देश-विदेश
राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांच्या नावाची अधिकृत घोषणा
# अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षीय उमेदवारीसाठी हवी असणारी मते मिळवली आहेत. तब्बल १२३७ मताधिक्य मिळवून ट्रम्प यांनी ही उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे आता अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीत माजी परराष्ट्रमंत्री व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि ट्रम्प यांच्यात लढत रंगणार हे निश्चित झाले आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत क्लिंटन व ट्रम्प यांच्यातील शाब्दिक युद्ध पहायला मिळाले होते. क्लिंटन यांनी कॅलिफोर्नियातील प्रचारसभेत ट्रम्प यांची तुलना हुकूमशहाशी केली होती.
‘गुगल’वर जगातील टॉप गुन्हेगारांच्या यादीत मोदींच्या नावावरून कंपनीला नोटीस
# पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जगातील टॉप टेन गुन्हेगारांच्या यादीत समावेश केल्याबद्दल अलाहाबाद न्यायालयाने ‘गुगल’ कंपनी, तिचे सीईओ आणि कंपनीचे भारतातील प्रमुख यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी कंपनीविरुद्ध गुन्हेगारी खटला दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. जगातील दहा प्रमुख गुन्हेगारांची नावे गुगलवर सर्च केल्यावर त्यामध्ये मोदींचा फोटो दिसत होता. मोदींचे नाव हटविण्यासाठी तक्रारदाराने ‘गुगल’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ‘गुगल’ने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी वकील सुशीलकुमार मिश्रा यांच्यामार्फत या प्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली. पण हे प्रकरण दिवाणी असल्याचे सांगत त्यांची याचिका ३ नोव्हेंम्बर २०१५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
रोहित खंडेलवाल पहिला भारतीय ‘मिस्टर वर्ल्ड’
# नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘मिस्टर वर्ल्ड‘ हा किताब हैदराबादच्या रोहित खंडेलवालच्या याच्या रुपाने यावर्षी पहिल्यांदाच भारतीयाने पटकाविला आहे. साऊथपोर्ट येथील साऊथपोर्ट थिएटरमध्ये काल (मंगळवार) मोठ्या उत्साहात ‘मिस्टर वर्ल्ड 2016‘चा कार्यक्रम पार पडला. ‘मिस्टर वर्ल्ड 2016‘च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या भव्य सोहळ्याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या स्पर्धेत जगभरातील एकूण 47 स्पर्धक सहभागी झाले होते. रोहित खंडेलवाल याने या किताबासह 50 हजार डॉलरचे पोरितोषिक मिळविले. निवेदिता साबू यांनी डिझाईन केलेला टक्सिडो रोहितने यावेळी परिधान केला होता. मिस्टर वर्ल्ड जिंकून अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल रोहित खंडेलवाल याच्यावर भारतीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अर्थशास्त्र
सरकारी बँकांना २३ हजार कोटींची भांडवली मदत
# बुडित कर्जाच्या भयंकर ताण असलेल्या देशातील सार्वजनिक बँकांना सरकारने भांडवली सहाय्यतेचा पहिला हप्ता म्हणून २२,९१५ कोटी रुपये मंगळवारी देऊ केले. विविध १३ बँकांना भांडवली पूर्ततेसाठी हा निधी वापरात येईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकरिता चालू आर्थिक वर्षांतील हा पहिला अर्थसहाय्याचा टप्पा आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तळात गेलेला पतपुरवठा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेसह पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आदी बँकांना ७,५०० कोटी रुपयेपर्यंतची रक्कम मिळणार आहे. सरकारी अर्थसहाय्याचा सर्वाधिक हिस्सा देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेच्या वाटय़ाला आला आहे. बँकेला ७,५७५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. १,००० ते ३,००० कोटी रक्कम सहा बँकांना मिळाली आहे. सर्वात कमी, ४४ कोटी रुपये देना बँकेला मिळाले आहेत.