‘इस्रो’च्या रिसेट – 2 बी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आणखी एक सुवर्ण कामगिरी केली आहे. बुधवारी पहाटे इस्रोने Risat- 2BR1 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
- तामिळनाडूतील श्रीहरीकोटा येथून या उपग्रहाचे पीएसएलव्ही-सी60च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण महत्त्वाचे मानले जाते होते कारण रिसेट उपग्रह मालिकेतील हा चौथा उपग्रह होता. या उपग्रहामुळे शत्रूवर नजर ठेवणे आणि नैसर्गिक आपत्तीवेळी माहिती जमा करता येणे शक्य होणार आहे.
- RISAT-2B या उपग्रहाचा उपयोग शत्रूवर नजर ठेवण्याबरोबर शेती, वन खाते, आपतकालीन व्यवस्थापनासाठी होईल. त्यामुळे या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी सांगितले. RISAT-2B च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता इस्रो चंद्रयान-२ मोहीमेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
मुईनुल हक पाकचे भारतातील नवीन उच्चायुक्त
- पाकिस्तानने आपले भारतातील नवीन उच्चायुक्त म्हणून मुईनुल हक यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीला पंतप्रधान इम्रान खान यांनी काल मान्यता दिली.
- त्यांनी यावेळी एकूण 24 विदेशी प्रतिनिधींची नियुक्ती केली. हक हे सध्या पाकिस्तानचे फ्रांसचे राजदूत म्हणून काम करीत आहेत. त्यांनी या आधी पाकिस्तानी विदेश मंत्रालयाच्या प्रोटोकॉल विभागाचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे.
- पाकिस्तानचे भारतातील विद्यमान उच्चायुक्त सोहेल मेहमुद यांची पाकिस्तानचे नवे विदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने हे पद रिक्त होते.
- विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांच्या शिफारशी नंतर हक यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
पाकिस्तानी नागरीकांना व्हिसा देणे बांगलादेशने थांबवले
- ढाका – बांगलादेशने पाकिस्तानी नागरीकांना आपल्या देशाचे व्हिसा देणे तात्पुरते थांबवले आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या निर्माण झालेल्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षी बांगलादेशने पाकिस्तानी उच्चायुक्तांनाहीं आपल्या देशाचा व्हिसा नाकारला होता. तेव्हापासून दोन्हीं देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. ही व्हिसा बंदी आठवडाभरासाठीच आहे. तिच्या मुदतवाढीचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे.
- पाकिस्तानकडून बांगला नागरीकांना व्हिसा जारी करण्यात अडचणी येत आहेत. त्यांच्या व्हिसा अर्जांवर निर्णय होत नाहीत त्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशाने ही कृती केली असल्याचे सांगण्यात येते.
नेपाळमध्ये चिनी डिजीटल वॉलेटवर वॉलेटवर बंदी
- नेपाळमध्ये आजपासून “अलीपे’ आणि “वुईचॅट’सारख्या चिनी डिजीटल वॉलेटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. हजारो चिनी पर्यटकांच्या माध्यमातून या डिजीटल वॉलेटचा वापर नेपाळमधील वास्तव्यादरम्यान करत असतात.
- नेपाळमधील पर्यटन ठिकाणी असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानांमध्ये विशेषतः चिनी उद्योजकांच्या दुकानांमध्ये या डिजीटल वॉलेटचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. त्यामुळे नेपाळला विदेशी चलनातील उत्पन्न मिळत नव्हते. हा तोटा टाळण्यासाठी नेपाळ सरकारने या डिजीटल वॉलेटच्या वापरावर बंदी घातली आहे.
- “अलीपे’ची सुरुवात ई कॉमर्समधील अग्रगण्य अलिबाबाने केली आहे. त्याची मालकी ऍन्ट फायनान्शियलकडे आहे. “वुईचॅट’ या मेसेजिंग ऍपचा वापर प्रामुख्याने चिनी लोकांकडून केला जातो.
भारतीय शांती सैनिकाला मिळणार मरणोत्तर युएन मेडल
- संयुक्तराष्ट्रांच्या विविध ठिकाणी तैनात असलेल्या शांती सेनेत मोलाचे योगदान देणाऱ्या 119 लष्करी अधिकारी व जवानांना युएन मेडल
देऊन सत्त्कार केला जाणार आहे. - त्यात भारतीय जवान जितेंद्रकुमार यांचाहीं समावेश असून त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार आहे. त्यांनी कांगोत शांतीसेनेत
काम करीत असताना आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यांना डॅग हॅमेरस्कजोल्ड मेडल देऊन मरणोत्तर सन्मानीत केले जाणार आहे. - भारताचे संयुक्तराष्ट्रांतील कायम प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन हे त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
- संयुक्तराष्ट्रांच्या शांतीसेनेत भारताचे सध्या एकूण 6400 लष्करी व पोलिस जवान सेवा देत असून संख्या बळाच्या आधारे शांतीसेनेत
योगदान देणारा भारत हा चौथ्या क्रमांकाचा देश आहे. या सेवेत काम करताना आत्तापर्यंत भारताचे 163 जवान कामी आले आहेत. गेल्या
70 वर्षातील ही सर्वाधिक संख्या आहे. 1948 पासून संयुक्तराष्ट्रांतर्फे विविध राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या कामी शांती सेना
पाठवली जाते. त्यात आत्तापर्यंत एकूण 3737 जवान शहीद झाले आहेत. त्यात भारतीय शहीद जवानांची संख्या 163 इतकी आहे.