⁠
Uncategorized

चालू घडामोडी : २१ ऑगस्ट २०२०

Current Affairs : 21 August 2020

जनरल सुलेमानी यांच्या नावाने इराणचे नवीन क्षेपणास्त्र

iran
  • इराणने आपल्या नवीन क्षेपणास्त्राचे उद्‌घाटन केले. जानेवारीमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या जनरल सुलेमानी यांचे नाव या क्षेपणास्त्राला देण्यात आले आहे. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा उद्योग दिन 22 ऑगस्टला असतो.
  • त्याच्या औचित्याने हे नवीन क्षेपणास्त्र जगासमोर आणण्यात आणले जाणार आहे.
  • सरकारी वृत्तवाहिनीवरून इराणचे संरक्षण मंत्री अमिर हतामी यांनी देशाच्या संरक्षण सिद्धतेची माहिती दिली. त्यामध्ये या नवीन क्षेपणास्त्राची माहिती देण्यात आली.
  • हाजी कासिम सुलेमानी असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. याशिवाय अबू मेहदी नावाचे क्रूझ क्षेपणास्त्राची माहितीही हतामी यांनी दिली. बगदाद जवळ अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यामध्ये सुलेमानी यांच्याबरोबर मेहदी हे देखील ठार झाले होते.
  • कासिम सुलेमानी या क्षेपणास्त्राची मारक क्षमता तब्बल 1,400 किलोमीटर पर्यंत असणार आहे.
  • तर अबू मेहदी हे क्षेपणास्त्र 1,000 किलोमीटर दूरवरचे लक्ष्य भेदण्यास सक्षम असणार आहे. याशिवाय देशांतर्गत बनावटीच्या ड्रोनची माहितीही यावेळी देण्यात आली.

स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर

  • नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील १३ असे एकूण १७ पुरस्कार मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे.
  • मोठय़ा राज्यांच्या मानांकनात राज्याला दुसरा क्रमांक मिळाला असून, सर्वाधिक स्वच्छ शहराचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नवी मुंबईला, तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे.
  • नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक चार पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार मिळवत राज्याने आपली घोडदौड कायम राखली आहे.
  • सलग तीनही वर्षी सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे.
  • या सोहळ्यात देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नवी मुंबई शहराला मिळाला आहे. विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे.
  • त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे. पश्चिम विभाग श्रेणीमधील २५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा शहराला स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार तर शाश्वत स्वच्छता शहर म्हणून जेजुरी, तर नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या अकोले शहराला पुरस्कार मिळाला.
  • २५ ते ५० हजार या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीतील शिर्डीला स्वच्छ शहर म्हणून, तर स्वच्छतेसाठी नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या विटा शहराला पुरस्कार मिळाला आहे.
  • शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे.
  • नागरिकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसाद या श्रेणीत हिंगोली तर गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव शहराला आणि स्वच्छ शहर म्हणून रत्नागिरीला सन्मानित करण्यात आले आहे.
  • देहू रोड कॅन्टोमेंट परिसराला गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणारे शहर या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.
  • अमृत शहरांच्या स्वच्छ श्रेणीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील १०० अव्वल अमृत शहरांमध्ये राज्यातील ३१ शहरांचा समावेश आहे. ७५ टक्के अमृत शहरे पहिल्या १०० शहरांमध्ये आली आहेत, तर २५ नॉन अमृत शहरांपैकी २० शहरे राज्यातील आहेत.
  • कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित १४१ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ७७ शहरांचा समावेश आहे.

भारतातील तीन विमानतळं अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे.
  • सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.
  • मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
  • या विमानांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

खाद्यतेलांच्या आयातीत झाली वाढ, जुलैमध्ये ११ महिन्यांतील उच्चांक

Edible oil imports rise to 11 month high in July | खाद्यतेलांच्या आयातीत झाली वाढ, जुलैमध्ये ११ महिन्यांतील उच्चांक
  • जुलै महिन्यामध्ये देशातील खाद्यतेलांची आयात वाढली असून, ती ११ महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.
  • सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) या खाद्यतेल व्यापाऱ्यांच्या संघटनेने ही माहिती जाहीर केली आहे.
  • जुलै महिन्यामध्ये १५.१७ लाख टन खाद्यतेले आयात केली गेली. मागील वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये १३.४७ लाख टनांची आयात झाली होती. याचाच अर्थ यंदा १३ टक्क्यांनी आयातीमध्ये वाढ झाली आहे.
  • नऊ महिन्यांमध्ये ११ टक्क्यांनी घट
  • खाद्यतेल आयातीसाठी नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे वर्ष असते. चालू वर्षाच्या नोव्हेंबर ते जुलै या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये आयातीत ११ टक्क्यांनी घट झाली आहे. या कालावधीमध्ये ९५.६९ लाख टन तेलाची आयात झाली आहे.
  • चालू वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये सरकारने पामतेलाचा समावेश प्रतिबंधित उत्पादनांमध्ये केल्यामुळे या तेलाच्या आयातीमध्ये मोठी घट
  • झाली आहे. याचा परिणाम म्हणून देशातील आयात घटली असल्याचे सांगण्यात येते.
  • या देशांकडून केली जाते आयात
  • भारत हा जगातील खाद्यतेलाचा मोठा आयातदार देश असून, विविध देशांकडून विविध प्रकारची तेले आपण आयात करीत असतो. सूर्यफुलाच्या तेलाची आयात ही मुख्यत्वे युक्रेन आणि रशियाकडून केली जात असते.
  • अर्जेंटिनाकडून सोयाबीन आणि काही प्रमाणामध्ये अन्य तेलांची आयात होत असते. देशात येणारे पामतेल हे मुख्यत: मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांमधून येत असते.

क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ?

राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ करण्याचे संकेत क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्याला २५ लाख रुपये आणि अर्जुन पुरस्कार विजेत्याला १५ लाख रुपयांचे बक्षीस यापुढे देण्याचा विचार क्रीडा मंत्रालय करत आहे. अर्थातच याबाबत अधिकृत घोषणा क्रीडा मंत्रालयाने केलेली नाही.
सध्या खेलरत्न पुरस्कार विजेत्याला साडेसात लाख रुपये आणि अर्जुन पुरस्कार विजेत्याला पाच लाखांचे बक्षीस क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येते. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर या वर्षीपासूनच वाढीव बक्षीस रक्कम पुरस्कारप्राप्त खेळाडूंना देण्यात येणार असल्याचे समजते.
महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण होते.
द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांच्या रकमेतही वाढ करून ती १० लाख रुपये करण्यात येण्याचाही विचार आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी यंदा एकूण ६२ जणांची शिफारस करण्यात आली.

Related Articles

Check Also
Close
Back to top button