यूटीए जेतेपदावर नाव कोरले.
अंकिता-कॅमिला जोडीने फिलिप आयलँड करंडक टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत रशियाच्या जोडीवर विजय मिळवला.
अंकिता-कॅमिला जोडीने अॅना ब्लिंकोव्हा आणि अॅनास्तेशिया पोटापोव्हा यांच्यावर २-६, ६-४, १०-७ अशी मात केली.
या कामगिरीमुळे अंकिताने महिला दुहेरीत ९४व्या स्थानी मजल मारली आहे.
अव्वल १०० जणींमध्ये स्थान मिळवणारी अंकिता ही सानिया मिर्झानंतरची भारताची दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे.
दोन आठवडय़ांपूर्वी अंकिताने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत मुख्य फेरीत स्थान मिळवले होते.
जल जीवन मिशन(शहरी) पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्याची योजना
2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी ‘शाश्वत विकासाचे ध्येय-6’ (SDG Goal-6) याच्याअंतर्गत जल जीवन मिशन (शहरी) योजना जाहीर केली.
ठळक बाबी……….
जल जीवन मिशन (शहरी) योजना याची रचना सर्व 4378 वैधानिक छोट्या शहरांमधील सर्व घरांना क्रियाशील नळांद्वारे पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्यासाठी केली आहे.
शहरी घरगुती नळ जोडणीमधील अंदाजे तफावत सुमारे दोन कोटी 68 लक्ष आहे, ज्यांचा जल जीवन मिशन अंतर्गत समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.
अभियान सांडपाण्याचा पुनर्वापर, जलसंपत्तीचे पुनरुज्जीवन आणि जलसंधारणावर लक्ष केंद्रित असेल.20 टक्के पाण्याची मागणी संस्थात्मक यंत्रणेच्या विकासासह पुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे.
अभियानासाठी प्रस्तावित एकूण खर्च 2 लक्ष 87 हजार कोटी रुपये एवढा आहे.
अभियानाच्या अंतर्गत 4,378 शहरी स्थानिक मंडळ पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल. 500 अमृत (AMRIT) शहरांमध्ये लिक्विड बेस्ड व्यवस्थापन करणे नियोजित आहे.
योजनेत आगामी काही वर्षांत 3.60 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 2019-20 मध्ये निर्मला सीतारमन यांनी घरापर्यंत नळ योजनेची घोषणा केली होती. ही योजना जल जीवन मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
जल जीवन मिशन…
जल जीवन मिशनचा शुभारंभ 2019 साली करण्यात आला होता. केंद्र सरकार या मोहिमेच्या अंतर्गत देशातील सर्व भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे.
2024 सालापर्यंत सर्व घरांना नळाने पाणी देणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी पुरविणे, दरडोई 55 लिटर पाणीपुरवठा, शुद्ध पाणी देण्याचा संकल्प, सार्वजनिक नळाद्वारे कुटुंबांना पाणीपुरवठा ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत.
मलेरिया मोहिमेसाठी भारतीय वंशाचे डॉक्टर जागतिक समन्वयक.
अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनाने डॉ. राज पंजाबी यांची नेमणूक मलेरिया नियंत्रण मोहिमेचे समन्वयक म्हणून केली असून ते भारतीय वंशाचे आहेत.
आफ्रिका व आशियायी देशातून मलेरियाचे उच्चाटन करण्याचा उद्देश या मोहिमेत आहे.
लायबेरियात जन्मलेले पंजाबी व त्यांचे कुटुंबीय तेथील यादवी युद्धानंतर अमेरिकेत पळून आले होते व १९९० मध्ये शरणार्थी म्हणून आयुष्य जगत होते.