ट्रम्प यांची निवडणुकीत ‘कीप अमेरिका ग्रेट’ची घोषणा
- अमेरिकी अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवित असून २०२० मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ त्यांनी फोडला.
- या पूर्वी ‘मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन’अशी घोषणा देणाऱ्या ट्रम्प यांनी आता ‘कीप अमेरिका ग्रेट’ अशी नवी घोषणा दिली आहे.
- ट्रम्प (वय ७३) हे स्थावर मालमत्ता गुंतवणूकदार होते ते नंतर राजकारणात आले. २०१७ मध्ये ते अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष झाले. ट्रम्प यांच्या विरोधात लढण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षात किमान डझनाहून अधिक दावेदार आहेत.
अमेरिकेच्या संरक्षणमंत्रिपदी मार्क एस्पर यांची निवड
- अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटॉल हिलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले व पहिल्या इराक युद्धाचा अनुभव असलेले माजी लष्करी अधिकारी मार्क एस्पर यांचे नाव संरक्षण मंत्रिपदासाठी निश्चित केले आहे.
- सध्याचे लष्कर सचिव मार्क एस्पर हे हंगामी पातळीवर संरक्षण मंत्री म्हणून काम पाहतील.
- सध्याचे हंगामी संरक्षण मंत्री पॅट्रिक श्ॉनहान यांनी संरक्षणमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून त्यांचे नाव सिनेटकडे पाठवले जाण्यापूर्वीच त्यांनी कौटुंबिक कारणास्तव पदावर राहणार नाही असे स्पष्ट केले.
- नवे संरक्षण मंत्री एस्पर यांचा नोव्हेंबर २०१७ मध्ये लष्कर सचिव म्हणून शपथविधी झाला होता. त्याआधी ते रेथिऑन या कंपनीत सरकार- संरक्षण संबंध विषयक उपाध्यक्ष होते .
हवेचे प्रदूषण पाहता येणार ‘डिस्प्ले बोर्ड’वर
- तुम्हाला नगर रस्ता, हडपसर, बाणेर, तसेच कात्रज या भागांतून येता-जाताना हवेतील प्रदूषणाची नेमकी पातळी कळणार आहे, त्यासाठी या भागातील ‘रिअल टाइम’ हवा प्रदूषणाची माहिती मिळण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी) ‘डिस्प्ले बोर्ड’ बसविण्यात येणार आहेत.