⁠
Uncategorized

चालू घडामोडी : २० नोव्हेंबर २०२०

Current Affairs : 20 November 2020

सीमा ढाका ठरल्या ‘आऊट ऑफ टर्न प्रमोशन’ मिळवणाऱ्या पहिल्या महिला कॉन्स्टेबल

seema dhaka

दिल्लीच्या एका महिला हेड कॉन्स्टेबलने केवळ अडीच महिन्यांत ७६ बेपत्ता लहान मुलांचा शोध घेतल्याबद्दल त्यांचा ‘ऑऊट ऑफ टर्न प्रमोशन’ देऊन गौरव करण्यात आला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तीन महिन्यांत विशेष बढती मिळवणाऱ्या त्या पहिल्या पोलीस कर्मचारी ठरल्या आहेत.
सीमा ढाका यांना आपल्या कामाच्याप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणासाठी या विशेष बढतीनं गौरविण्यात आलं आहे.
पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी काही महिन्यांपूर्वी पोलिसांसाठी एक प्रोत्साहन योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार, वर्षभराच्या काळात १४ वर्षांखालील ५० पेक्षा अधिक मुलांना वाचवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना ‘आऊट ऑफ टर्न प्रमोशन’ देण्यात येईल, असं म्हटलं होतं

व्यापारासाठी लाचखोरीमध्ये भारत 77 व्या स्थानावर

व्यापारासाठी लाचखोरी करण्याबाबत भारत 45 गुण मिळवून जगात 77 व्या स्थानावर आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
‘ट्रेस’ या लाचखोरीविरोधी संघटनेने 194 देश, प्रांत त्याचप्रमाणे स्वायत्त आणि निमस्वायत्त प्रदेशांमध्ये पाहणी केली.
तर या वर्षीच्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, व्हनेझुएला व एरिट्रिया हे देश लाचखोरीत आघाडीवर असल्याचे, तर डेन्मार्क, नॉर्वे, फिनलण्ड, स्वीडन आणि न्यूझीलंड सर्वात तळाशी आहेत.

दुष्काळग्रस्त सात देशांना संयुक्तराष्ट्रांची 100 दशलक्ष डॉलर्सची मदत

United Nations

अफ्रिका आणि मध्यपुर्वेतील सात राष्ट्रांना सध्या दुष्काळाची समस्या चांगलीच भेडसावत आहे.
या सात राष्ट्रांना संयुक्तराष्ट्रांकडून 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत घोषित करण्यात आली आहे.
संयुक्तराष्ट्रांच्या मानवतावादी कार्याच्या प्रमुखांनी ही मदत जाहीर करताना आता जगाच्या अनेक देशांना यापुढील काळात दुष्काळाची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे असा इशारा दिला आहे.
संयुक्तराष्ट्रांनी जाहींर केलेल्या निवेदनानुसार अफगाणिस्तान, बुर्किनाफासो, कॉंगो, नायजेरिया, दक्षिण सुदान आणि येमेन या राष्ट्रांसाठी 80 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर करण्यात आली असून इथोपियातील भूकग्रस्त लोकांच्या मदतीसाठी 20 दशलक्ष डॉलर्सची मदत राखून ठेवण्यात आली आहे.

mpsc telegram channel

Related Articles

Back to top button