⁠  ⁠

चालू घडामोडी :२२ फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 22 February 2020

आयर्लंडचे पंतप्रधान वराडकर यांचा राजीनामा

skynews leo varadkar ireland 4916003

आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला.
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वराडकर यांच्या फाईन गेईल पक्षाची पीछेहाट झाली. त्यामुळे ते पंतप्रधान पदावरून पायउतार झाले.
फेरनिवडीसाठी वराडकर खासदारांचे आवश्‍यक संख्याबळ पाठिशी उभे करू शकले नाहीत. आता नवे सरकार स्थापन होईपर्यंत 41 वर्षीय वराडकर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळतील. त्यांनी 2017 मध्ये सुत्रे स्वीकारली त्यावेळी ते आयर्लंडचे सर्वांत तरूण पंतप्रधान ठरले. वराडकर यांचे पूर्वज मूळचे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. काही महिन्यांपूर्वी केलेल्या भारत दौऱ्यात त्यांनी आवर्जून मूळगावाला भेट दिली होती.

गाैरव जाेगदंडला शिवछत्रपती पुरस्कार

राज्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडू, मार्गदर्शकांचा शिवछत्रपती पुरस्काराने गाैरव करण्यात येणार अाहे. शनिवारी मुंबईतील गेटवे अाॅफ इंडिया येथे पुरस्कार वितरण साेहळ्याचे अायाेजन करण्यात अाले.
या साेहळ्यामध्ये ६३ जणांना पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यामध्ये अाैरंगाबादच्या जलतरणपटू सागर बडवेसह गाैरव जाेगदंडचा समावेश अाहे. याशिवाय रंगनाथ पठारे यांना जीवन गाैरव पुरस्कार देण्यात येणार अाहे. तसेच ४८ खेळाडू यंदा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले. यामध्ये २५ महिला अाणि २३ पुरुष खेळाडूंचा समावेश अाहे. तसेच क्रीडा मार्गदर्शक अाणि दिव्यांगांचाही यात गाैरव केला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत हा साेहळा हाेईल. तसेच खेलाे इंडियातील पदक विजेत्यांनाही सन्मानित केले जाणार अाहे.

AsianWrestlingChampionships : विनेश फोगाटला कांस्यपदक

View image on Twitter

नवी दिल्ली : जागतिक अंजिक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणा-या विनेश फोगाट हिला ( ५३ किलो वजनी) आशियाई कुस्ती स्पर्धेतही कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.
कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत विनेश हिने व्हिएतनामच्या थी जी कियू हिचा १०-० ने पराभव करत विजय नोंदविला.
याधीच्या लढतीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणा-या जपानच्या मायो मुकेदा हिने विनेश फोगाट हिचा ६-२ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

जागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे श्रीनगरमध्ये आयोजन

जागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे श्रीनगरमध्ये आयोजन

श्रीनगरमध्ये जागतिक गुंतवणूकदार परिषद, २०२० चे आयोजन करण्यात आले. यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उपलब्ध गुंतवणूकीचे प्रदर्शन करणे, तसेच नव्याने गठीत केंद्र शासित प्रदेशामध्ये गुंतवणूकीला आमंत्रित करणे याबाबत सखोल चर्चा झाली. हे परिषद एकूण ३ दिवस चालले. श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये खालील विविध क्षेत्रात उपलब्ध गुंतवणूक संधी प्रदर्शित करणे हे ध्येय ठेवण्यात आले आहे.

भविष्याकरिता वैश्विक शिक्षण निर्देशांक: भारताची ३५ व्या क्रमांकावर झेप

भारताची भविष्याकरिता वैश्विक शिक्षण निर्देशांकात ३५ व्या क्रमांकावर झेप घेतली. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने प्रकाशन केलं.
भारत: कामगिरी
भारताची ५ स्थानांनी झेप, सध्या ५३ गुणांसह ३५ व्या क्रमांकावर
क्रमवारी आधार
विद्यार्थ्यांना कौशल्य-आधारित शिक्षणात सुसज्ज करण्याची देशाची क्षमता
गुणप्रदान आधार
शिक्षण, धोरण वातावरण आणि अध्यापन वातावरण या ३ विभागांमधील कामगिरी
सध्या भारताचे ५३ गुण
भारत: गत कामगिरी
२०१८ मध्ये भारत एकूण ४१.२ गुणांसह ४० व्या स्थानावर
विभागवार गुणप्राप्ती
धोरण वातावरणात ५६.३ गुण
अध्यापन वातावरणात ५२.२ गुण
सामाजिक-
आर्थिक वातावरणात भारताला ५०.१ गुण
जागतिक क्रमवारी
घसरण देश – अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स,
कामगिरी सुधारणा
भारत, चीन, इंडोनेशिया

Share This Article