Uncategorized
चालू घडामोडी : २३ ऑगस्ट २०२०
Current Affairs : 23 August 2020
माजी अर्थसचिव राजीवकुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती
- माजी अर्थसचिव राजीवकुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची आशियाई विकास बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर राजीवकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- राजीवकुमार हे १ सप्टेंबर रोजी पदाची सूत्रे स्वीकारतील. सुनील अरोरा हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, तर सुशील चंद्रा हे दुसरे निवडणूक आयुक्त आहेत. राजीव कमार हे १९८४ च्या बॅचचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.
- विधी मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे राजीवकुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केल्याची माहिती दिली.
- अशोक लवासा यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयुक्त म्हणून राजीवकुमार निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होतील, असे विधी मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे.
राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर
- हिटमॅन रोहित शर्मासह पाच खेळाडूंना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्मा याच्या व्यतिरिक्त महिला कुस्तीपटू विनेश फोगट महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थंगावेलू आणि हॉकीपटू राणी यांनाही राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळाला आहे.
- याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. सचिनला 1998 साली, धोनीला 2007 तर विराटला 2018 साली हा पुरस्कार मिळाला होता.
- 2019 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माने 5 शतकं झळकावत स्वतःला सिद्ध केलं होतं. त्यामुळे बीसीसीआयने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी दिलं होतं.
- एकदिवसीय प्रकारात रोहित शर्माचा रेकोर्ड चांगला आहे. 50 ओवरच्या फॉर्मेटमध्ये 2019 सालात सर्वाधिक रन काढण्यात रोहितचा नंबर पहिला आहे. रोहितने सात शतकांसह 1,490 रन आपल्या खात्यात जमा केले आहे.
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील चार मोठ्या बँकांचे खासगीकरणासाठी हलचाली
- देशातील सार्वजनिक क्षेत्रातील चार मोठ्या बँकांचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने हलचाली सुरु केल्या आहेत.
- सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची यादी निश्चित केली आहे.
- या यादीमध्ये पंजाब अॅण्ड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युसीओ बँक आणि आयडीबीआय़ बँक या चार महत्वाच्या बँकाचा समावेश आहे.
- या बँकांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सरकारी गुंतवणूकीचा मोठा वाटा आहे. मात्र आता सरकारला समभागची विक्री करुन निर्गुतवणूक करण्याच्या तयारीत आहे.
- मार्च २०२० मध्ये मंत्रीमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलीनीकरण करुन सार्वजनिक क्षेत्रात चार बँका कार्यकरत राहण्यासंदर्भातील निर्णयाला मंजूरी दिली.
- पंजाब नॅशनल बँकेत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँकचे विलीनीकरण झालं. तर कॅनरा बँकेने सिंडिकेट बँकचे विलनीकरण करुन घेतलं. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा बँक आणि कॉर्परेशन बँकेचे विलीनीकरण झालं. तर इंडियन बँकेचे अलहाबाद बँकेत विलीनीकरण होणार आहे.
युरोपा लीग फुटबॉल : सेव्हियाला सहावे जेतेपद
- इंटर मिलानच्या विजयात आतापर्यंत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या रोमेलू लुकाकू याच्यामुळेच मिलानला युरोपा लीगच्या जेतेपदावर पाणी फेरावे लागले. लुकाकू च्या स्वयंगोलमुळे सेव्हियाने इंटर मिलानचा ३-२ असा पाडाव करत सहाव्यांदा युरोपा लीग फुटबॉलचे विजेतेपद पटकावले.
- ब्राझीलचा आघाडीवीर रोनाल्डो याने इंटर मिलानसाठी रचलेल्या एका मोसमातील ३४ गोलच्या विक्रमाशी लुकाकू ने बरोबरी साधली तरी त्याच्याच स्वयंगोलमुळे इंटर मिलानला जेतेपद गमवावे लागले.
- दिएगो कालरेसशी झालेल्या झटापटीत इंटर मिलानला पाचव्या मिनिटालाच पेनल्टी मिळाली.
डेव्हिड जॉन यांचा हॉकी इंडियाचे उच्च कामगिरी संचालकपदाचा राजीनामा
- हॉकी इंडियाचे उच्च कामगिरी संचालक डेव्हिड जॉन यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे.
- जॉन यांचे नुकतेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) कराराचे नूतनीकरण करून देण्यात आले होते. मात्र तरीदेखील हॉकी इंडियामधील पदाधिकाऱ्यांसोबत अनेक वर्षे असलेल्या वादातून हा राजीनामा दिल्याचे डेव्हिड जॉन यांनी स्पष्ट केले आहे.
- ‘साइ’कडून जॉन यांना सप्टेंबर २०२१ पर्यंत कराराचे नूतनीकरण करुन देण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी हॉकी इंडिया आणि ‘साइ’ यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले.