⁠
Uncategorized

Current Affairs 20 March 2019

माजी न्यायमूर्ती पी सी घोष देशाचे पहिले लोकपाल

  • केंद्र सरकारने माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची देशाच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी
    न्यामूर्ती घोष हे मानवाधिकार प्रकरणातील विशेष तज्ज्ञ आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी त्यांच्या नावाला मंजुरी दिली
    आहे.
  • न्या. दिलीप बी भोसले, न्या. प्रदीपकुमार मोहंती, न्या. अभिलाषा कुमारी, न्या. अजयकुमार त्रिपाठी हे न्यायिक सदस्य असतील. न्यायिक
    सदस्यांबरोबर दिनेशकुमार जैन, अर्चना रामसुंदरम, महेंद्रसिंह आणि डॉ. इंद्रजितप्रसाद गौतम हे इतर चार सदस्यही असतील.
  • देशाचे पहिले लोकपाल नियुक्त करण्यात आलेले न्या. पी. सी. घोष हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश होते. तसेच आंध्र प्रदेश हायकोर्टाचे
    ते मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्यही आहेत.
  • लोकपाल नियुक्तीच्या निवड समितीने ही नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य न्यायाधीश किंवा त्यांच्याद्वारे
    नियुक्त न्यायाधीश, विरोधी नेता, लोकसभा अध्यक्ष आणि एक निवड सदस्य असतो. सुप्रीम कोर्टात विरोधी नेता नसल्याने अशा स्थितीत
    विरोधी पक्षाच्या नेत्यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येणार होते.

राष्ट्रपतींच्या हस्ते कीर्ती, शौर्य चक्र प्रदान

  • देशाच्या सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कीर्ती आणि शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आले.
  • जम्मू-कश्मीरमध्ये घरावर केलेला दहशतवादी हल्ला परतवून लावताना वीरमरण आलेल्या इरफान रमजान शेख या 16 वर्षांच्या मुलाला मरणोत्तर शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आले.
  • आर्मर कॉप्सच्या विजय कुमार व सीआरपीएफच्या प्रदीप कुमार यांना कीर्ती चक्राने गौरवण्यात आले.

Special Olympic : दिव्यांग मुलीने भारतासाठी जिंकली दोन पदकं

  • Special Olympic World Games Abu Dhabi 2019 : भारताची महिला टेबल टेनिसपटू सबिता यादव हिने विशेष (दिव्यांग) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला दोन पदके जिंकून दिली. तिने एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले, तर दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.
  • ७ वर्षीय सबिताला बौद्धिक अपंगत्वाबरोबरच नीटपणे बोलता येत नाही.
    या स्पर्धेत सध्या भारत पहिल्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत भारताच्या नावावर १६३ पदके आहेत. यात ४४ सुवर्ण, ५२ रौप्य आणि ६७
    कांस्यपदके आहेत. या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पहिल्या निवडणुकीच्या वेळी साक्षरतेचे प्रमाण होते फक्त १६ टक्के

  • पहिली सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर १९५१ ते मार्च ५२ या काळात झाली. त्या वेळी प्रशासनाला निवडणूक घेण्याचा व लोकांना मतदान करण्याचा अनुभव नव्हता. साक्षरतेचे प्रमाण फक्त १६ टक्के होते. महिलांमध्ये हे प्रमाण त्याहूनही कमी होते.
  • सुकुमार सेन या आयसीएस अधिकाऱ्याची पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली. पहिले आव्हान त्यांच्यासमोर होते.
  • देशातील पहिल्या मतदाराचे नाव होते हिमाचल प्रदेशचे शाम सरन नेगी यांचे.
  • तेव्हा ४८९ लोकसभा व ४००० विधानसभेच्या जागांसाठी एकाच वेळी निवडणूक झाली. मतदानासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणून प्रत्येक उमेदवारासाठी एक मतपेटी ठेवावी व ज्या मतपेटीत सर्वाधिक मते तो विजयी, सोपी पद्धत निवडली.
  • देश पातळीवरील १४ व राज्य पातळीवरील ५९ पक्षांना मान्यता देण्यात आली.

Related Articles

Back to top button