⁠  ⁠

चालू घडामोडी : २१ फेब्रुवारी २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Current Affairs : 21 February 2021

नाओमी ओसाका दुसऱ्यांदा चॅम्पियन; करिअरमध्ये चाैथा ग्रँडस्लॅम किताब

Image result for नाओमी ओसाका

कारकीर्दीत चौथ्यांदा अंतिम फेरीत मजल मारल्यानंतर जेतेपदावर नाव कोरण्याची करामत जपानच्या नाओमी ओसाकाने यावेळीही साधली.
जपानच्या ओसाकाने अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडी हिचा सहज धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले. ओसाकाचे हे एकू ण चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे दुसरे जेतेपद ठरले.
सेरेना विल्यम्स, गार्बिन मुगुरुझा, ओन्स जबेऊर आणि साय सू-वेई या अव्वल खेळाडूंवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या ओसाकाने ब्रॅडी हिलाही सहज पराभूत केले. कारकीर्दीच्या सुरुवातीलाच चार ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारी ओसाका ही मोनिका सेलेसनंतरची (१९९१) दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. त्याचबरोबर चार ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या १५ जणींच्या मांदियाळीत ओसाकाने स्थान पटकावले.
तिसऱ्या मानांकित ओसाकाला ब्रॅडीने पहिल्या सेटमध्ये लढत दिली. ४-४ अशा स्थितीनंतर ओसाकाने ब्रॅडीची सव्‍‌र्हिस भेदली. त्यानंतर आपल्या सव्‍‌र्हिसवर गुण मिळवत ओसाकाने पहिल्या सेटवर नाव कोरले. दुसऱ्या सेटमध्ये मात्र ओसाकाने धडाक्यात सुरुवात केली. ब्रॅडीची दोन वेळा सव्‍‌र्हिस मोडीत काढत ओसाकाने ४-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा सेट ६-३ असा सहज जिंकून तिने जेतेपद आपल्या नावावर केले.

ओडिशी भाषेतील चित्रपट ऑस्करच्या मुख्य शर्यतीत

Image

निला माधव पांडाच्या ओडिशी भाषेतील “कलिरा अतीता’ या चित्रपटाने प्रतिष्ठित अकादमी पुरस्कार शर्यतीत प्रवेश केला असून सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणींत या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे.
ऑस्कर स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शकाच्या चित्रपटाची निवड केवळ ओडिया सिनेमासाठी महत्त्वाचा क्षण नव्हे तर भारतीय सिनेरसिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.
यापूर्वी गोव्यातील 51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (आयएफएफआय) इंडियन पॅनोरामामध्ये या सिनेमाची निवड झाली होती. पिटोबॅश त्रिपाठी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात हवामानातील बदलाचा आणि आपले कुटुंब समुद्रात गमावलेल्या एका मनुष्यावर कसा परिणाम होतो, यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.
भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील खेड्यांच्या पार्श्‍वभूमीवर या चित्रपटामध्ये हवामानातील बदल आणि समुद्राच्या वाढत्या पातळीच्या कठोर वास्तवावर जोर देण्यात आला आहे. पांडा त्याच्या चित्रपटांद्वारे पर्यावरणीय आणि सामाजिक चिंता व्यक्त करण्यासाठी प्रसिध्द आहे.

Share This Article